बाबो...! राज्यात दहावीच्या तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

By Naukari Adda Team


बाबो...! राज्यात दहावीच्या तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, Dad ...! 100 percent marks for the top 10 students in the state

 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे.  राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.

242 विद्यार्थ्यांना 100 टक्के

या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.  कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.

 

8360 शाळांचा निकाल 100 टक्के

राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

 

निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली

निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 539373 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 550809 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 330588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 80335 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

 

मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.मार्च 2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या निकालाच्या तुलनेत 18.20 टक्के जास्त आहे. खासगीरित्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 42309 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 73.75 आहे.

 

पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Dad ...! 100 percent marks for the top 10 students in the state

By Naukari Adda Team


Maharashtra Board X (Maharashtra SSC Results 2020 Declared) results have been announced. About 17 lakh students are curious about when the results will be released. The state's tenth result is 95.30 percent. This is the highest result in the last 15 years, the board said. It is noteworthy that in this result, 242 students have got 100 percent marks. Out of 242, 151 students who scored 100 per cent marks are from Latur division alone.

100 percent to 242 students

In this result, 242 students have got 100 percent marks. Out of 242, 151 students who scored 100 per cent marks are from Latur division alone. Although the result of Konkan division is the highest, 151 students who get 100 percent marks are from Latur division. There is not a single student from Nashik division and only 2 students are from Mumbai division. In 2017, 193 students got 100 percent marks. In 2018, 125 students got 100 percent marks. So last year only 20 students got 100 per cent marks.


The result of 8360 schools is 100 percent

Out of 22570 schools in the state, 1754367 students had appeared for the exam, out of which 8360 schools have scored 100 per cent. In this result, 242 students have got 100 percent marks. A total of 60 subjects were examined, out of which 20 subjects got 100 per cent results.


In the result, the girls won again

The girls have won this year too. 96.91 per cent girls have passed in the state. 93.90 per cent children have won. This year, the result of girls is higher by 3.1 per cent. The Konkan division has won this year too. The result of Aurangabad division is the lowest.

Konkan Division tops

Out of all the divisional boards, Konkan division has the highest result (98.77 per cent) among the regular students and Aurangabad division has the lowest result (92 per cent).

The result of disabled students is 92.73 percent

Out of the regular passing students from the state, 539373 students have passed first class with proficiency, 550809 students have passed first class, 330588 students have passed second class and 80335 students have passed class.

Much more results this year than last

The results are much higher this year than last. The result was 77.10 per cent last year. The results of internal assessment, oral examination, worksheet and average marks in geography have resulted in higher results this year, said Board President Shakuntala Kale. The result of regular students for March 2020 is 18.20 per cent higher than the result for March 2019. The total number of students appearing for the private examination is 42309 with a pass percentage of 73.75.

Pune - 97.34 percent
Nagpur - 93.84 percent
Aurangabad - 92 percent
Mumbai - 96.72 per cent
Kolhapur - 97.64 percent
Amravati - 95.14 percent
Nashik - 93.73 percent
Latur - 93.09 percent
Konkan - 98.77 percent


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda