MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

By Naukari Adda Team


MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली, MPSC pre-exam postponed

MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या रविवारी ११ ऑक्टोबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली.

मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. खासदार संभाजी राजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. एकूण सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारवर ही परीक्षा न घेण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यात ही परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'करोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं, अजूनही ते दूर झालेलं नाही. करोनाकाळात अभ्यासिका बंद होत्या, अनेक विद्यार्थ्यांचीही मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलली जावी, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली, ही परीक्षा आता कधी होणार त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.'

मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. खासदार उदयनराजे यांनीही आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यायला नको अशी भूमिका मांडली होती. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मराठा समाजासह अन्य समाजाचेही उमेदवार असतात, असे भुजबळ म्हणाले होते.

 

यापूर्वी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC pre-exam postponed

By Naukari Adda Team


MPSC pre-exam postponed

The Maharashtra State Public Service Commission (MPSC) has postponed the pre-examination to be held on Sunday, October 11. The decision was taken at a state cabinet meeting. Various organizations and leaders were demanding that MPSC examination should not be held till the decision on Maratha reservation is taken. Against this background, the exam has been postponed. Chief Minister Uddhav Thackeray announced that the examination was being postponed indefinitely.

Several student organizations, including the Maratha Kranti Morcha, had demanded postponement of the state service pre-examination. MP Sambhaji Raje had warned the state government to start agitation if the exam was not canceled. A total of 2 lakh 60 thousand students had registered for this exam. The aggressive stance taken by the Maratha agitators had put pressure on the state government not to conduct the exam. Against this backdrop, a meeting of the key leaders of the state government was held today. It was decided to postpone the exam immediately.

Chief Minister Uddhav Thackeray said, 'There was a crisis of corona and lockdown, it is not over yet. Studies were closed during the Coronation period, many students also demanded that the exam be postponed, so the exam was postponed, the date of the exam will be announced soon.

MP Sambhaji Raje had warned that if time permits, we can raise our sword in the Maratha reservation case. MP Udayan Raje had also written a post on social media today demanding postponement of MPSC exams. Meanwhile, senior NCP leader and former deputy chief minister Chhagan Bhujbal had said that the exam should not be postponed. Bhujbal had said that candidates from the Maratha community and other communities are also among the candidates appearing for the Public Service Commission examination.


Earlier, the exam was postponed due to the Kovid-19 epidemic. The examination was held on October 11. It has now been postponed indefinitely.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda