CBSE दहावी निकाल कधी आणि कसा लागणार; बोर्डाने केलं जाहीर

By Naukari Adda Team


CBSE दहावी निकाल कधी आणि कसा लागणार; बोर्डाने केलं जाहीर, hen and how the CBSE X results will be released; The board did

CBSE दहावी निकाल कधी आणि कसा लागणार; बोर्डाने केलं जाहीर

CBSE 10th Result Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या परीक्षा नियंत्रकांनी जाहीर केले. याचबरोबर मे महिन्यात मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर २० जूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रलचलित धोरणांनुसार सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षा ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांची अंतर्गत मूल्यमापन या आधारे होते. यंदाही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन १०० गुणांच्या आधारे होणार आहे. विद्यार्थ्यांचे २० गुणांचे मूल्यांकन प्रचलित नियमांनुसार आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांच्या आधारे याचे गुणांकन करावे असे, मंडळाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी जाहीर केले. यासाठी मंडळाने वेगवेगळे निकष जाहीर केले आहेत. मंडळाने परीक्षा रद्द केल्याने ८० गुणांचे मूल्यांकन शाळांनीच करायचे आहे. हे मूल्यांकन शाळांनी वर्षभरात घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून करायचे आहे असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे.

हे सर्व मूल्यांकन पूर्ण करून सर्व माहिती ११ जूनपर्यंत मंडळाला सादर करण्यात यावे असे यात सांगण्यात आले आहे. हे मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन करायची आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असणार आहे. हे शिक्षक गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि दोन भाषा विषयांचे असावेत. दोन शिक्षक हे बाहेरिल शाळेचे असावे असेही यात सांगण्यात आले आहे. बाहेरील शाळांतील शिक्षकांना २५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी १५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या सर्वासाठीची सूत्रेही मंडळाने परिपत्रकात दिली आहेत. यामुळे निकालात समानता येणार आहे. समिती नियुक्तीपासून निकाल जाहीर करण्यापर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार २० जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

 

असे असेल ८० गुणांचे विभाजन
चाचणी परीक्षा - १० गुण
सहामाही परीक्षा - ३० गुण
सराव परीक्षा - ४० गुण

 

बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून ती कधी होणार हे १ जूनच्या बैठकीत ठरणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आला असून तो विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाइटवरून अपलोड करता येणार आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


hen and how the CBSE X results will be released; The board did

By Naukari Adda Team


When and how the CBSE X results will be released; The board did CBSE 10th Result Update: The results will be announced after the internal evaluation of the 10th standard students of the Central Board of Secondary Education. The results will be announced by June 20 after the assessment is completed in May. The Central Board of Secondary Education had decided to cancel the Class X examination in view of the growing prevalence of corona. According to the prevailing policies, CBSE students are assessed on the basis of 80 marks written test and 20 marks internal assessment. This year also students will be assessed on the basis of 100 marks. Assessment of 20 marks of students should be done on the basis of various examinations conducted so far as per the prevailing rules, said Samyam Bhardwaj, Controller of Examinations of the Board. The board has announced different criteria for this. As the board has canceled the examination, only the schools have to evaluate 80 marks. The report also said that the assessment is to be done through various examinations conducted by the schools throughout the year. It said that all these assessments should be completed and all the information should be submitted to the board by June 11. The school wants to set up an evaluation committee to do this. This will include the headmaster and seven teachers. These teachers should be in Mathematics, Sociology, Science and Bilingual subjects. It also said the two teachers should be from outside the school. Out-of-school teachers will be paid an honorarium of Rs 2,500. The teachers of the school will be paid Rs. 1500 for this work. The Board has also given the formula for all this in a circular. This will lead to uniformity in results. A complete timetable from the appointment of the committee to the announcement of the results is given. Accordingly, the results will be announced on June 20. This would be a division of 80 points Test - 10 marks Half year examination - 30 marks Practice test - 40 marks Quiz set for 12th standard students Twelfth standard students will be examined and it will be decided in the meeting on June 1. However, the questionnaire has been made available to the students and can be uploaded on the CBSE website.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021