आता रेल्वे मध्ये 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा... प्रतीक्षा संपली

By Naukari Adda Team


आता रेल्वे मध्ये 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा... प्रतीक्षा संपली, Now the examination for 1 lakh 40 thousand vacancies in Railways in December ... The wait is over

केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, रेल्वेनेही तब्बल 1,40, 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.

अर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मित्तीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now the examination for 1 lakh 40 thousand vacancies in Railways in December ... The wait is over

By Naukari Adda Team


The Union Finance Ministry has clarified that no ban has been imposed on any government job. Other recruitment processes including SSC, UPSC, Railway Recruitment or Post Recruitment conducted by the Central Government will be implemented as before. Therefore, the Railways has also announced that it will soon conduct examinations for 1,40,640 vacancies. The schedule of these exams will also be announced soon.

The Finance Ministry has clarified that the circular issued by the Finance Department on September 4 is part of the internal process for the creation of posts and has nothing to do with the recruitment process. The Corona epidemic has plunged the country into an economic crisis that has seen a sharp drop in GDP in the last quarter. Against this backdrop, the central government has warned the ministry and concerned departments to avoid unrealistic expenditure. It has also been advised to stop unnecessary use of paper for the work of the ministry. However, it has been clarified that recruitment will not be stopped. Therefore, the way has been cleared for the Central Government to fill the vacancies in various departments.

Applications were invited from Indian Railways for the vacant posts. Exams for these posts were canceled due to lockdown due to Corona epidemic. Also, no further dates were fixed, including whether the lockdown would result in a government job. Doubts were also raised about this. However, the Railways has said that the exams will be held in December. Examination for Railway Vacancies will be held from 15th December 2020. Railways has received 2.42 crore applications for 1,40,640 seats across the country. It is learned that the scrutiny process of these applications has been completed and the examination will be computerized.

Railways has received these applications for three categories. There are 35,208 vacancies for NTPC (Non-Technical, Guard, Clerk, Clerk). So, 1663 seats are at the ministerial level. The remaining 1,03,769 are for seats (Trackman, Clean, Pointman). Special instructions and rules have been prepared for the examination. Corona lockdown, these exams will be conducted by following the social distance. Therefore, the candidates who have been waiting for the last 5 months will get relief.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda