MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

By Naukari Adda Team


MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज, MCGM Recruitment 2021

MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

नवी दिल्ली, 19 मे : देशभरात कोरोना विषाणूच्या (Corona Virus Second Wave) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढली. दिवसाला तीन ते चार लाख रुग्ण आढळत होते, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा (Medical System) भारही प्रचंड वाढला. रुग्णसंख्येच्या मानानं उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका, अन्य आरोग्य सेवक सगळ्यांचीच कमतरता जाणवू लागली. नवीन उपचार केंद्रं उभारण्यात आल्यानं तिथंही आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यापासून विविध योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारांनीही (State Government) विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या प्रमाणावर नवीन कर्मचारी भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईत रुग्णसंख्या जास्त असल्यानं तिथं मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनंही (BMC) आरोग्य यंत्रणेतील विविध रिक्त पदांसाठी (MCGM Recruitment2021) अधिसूचना जारी केली आहे.

टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिसूचनेनुसार एकूण 185 पदांवर भरती करण्यात येणार असून, यात फार्मासिस्ट (Pharmacist), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) आदी पदांचा समावेश आहे.

इच्छुक उमेदवार portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथं ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना योग्यरित्या वाचणं आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास फॉर्म नाकारला जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.

कोण अर्ज करू शकतं?

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता (Eligibility) निश्चित करण्यात आली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची बी.एससी (B.Sc) पदवी असली पाहिजे. फार्मासिस्ट पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची बी.फार्म (B.Pharm) पदवी असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतच्या अधिक माहितीसाठी अधिसूचना नीट वाचा.

वयोमर्यादा -

या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय (Age) 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावं. फॉर्म जाहीर होण्याच्या तारखेपासून वयोमर्यादा ग्राह्य धरली जाईल. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथिलक्षम असेल.

रिक्त पदाबाबत माहिती -

या पदांसाठी 185 जागांवर भरती करण्यात येणार असून, यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञपदाच्या 89 जागा, फार्मसिस्टसाठी 96 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या दोन्ही पदांसाठी दरमहा 18 हजार रुपये पगार (Salary) देण्यात येणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MCGM Recruitment 2021

By Naukari Adda Team


MCGM Recruitment 2021: Bumper Recruitment for Paramedical Posts Begins, Learn How to Apply

New Delhi, May 19: The number of patients in the second wave of Corona Virus Second Wave has risen sharply across the country. There were three to four lakh patients a day, so the burden on the medical system also increased tremendously. There was a shortage of doctors, nurses and other health workers treating patients. With the establishment of new treatment centers, there was a growing need for health workers. Against this backdrop, the central government has approved various measures to increase the manpower in the health system. This includes a variety of schemes ranging from involving medical students. Staff recruitment is also allowed. State Governments have also started implementing various measures and a large number of new employees are being recruited. Due to the large number of patients in Mumbai, Maharashtra, the health system is being expanded on a large scale. Therefore, the Greater Mumbai Municipal Corporation (BMC) has also issued notification for various vacancies in the health system (MCGM Recruitment2021). According to TV9, a total of 185 posts will be filled as per the notification, including Pharmacist, Laboratory Technician and others. Interested candidates can fill online application by visiting the official website portal.mcgm.gov.in. The notification must be read properly before applying. So there will be no difficulty in filling the form. If there are any errors in the application, the form will be rejected. The last date to apply for these posts is 28 May 2021. Who can apply? As per the notification issued, different eligibility has been fixed for different posts. Candidates applying for the post of Laboratory Technician should have a B.Sc degree from any recognized university or institution. Must have B.Pharm degree from a recognized institute for the post of Pharmacist. Read the notification carefully for more information on eligibility. Age limit - Candidates applying for these posts should be above 18 years of age and below 65 years of age. The age limit will be considered from the date of publication of the form. The age limit for candidates coming under reservation will be relaxed. Vacancy Information - 185 posts will be filled for these posts, including 89 posts of laboratory technicians and 96 posts of pharmacists. Salary for both laboratory technicians and pharmacists will be Rs. 18,000 per month.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda