शासनाचे मागणीपत्र न मिळाल्याने ‘एमपीएससी’ परीक्षांची घोषणाच नाही

By Naukari Adda Team


शासनाचे मागणीपत्र न मिळाल्याने ‘एमपीएससी’ परीक्षांची घोषणाच नाही, Confusion among students as to whether the exam will take place or not

परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

 

नागपूर : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्र अद्यापही न पाठवल्याने यंदा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे परीक्षा होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शासनाने मे २०२०च्या शासन निर्णयाने अराजपत्रित पदांच्या भरतीप्रक्रियेवर बंदी घातली होती. मात्र, एमपीएससीच्या राजपत्रित पदांसंदर्भातही अद्याप मागणीपत्र न दिल्याने शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

करोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती बिघडल्याने शासनाने अराजपत्रित पदांच्या भरतीवर शंभर टक्के बंदी घातली आहे.  मात्र, एमपीएससीतर्फे राजपत्रित पदांची भरती केली जाते. यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ‘एमपीएससी’ला पदांचे मागणीपत्र पाठवले जाते. मात्र, यंदा शासनाकडून ‘एमपीएससी’ला तसे पत्रच न आल्याने पदभरतीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य लोकसेवा आयोग आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने ‘एमपीएससी’च्या परीक्षार्थीना त्याचा फटका बसत आहे. करोना परिस्थितीचे कारण समोर करून शासनाने आयोगाला विश्वासात न घेता पाच वेळा परीक्षा स्थगित करण्याचा इतिहास रचला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा दबाव वाढल्याने शासनाला परीक्षा घेणे भाग पडले. मात्र,  केवळ अराजपत्रित पदांच्या भरतीवर बंदी घातली असताना राजपत्रित पदांची भरती का केली जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी  ‘एमपीएससी’च्या  वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करतात. मात्र, अद्यापही शासनानेच मागणीपत्र न पाठवल्याने ‘एमपीएससी’ची परीक्षा होणार की नाही याबद्दल  संभ्रम आहे. करोनामुळे दीड वर्षांपासून भरतीप्रक्रिया रखडली आहे. वय वाढल्याने अनेकांची संधी हुकण्याची भीती आहे. शासनाकडून वय वाढवण्याची घोषणा झाली असली तरी अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढला आहे, अशी  भावना वैभव बनकर या विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

प्रक्रिया अशी..

शासनाकडून दरवर्षी राज्यामध्ये विविध राजपत्रित पदांच्या भरतीची यादी तयार केली जाते. यानुसार शासनाला भरावयाच्या पदांची माहिती  आयोगाला दिली जाते. शासनाला हव्या असणाऱ्या जागांनुसार आयोग जाहिरात आणि विविध पदांच्या परीक्षेचे वेळापत्रत तयार करते. यामध्ये पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी परीक्षा आदींचा समावेश असतो.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Confusion among students as to whether the exam will take place or not

By Naukari Adda Team


Confusion among students as to whether the exam will take place or not

 

Nagpur: As the state government has not yet sent the demand letter for vacancies to the Maharashtra Public Service Commission (MPSC), the schedule of examinations has not been announced this year. This has created confusion as to whether the exam will take place or not. In particular, the government had banned the recruitment process for non-gazetted posts by a government decision of May 2020. However, the role of the government is being questioned as no demand letter has been issued for the Gazetted posts of MPSC. The government has imposed a 100 per cent ban on recruitment of non-gazetted posts due to the deteriorating economic situation in the state due to corona. However, Gazetted posts are recruited by MPSC. For this, the state government sends application letter to MPSC in the month of September every year. However, as no such letter has been received from the government to the MPSC this year, confusion has arisen about the recruitment. Lack of coordination between the State Public Service Commission and the Mahavikas Aghadi government is hurting the MPSC candidates. The government made history by postponing the exam five times without trusting the commission, citing the Corona situation. After that, due to the pressure of the students, the government was forced to take the exam. However, the question arises as to why the recruitment of Gazetted posts is not done when the recruitment of non-Gazetted posts is banned only. Students preparing for competitive exams plan their studies according to the MPSC schedule. However, as the government has not yet sent the demand form, there is confusion as to whether the MPSC exam will be held or not. The recruitment process has been stalled for a year and a half due to Corona. Many are afraid of missing out on opportunities as they get older. Despite the announcement of the age increase by the government, no final decision has been taken yet. Vaibhav Bunkar said that the mental stress of the students has increased. Here is the process .. The Government prepares a list of recruitment for various Gazetted posts in the State every year. Accordingly, the Commission is informed of the posts to be filled by the Government. The Commission prepares advertisements and examinations for various posts as per the posts required by the Government. These include pre-examination, joint pre-examination, engineering examination etc.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021