आता विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती

By Naukari Adda Team


आता विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती , Now students will get information about the city of the examination center

यंदा प्रथमच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती लवकर कळणार आहे…

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS / BDS) होणारी नीट (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आपले अधिकृत संकेतस्थळ nta ac.in वर हे परिपत्रक जारी केले आहे.

नीट २०२० च्या परीक्षा केंद्रांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. एटीए पहिल्यांदाच नीटच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देत आहे. दरवेळी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल, याची माहिती अॅडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्रात दिली जाते. पण यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ही माहिती आधी मिळत आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अॅडमिट कार्ड मिळायच्या आधीच एनटीए आणि नीटच्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जात आहे, जेणेकरून आयत्या वेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची कसरत करावी लागू नये. जर परीक्षा केंद्राचे शहर त्यांच्या वर्तमान शहरापेक्षा वेगळं असेल तर तेथे पोहोचण्याची तयारी त्यांना करता येईल.

आपल्या परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.

अॅडमिट कार्डची माहिती

या परिपत्रकात एनटीएने हेही सांगितले आहे की नीट २०२० साठी लवकरच अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि पत्ता, प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा), रिपोर्टिंग आणि एंट्री टाइम, परीक्षा केंद्राचे गेट बंद होण्याची वेळ आदी माहितीचा समावेश असेल.

एनटीएद्वारे नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळा ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

हेल्पलाइन क्रमांक

नीट २०२० संबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. पुढे दिलेल्या ईमेल वा संपर्क क्रमांकाद्वारे एनटीएशी संपर्क साधता येईल –

ईमेल आयडी – [email protected]

संपर्क क्रमांक –
८२८७४७१८५२,
८१७८३५९८४५,
९६५०१७३६६८,
९५९९६७६९५३,
८८८२३५६८०३


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now students will get information about the city of the examination center

By Naukari Adda Team


This year, for the first time, the students who have taken the exam will know the details of the examination centers soon.

A circular has been issued regarding the NEET entrance examination for admissions to medical degree courses (MBBS / BDS). The National Testing Agency (NTA) has issued this circular on its official website nta ac.in.

This circular has given important information regarding the examination centers for 2020. For the first time, ATA is providing this facility to the students of NEET. Each time the information about the city in which the examination center will be located is given in the admit card. But for the first time this year, students are getting this information first.

According to the NTA, at present, before getting the admit card, the candidates are being informed about the city of their examination center on the official websites of NTA and NIT, so that they do not have to move from one place to another in the future. If the city of the examination center is different from their current city, they can prepare to get there.

The name of the city of your examination center can be checked from the link provided at the end of this report.

Admit card information

In this circular, NTA has also stated that admit cards will be issued soon for 2020. The Admit Card will contain information about the roll number and address of the student, medium (language) of the question paper, reporting and entry time, closing time of the examination center gate etc.

NTA 2020 is organized by NTA on 13th September 2020 from 2 pm to 5 pm.

Helpline number

If you need any information about 2020, you can contact NTA directly. NTA can be contacted through the following email or contact number -

Email ID - [email protected]

Contact Number -
8287471852,
8178359845,
9650173668,
9599676953,
8882356803


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021