आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा

By Naukari Adda Team


आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा, Exam tomorrow for vacancies in the health department

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा

            मुंबई, दि.२७: सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी उद्या दि. २८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा! अशा शुभेच्छा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिल्या आहेत.

            कोरोनाला हरवून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आरोग्यमंत्री सज्ज झाले असून त्यांनी आज पत्राद्वारे राज्यातील परीक्षार्थींना शुभेच्छा देत ही  निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असल्याचे म्हटले आहे. 

            आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ही परीक्षा होत असून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

            कोरोनाचे निदान झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच  त्यांनी रुग्णालयातून पत्राद्वारे नागरिकांना मास्क वापरणे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतचे भावनिक आवाहन केले होते. त्याच बरोबर त्यांनी राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला देखील पत्र लिहून कोरोना प्रतिबंधासाठी स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Exam tomorrow for vacancies in the health department

By Naukari Adda Team


Exam tomorrow for vacancies in the health department

 

Mumbai, Dec 27: To fill the vacancies in the public health department tomorrow. The exam will be held in the state on February 28. My best wishes to the eligible candidates! State Health Minister Rajesh Tope has given such wishes today. After defeating Corona, the health minister is ready to serve the people again. He congratulated the candidates in the state in a letter today and said that the selection would be made on the basis of merit. The examination is being conducted for various posts in the health department and the entire examination process is being implemented in a transparent manner. Candidates will be selected only on the basis of merit and try to prove your quality, the health minister has appealed. While the health minister expressed concern over the growing number of patients after the corona was diagnosed, he made an emotional appeal to citizens through a letter from the hospital to wear masks and follow the corona rules. He also wrote a letter to students and youth in the state urging them to take care of their families for the corona ban.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda