LIC Recruitment 2021: नोकरीची सुवर्णसंधी! वर्षाला मिळेल 9 लाखांपर्यंत पगार

By Naukari Adda Team


LIC Recruitment 2021: नोकरीची सुवर्णसंधी! वर्षाला मिळेल 9 लाखांपर्यंत पगार, Golden job opportunity! Salary up to Rs 9 lakh per annum

नोकरीची सुवर्णसंधी! वर्षाला मिळेल 9 लाखांपर्यंत पगार

 

नवी दिल्ली, 28 मे: कोविडच्या (Covid-19) काळात सगळ्या देशातच आर्थिक मंदी आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. चांगल्या चांगल्या कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे सगळेच जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकारी नोकरीचं महत्त्व किती असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये (LIC) असोसिएट पदासाठी भरतीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. एलआयसीच्या हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) कंपनीत या जागा भरायच्या आहेत. अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट- lichousing.com ला भेट द्या. याबाबतचं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे.

एलआयसी असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत पगार (Yearly Payment) मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2021 ला सुरू झाली असून ती 7 जून 2021 पर्यंत सुरू असेल. या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन या पदासाठीचं नोटिफिकेशन संपूर्ण वाचा. माहिती करून घ्या आणि मग अर्ज करा.

पात्रता

एलआयसीने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार असोसिएट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कमीतकमी 55 टक्के गुणांनी रूरल मॅनेजमेंट विषयातील मास्टर डिग्री (Master in Rural Management) पूर्ण केलेली असावी. तसंच उमेदवाराचं वय 1 जानेवारी 2021 या दिवसापर्यंत 23 ते 30 वर्षांदरम्यान असावं.

कसा कराल अर्ज?

-सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाइटवर (Official Website) जा.

-होम पेज वर Career सेक्शन वर क्लिक करा आणि त्यात Job Opportunities मध्ये जा.

-आता CSR RECRUITMENT वर क्लिक करा.

-त्यात To Apply Online Click Here वर क्लिक करा.

-आता रजिस्ट्रेशन करून तुम्ही एलआयसी असोसिएट (LIC Associate) पदासाठी अर्ज भरू शकता.

-तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट नक्की घेऊन ठेवा.

निवड प्रक्रिया अशी असते

अर्ज केलेल्या सगळ्या उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाईल. त्याच्या निकालाची मेरिट लिस्ट (Merit List) लागेल आणि त्यानंतर मुलाखत घेऊन निवड केली जाईल. नोटिफिकेशनमध्ये परीक्षेसंबंधी सगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये दिलेली पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही ही संधी पटकवू शकता. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका लगेच वेबसाइटला लॉग-इन करून या पदासाठी अर्ज भरून टाका. परीक्षेच्या अभ्यासाबद्दल जाणून घ्या आणि कंबर कसून अभ्यासाला लागा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Golden job opportunity! Salary up to Rs 9 lakh per annum

By Naukari Adda Team


Golden opportunity of job! Salary up to Rs 9 lakh per annum

New Delhi, May 28: During the Covid-19 era, the entire country went into recession. Many lost their jobs. Good good companies shut down. So everyone is looking for a job. The importance of government jobs in such a difficult situation was once again underlined. So if you are looking for a government job, there is a golden opportunity for you. Recruitment notification has been issued for the post of Associate in Life Insurance Corporation of India (LIC). The vacancies are to be filled in LIC's Housing Finance Limited (LIC HFL). Visit the official website-lichousing.com to apply. This has been reported by TV9 Hindi. The candidate selected for the post of LIC Associate will get an annual salary of up to Rs. 9 lakhs. The application process for this post started on 24th May 2021 and will continue till 7th June 2021. If you want to apply for this post, go to the official website given above and read the notification for this post in full. Find out and then apply. Eligibility According to the notification issued by LIC, the candidate who wants to apply for the post of Associate should have completed Master Degree in Rural Management with at least 55% marks. Also, the age of the candidate should be between 23 to 30 years till January 1, 2021. How to apply? -First of all, go to the Official Website. -Click on the Career section on the home page and go to Job Opportunities. -Now click on CSR RECRUITMENT. -Click To Apply Online Click Here. -Now you can register and apply for the post of LIC Associate. -Keep a printout of the application you have filled. The selection process is as follows All the candidates who have applied will be tested online. The result will have a merit list and then the selection will be done by interview. The notification contains all the information related to the exam. So if you meet the eligibility given in the notification, you can seize this opportunity. So don't waste any time, immediately log-in to the website and fill up the application for this post. Learn about exam practice and start studying thoroughly.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda