TET निकाल जाहीर

By Naukari Adda Team


TET निकाल जाहीर , TET results announced

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) अंतिम निकाल जाहीर झाला. यात एकूण 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले. सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्गातील (SEBC), खुल्या प्रवर्गातील आर्धिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) 113 विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या 5 टक्के गुणांच्या सवलतीचा लाभ मिळाला.

राज्यात 19 जानेवारी 2020 रोजी ‘TET’ घेण्यात आली. उमेदवारांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकविण्यासाठी पेपर क्रमांक 1 व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 688, तर पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

परीक्षेचा 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर झाला. यात पेपर क्रमांक 1 मध्ये 10 हजार 487, तर पेपर क्रमांक 2 मध्ये 6 हजार 105 असे एकूण 16 हजार 592 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या निकालावर गुणपडताळणी, जात संवर्ग बदल यासह इतर ऑनलाइन आक्षेप नोंदविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती.

यात पेपर क्रमांक 1 मध्ये 1 हजार 61, तर पेपर क्रमांक 2 साठी 670 उमेदवारांनी आक्षेप नोंदविले. त्यांची तपासणी करून अंतिम निकाल जाहीर झाला. यात गुणपडताळणीत एकही बदल झाला नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


TET results announced

By Naukari Adda Team


The final results of the Teacher Eligibility Test (TET) conducted by the Maharashtra State Examination Council have been announced. A total of 16 thousand 705 candidates passed. 113 students from Socially and Educationally Backward Classes (SEBC), Open Category Economically Weaker Section (EWS) got the benefit of 5% marks for passing the exam.

The ‘TET’ was held on 19 January 2020 in the state. Candidates are required to pass Paper No. 1 for teaching class I to V in schools and Paper No. 2 for class VI to VIII.

1 lakh 88 thousand 688 candidates had registered for Paper No. 1, while 1 lakh 54 thousand 596 candidates had registered for Paper No. 2.

The interim results of the exam were announced on August 5. In Paper No. 1, 10 thousand 487, while in Paper No. 2, 6 thousand 105, a total of 16 thousand 592 candidates had passed. The deadline for filing other online objections, including merit verification, caste cadre change, was August 15.

There were 1,061 candidates in Paper No. 1 and 670 candidates in Paper No. 2. After examining them, the final result was announced. There was no change in the quality verification.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda