परीक्षार्थींसमोर नवा पेच! NEET,MPSC अन्‌ IBP ‘ची परीक्षा एकाच दिवशी

By Naukari Adda Team


परीक्षार्थींसमोर नवा पेच! NEET,MPSC अन्‌ IBP ‘ची परीक्षा एकाच दिवशी, New patch in front of the examinees! NEET, MPSC and IBP exams on the same day

 

 सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असतानाही 13 सप्टेंबरला राज्यभरात तीन मोठ्या परीक्षा होणार आहेत. नीट, एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा लाखो विद्यार्थी एकाच दिवशी देणे शक्‍य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘आयबीपीएस’ परीक्षेसाठीही अर्ज भरल्याने त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

देशभरातील परीक्षा केंद्रांवर 13 सप्टेंबरला इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन (आयबीपीएस) ची परीक्षा होणार आहे. तर त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘आयबीपीएस’ची परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक संधी हुकणार हे निश्‍चित झाले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तथा परीक्षा केंद्रे बदलास तयार नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील का असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. बहुतांश परीक्षा केंद्रे प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने त्याठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का, असाही प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने विद्यार्थी हिताचा तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींकडे ठाण मांडल्याचेही चित्र असून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आयोगाने त्यावर काहीच उत्तर दिले नसून कोरोनाच्या वाढत्या काळात आता परीक्षार्थींसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

 ठळक बाबी… 

1) 13 सप्टेंबर हा परीक्षेचा वार; नीट, एमपीएससी अन्‌ ‘आयबीपीएस’ची परीक्षा

2)  हजारो विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि ‘आयबीपीएस’साठी केले आहेत अर्ज

3)  परीक्षा केंद्रे अपुरी पडण्याची शक्‍यता; कोविड केअर सेंटरमध्ये गुंतल्या इमारती

4)  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रे ‘नीट’साठी काढले स्वतंत्र परिपत्रक

5)  स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोर पेच; परीक्षा पुढे ढकलावी तथा केंद्र बदलाची मागणी

 तंत्र शिक्षण मंडळाचे पत्र 
देशभरातील केंद्रांवर 13 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या केंद्रांवर 12 आणि 13 सप्टेंबरला अन्य कोणत्याही परीक्षेचे आयोजन करु नये, त्या केंद्रांवरील शिक्षकांना दुसरे कोणतेही काम देऊ नये असे पत्र महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काढले आहे. त्यानुसार उपसचिवांनी संबंधितांना तसे निर्देश दिले आहेत. तंत्र शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागाचे उपसचिव डॉ. आनंद पवार यांनी त्याबाबत पत्र स्वतंत्र काढले आहे.

 

हे वाचा -  MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा!


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


New patch in front of the examinees! NEET, MPSC and IBP exams on the same day

By Naukari Adda Team


Solapur: Corona infection is increasing day by day in the state. Despite the rainy days, three big exams will be held across the state on September 13. The question is whether it is possible for millions of students to take the MPSC and IBPS exams on the same day. On the other hand, thousands of students preparing for the competitive exams have also applied for the IBPS exam, creating a new dilemma for them.

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) exam will be held on September 13 at examination centers across the country. The Maharashtra Public Service Commission has also decided to conduct the examination on the same day. Most of the students preparing for the competitive exams have applied for the IBPS exam. So now it is certain that these students will miss an opportunity.

On the other hand, the Maharashtra Public Service Commission is not ready to postpone the exams and change the examination centers. Therefore, the question is whether there will be enough examination centers. Since most of the examination centers are in restricted areas, the question is whether students can take the exams there. Against this backdrop, there is a growing demand for the Commission to work out a solution in the interest of the students. The students have also approached the people's representatives in this regard and some people's representatives, including Minister of State Bachchu Kadu, have written to the commission. However, the commission did not respond to it and a new patch has now been created in front of the examinees in the increasing period of corona.

Highlights

1) September 13 is the day of the exam; Well, MPSC and IBPS exams

2) Thousands of students have applied for MPSC and IBPS

3) Possibility of insufficient examination centers; Buildings involved in the Covid Care Center

4) Maharashtra State Board of Technical Education has issued a separate circular for examination centers

5) Peach in front of students of competition exams; Demand for postponement of examination and change of center

Letter from the Board of Technical Education
Examinations will be held on September 13 at centers across the country. Therefore, the Maharashtra State Board of Technical Education has issued a letter stating that no other examinations should be held on September 12 and 13 at these examination centers and no other work should be given to the teachers at those centers. Accordingly, the Deputy Secretary has given such instructions to the concerned. Deputy Secretary of Technical Education Board, Aurangabad Division, Dr. Anand Pawar has issued a separate letter in this regard.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda