MPSC साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम

By Naukari Adda Team


 MPSC साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम, Two and a half lakh students for MPSC! Commission insists on not changing examination centers

एमपीएससी’साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम

 

सोलापूर :  राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. लॉकडाउनमध्ये मूळगावी परतलेली मुले अद्यापही त्याच ठिकाणी अभ्यास करीत आहेत. दरम्यान, आता 13 सप्टेंबरला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असून, अडीच लाख विद्यार्थ्यांनी यापूर्वी निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर जाणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रे बदलण्याची मुभा आयोगाने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ठरलेल्या केंद्रावरच परीक्षा होईल, अशी ठाम भूमिका आयोगाने घेतली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने 24 मार्चपासून देशभर कडक संचारबंदी लागू केली. तत्पूर्वी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉस्टेल, अभ्यास केंद्रे बंद करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अंदाजित सव्वा लाखाहून अधिक परीक्षार्थी त्यांच्या मूळगावी परतले आहेत. उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, गडचिरोली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडले असून, ते परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहात होते. आयोगाने काही झाले तरी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या हेतूने निविदाही काढली आहे. तत्पूर्वी, परीक्षार्थींनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून आयोगाला परीक्षा केंद्रे बदलण्याची संधी द्यावी, असे पत्र पाठविले आहे. आमदार रोहित पवारही त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने आता सरकार काय तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे

 आगामी परीक्षेची स्थिती 

1) एकूण परीक्षार्थी : 2.60 लाख

2)  परीक्षा केंद्रे : 800

3)  एका खोलीतील विद्यार्थी : 24

4)  मूळगावी परतलेले परीक्षार्थी : 1.30 लाख

 मुख्यमंत्र्यांची आयोगाच्या अध्यक्षांसमवेत बैठक

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मृतांची संख्याही कमी झालेली नाही. राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय प्रलंबितच आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने दोनवेळा पुढे ढकललेली राज्यसेवेची परीक्षा आता 13 सप्टेंबरला घेण्याचे निश्‍चित केले आहे. दरम्यान, त्याच दिवशी “आयबीपीएस’चीही परीक्षा जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हिताचा तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांची 15 ऑगस्टला भेट घेणार असल्याचे समजते. बैठकीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करतील, याची परीक्षार्थींना उत्सुकता आहे.

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी…’; मनविसेने विभागीय आयुक्तांकडे काय केली मागणी?

पुणे ‘कोरोना’मुळे पुणे सोडून गेलेले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या;राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुण्यात येणार आहेत. बहुतांश जण त्यांच्या खोल्या सोडून गावाकडे गेले होते, त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी;महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी खबरदारीच्या उपाययोजना आयोगाकडून घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात या विद्यार्थ्यांना आपली;राहती ;खोली, वसतिगृह सोडावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर निवास व्यवस्थेची मोठी अडचण येणार आहे.

राज्यभरात सध्या असंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती देखील हलाकीची आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. राव यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निवास व्यवस्था करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Two and a half lakh students for MPSC! Commission insists on not changing examination centers

By Naukari Adda Team


Two and a half lakh students for MPSC! Commission insists on not changing examination centers
Solapur: Corona infection is increasing day by day in the state. The children who returned home in the lockdown are still studying in the same place. Meanwhile, the State Public Service Commission (PSSC) exams will now be held on September 13, making it difficult for 2.5 lakh students to go to the previously selected examination centers. Against this backdrop, there is a growing demand for the commission to allow the change of examination centers. However, the commission has taken a firm stand that the examination will be held at the designated center.

The central and state governments imposed a nationwide curfew from March 24 to prevent the spread of corona. Earlier, hostels and study centers were closed in the Corona area, prompting an estimated 1.5 million candidates to return to their hometowns to prepare for the competition. Most of the students from Osmanabad, Nanded, Nagpur, Beed, Gadchiroli, Solapur and other districts have chosen Pune center and were staying in Pune to prepare for the exams. The commission has planned to conduct the examination no matter what, and has also issued a tender for the purpose of disinfection of the examination centers. Earlier, the candidates had sent a letter to the commission through Minister of State Bachchu Kadu asking them to change the examination centers. MLA Rohit Pawar is also pursuing it. However, as the commission is adamant on its role, attention is now focused on what the government will come up with

Status of upcoming exams

1) Total candidates: 2.60 lakh

2) Examination Centers: 800

3) Students in one room: 24

4) Candidates returning home: 1.30 lakh

Meeting of the Chief Minister with the Chairman of the Commission

The death toll has not dropped as corona infection has increased in the state. The decision to start schools and colleges is pending as the Corona crisis in the state has not abated yet. Against this backdrop, the State Public Service Commission, which has twice postponed the state service examination, has now decided to hold it on September 13. Meanwhile, the IBPS exam has also been announced on the same day. It is understood that Chief Minister Uddhav Thackeray will meet the chairman of the commission Satish Gavai on August 15 to resolve the issue in the interest of the students. Candidates are curious as to what decision the Chief Minister will announce after the meeting.

… For MPSC students; What did Manvise demand from the Divisional Commissioner?
Thousands of students studying for competitive exams who have left Pune due to Pune 'Corona' will come to Pune for Maharashtra Public Service Commission's pre-service examination. Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) has demanded that the government should make arrangements for their accommodation as most of them had left their rooms and moved to the village.

Corona prevalence is high in Pune. In such a situation, pre-examination of Maharashtra Public Service Commission will be held. Precautionary measures are being taken by the Commission for this examination. During the Corona crisis, these students have had to leave their rooms and dormitories. Therefore, after these students come to the city to take the exam, there will be a big problem of accommodation.

Currently, the financial condition of many families across the state is poor. The financial situation of the students studying for the competitive exams is also poor. Therefore, the administration should arrange accommodation for these students, demanded city president Kalpesh Yadav. Rao said that he has shown positivity in arranging accommodation keeping in view the difficulties of the students.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda