12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय होणार; राज्यांना 72 तासांचा अवधी

By Naukari Adda Team


12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय होणार; राज्यांना 72 तासांचा अवधी, There will be a big decision regarding the 12th CBSE board exam; States 72-hour period

12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय होणार; राज्यांना 72 तासांचा अवधी

मुंबई, 23 मे : सध्या देशभरातील अनेक परीक्षांना ब्रेक लावण्यात आला आहे. देशभरात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असल्याने अद्यापही शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. दुसरीकडे तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे परीक्षा आणि शाळा सुरू करण्याकड़े कल नसल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान 12 वीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 12 वीची सीबीएससीची परीक्षा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही परीक्षा कधी होणार, कोणत्या पद्धतीने घेतली जाणार याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक 1 जून रोजी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जून रोजी 12 वीच्या सीबीएससी परीक्षांच्या तारखेंची घोषणा करण्यात येऊ शकते. ( 12th CBSE board exam) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कोरोनाच्या नियमावलीत ज्या प्रकारे जुलैमध्ये परीक्षा झाली होती, त्या प्रमाणेच यंदाही जुलै महिन्यात परीक्षांचं आयोजन केलं जाऊ शकतं. केंद्राकडून सर्व राज्यांना याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. येत्या 3 दिवसात सर्व राज्यांनी परीक्षांबाबत त्यांचे निर्णय लिखित स्वरुपात शिक्षण मंत्रालयाला पाठवावेत. यानंतरच 1 जूनपर्यंत यावर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान सीबीएसई बोर्डा (CBSE Board)च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे. आज वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


There will be a big decision regarding the 12th CBSE board exam; States 72-hour period

By Naukari Adda Team


There will be a big decision regarding the 12th CBSE board exam; States 72-hour period

Mumbai, May 23: At present, many exams across the country have been suspended. With the increase in the number of patients with mucomycosis along with corona across the country, there is still no thought of starting an educational institution. The third wave, on the other hand, is dangerous for young children, so there is no tendency to take exams and start school. Meanwhile, important information has come to light about the 12th CBSC board exam. It is being said that CBSC examination of 12th standard will be held. Union Education Minister Nishank is expected to announce on June 1 when the exam will be held and how it will be conducted. Therefore, the dates of 12th CBSC exams may be announced on June 1. (12th CBSE board exam) According to the sources, the exams may be held in July this year as it was held in July last year in the rules of Corona. The Center has appealed to all the states in this regard. In the next 3 days, all the states should send their decision regarding the examinations in writing to the Ministry of Education. After that, a decision is expected by June 1. Meanwhile, the decision regarding the CBSE Board's 10th and 12th examinations will be taken after discussions with Chief Minister Uddhav Thackeray, School Education Minister Varsha Gaikwad has clarified. He gave this information while Varsha Gaikwad held a press conference today.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda