दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, Results of 10th-12th supplementary examinations announced

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीचे पुरवणी परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के इतका लागला आहे. बारावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४.७६ टक्क्यांनी घसरला आहे; याउलट दहावीच्या निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून ४१,३९७ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १३,४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीची परीक्षा देणाऱ्या ६९,२७४ विद्यार्थ्यांपैकी १२,७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकाल कुठे पाहाल?

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.

विभागीय मंडळनिहाय दहावी, बारावीची उत्तीर्णता

मंडळ — दहावी — बारावी
पुणे — ३०.७६ — १४.९४
नागपूर — २९.५२ — १८.६३
औरंगाबाद — ३९.११ — २७.६३
मुंबई — २९.८८ — १६.४२
कोल्हापूर — ३०.१७ — १४.८०
अमरावती — ३२.५३ — १६.२६
नाशिक — ३७.४२ — २३.६३
लातूर — ३३.५९ — २२.०५
कोकण — ३४.०५ — १४.४२
एकूण — ३२.६० — १८.४१

गुणपडताळणी कधी?

 

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे

महत्त्वाच्या तारखा
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्जांच्या थेट लिंक्स पुढीलप्रमाणे –

गुणांच्या पडताळणीसाठी येथे करा अर्ज : 
– दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
-बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

 

पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.23) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल “www.mahresult.nic.in” या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांसह पाहता येणार असून त्या माहितीची प्रत (प्रिंट आउट) काढता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दहावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, तर बारावीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान झाली होती. या परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतीरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांना मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पुरवणी परीक्षेतील उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून दिलेले शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

 गुणांच्या पडताळणीसाठी येथे करा अर्ज : 
– दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
-बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

 

मुंबई : राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. या फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून 19 नोव्हेंबरपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होणार आहे.

 परीक्षेच्या भीतीने विद्यार्थी मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सहज मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य मंडळाच्या कार्यालयात 19 नोव्हेंबरपासून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक 27881075/27893756 असे आहेत. ही हेल्पलाईन सेवा 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

फेरपरीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन व मदत घेता येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, वेळापत्रक, हॉलतिकीट तसेच प्रश्‍नपत्रिकेशी संबंधित प्रश्‍न आदीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये; मात्र यासंबंधात काही शंका असल्यास मुंबई विभागीय मंडळ कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर विचारणा करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

 समुपदेशकांचे नाव व भ्रमणध्वनी
अशोक सरोदे- 9322527076, एस. एन. शिपूरकर- 9819016270, व्ही. एन. जाधव- 9868874623, बी. के. हयाळीज- 9423947266, श्रीकांत शिनगारे- 9869634765, स्नेहा चव्हाण- 7506302353, अखलाक शेख- 9967329370, अनिलकुमार गाढे- 9969038020, चंद्रकांत मुंढ- 8169699204, शैलजा मुळये- 9820646115 यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Results of 10th-12th supplementary examinations announced

By Naukari Adda Team


The results of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Board Class X and XII supplementary examinations were announced on Wednesday. The result of class X is 32.60 per cent and the result of class XII is 18.41 per cent. The result of class XII has decreased by 4.76 per cent as compared to last year; On the other hand, the results of class X have increased by 9.74 per cent. There were 41,397 students from across the state appearing for the Class X examination, out of which 13,495 passed. Out of 69,274 students appearing for Class XII, 12,751 students passed.

Where do you see the results?

Students can view the results online from the website www.mahresult.nic.in.

Passing of class X, XII, XII

Circle - Tenth - Twelfth
Pune - 30.76 - 14.94
Nagpur - 29.52 - 18.63
Aurangabad - 39.11 - 27.63
Mumbai - 29.88 - 16.42
Kolhapur - 30.17 - 14.80
Amravati - 32.53 - 16.26
Nashik - 37.42 - 23.63
Latur - 33.59 - 22.05
Konkan - 34.05 - 14.42
Total - 32.60 - 18.41

When is the quality check?

From the second day after the online results, i.e. from December 24, students will be able to apply online for quality check, photocopies of answer sheets, re-evaluation and migration certificate

Important dates
Deadline to apply for quality verification - 24th December 2020 to 2nd January 2021

Deadline to apply for photocopies of answer sheets - 24th December 2020 to 12th January 2021

Direct links to online applications for verification, photocopies of answer sheets, re-evaluation and migration certificate are as follows -

Apply here for verification of marks:
- For X: http://verification.mh-ssc.ac.in
-For Twelve: http://verification.mh-hsc.ac.in


The results of the 10th and 12th supplementary examinations conducted by the Pune Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education in November-December will be announced on Wednesday (23rd) at 1 pm. Students will be able to view this result on the website "www.mahresult.nic.in" with subject wise marks and will be able to print out the information. Presented by Ashok Bhosale.

State Board of Education Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan were the nine divisional boards for the 10th-12th supplementary examinations. The supplementary examination for Class X was held from November 20 to December 5, while the examination for Class XII was held from November 20 to December 10. Students appearing for the 10th and 12th supplementary examinations from the second day immediately after the online results of this examination will be able to apply online to the concerned Divisional Board for verification of marks in any of their compulsory subjects (excluding category subjects) and photocopy, re-evaluation and migration certificate of answer sheets.

For re-evaluation of answer sheets in the November-December 2020 supplementary examination, it is mandatory to obtain a photocopy of the first answer sheet in order to apply online from the official website of the Board. Students are required to apply online to the concerned Divisional Board within five working days from the date of receipt of the photocopy by paying the re-evaluation procedure. The state board has appealed to the students to contact the concerned divisional board for re-evaluation of the answer script.

Apply here for verification of marks:
- For X: http://verification.mh-ssc.ac.in
-For Twelve: http://verification.mh-hsc.ac.in

Mumbai: The State Board of Education is conducting re-examination in November-December for the students who failed in the 10th and 12th examinations conducted in March. A special helpline will be started from November 19 by the Mumbai Divisional Board of the State Board to remove the problems faced by the students and parents regarding this re-examination. The corona will help students solve problems that come up.

Students are under stress and oppression due to fear of exams. Online counselors will be appointed at the divisional board level to help such students out of depression as well as to guide students and parents. The helpline service will be launched from November 19 at the State Board office to make the help easily available to the students. The telephone number of the Mumbai Divisional Board Helpline is 27881075/27893756. The helpline service will run from November 19 to December 10 from 9 a.m. to 7 p.m.

Students will be able to get guidance and help by contacting the helpline number if they have any problem regarding the re-examination. Students and parents should not ask the counselors about the examination center, meeting arrangements, schedule, hall ticket as well as questions related to the question paper; However, if there is any doubt in this regard, the helpline numbers of the Mumbai Divisional Board office should be inquired, informed the Mumbai Divisional Secretary of the State Board Sandeep Sangve through a circular.

Name and mobile number of counselors
Ashok Sarode- 9322527076, S. N. Shipurkar- 9819016270, V. N. Jadhav- 9868874623, b. K. Hayalij- 9423947266, Shrikant Shingare- 9869634765, Sneha Chavan- 7506302353, Akhalak Sheikh- 9967329370, Anilkumar Gadhe- 99

69038020, Chandrakant Mundh- 8169699204, Shailja Mulye- 9820646115.

 

 

Source: Sakal 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda