एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी

By Naukari Adda Team


एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी, Once upon a time, the hotel also had floors wiped out. Maharashtra gave the country the youngest officer

महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी. देशात 371 वी रँक मिळवत तो 21 व्या वर्षीच IAS झाला. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या तरुणाच्या जिद्दीची ही गोष्ट.

 

 

घरी पैशाची इतकी चणचण की, दोन वेळचं पोटभर खायलाही पैसे पुरायचे नाहीत. वडील रिक्षाचालक. जेमतेम शे-दोनशे रुपये कमवायचे आणि तेही रात्री दारूवर उडवायचे. मग घरी येऊन शिवीगाळ करायचे. अशा परिस्थितीतून अभ्यास करत तो मोठा झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हॉटेलाम काम केलं आणि मेहनतीने UPSC दिली. देशात 371 वी रँक मिळवत तो IAS झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये विशेष पदावर कार्यरत आहे. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या तरुणाच्या जिद्दीची ही गोष्ट. वयाच्या 21 व्या वर्षी तो IAS झाला. देशातला सर्वात तरुण सनदी अधिकारी म्हणून गाजलेल्या - अन्सार अहम्मद शेख यांची ही प्रेरणादायी कहाणी.

अन्सार मराठवाड्यातल्या शेलगाव नावाच्या एका लहान गावात वाढला. बदनापूर तालुक्यातल्या या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात हुशार असला, तरी शिक्षण सोडून त्यानं कामधंद्याला लागावं, अशी घरच्यांची इच्छा होती. कारण घरात पैशाची अडचण होती. वडील रिक्षा चालवायचे, पण त्यातून घराला पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. आई मोलमजुरी करायची, तरी दोन वेळचं पोटभर अन्न मिळत नसे. "मग नातेवाईकांच्या सल्ल्याने वडिलांनी सांगितलं शाळा सोड आणि कामाला लाग. ते सांगायला वडील शाळेतही गेले. पण शिक्षकांनी त्यांना समजावलं. अन्सार हुशार आहे, त्याचं शिक्षण थांबवू नका, असं सांगितलं", अन्सार शेख एका मुलाखतीत सांगतात.

कसेबसे वडील तयार झाले आणि अन्सारची दहावीपर्यंतचं शिक्षण तरी पार पडलं. चांगले मार्क मिळाले, त्यामुळे बारावीपर्यंतचं शिक्षण घ्यायची परवानगी मिळाली. जिल्हा परिषदेच्या शाळेतच पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अन्सारने मेहनतीने अभ्यास केला आणि 91 टक्क्यांच्या वर मार्क मिळवले. आसपासच्या कुणालाच कधी एवढे मार्क मिळाले नव्हते. त्यानंतर घरच्यांनी शिक्षण सोड म्हणून कधी सांगितलं नाही.

शिक्षण पूर्ण करायला घरच्यांची ना नव्हती, तरी पैसेही नव्हते त्यांच्याकडे. मग पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळेल ते काम अन्सारनं स्वीकारलं. काही काळ हॉटेलमध्ये रोजंदारीवर कामही केलं. तिथे कधी पाणी द्यायचं काम असे, तर कधी फरशी पुसायचं. पण तोपर्यंत अन्सारनं आपलं ध्येय निश्चित केलं होतं.

अन्सार शेखने दरम्यान ऑफिसर व्हायचा ध्यास घेतला होता. बारावीत असतानाच त्याला एक ब्लॉक ऑफिसर पदाला असलेला सरकारी अधिकारी भेटला. त्याच्यासारखं मोठं व्हायचं, हा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी काय करावं लागेल, कुठली परीक्षा द्यावी लागेल, याची माहिती मिळवली आणि UPSC द्यायचा त्याचा निर्णय पक्का झाला. पुण्यात पुढच्या तयारीसाठी अन्सार आला आणि दररोज मन लावून अभ्यास करू लागला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असं रुटीन सुरू होतं.

अन्सार शेख सांगतात, "UPSC च्या परीक्षेचा निकाल होता, त्याही दिवशी माझ्या खिशाल बाहेर खाण्याएवढे पैसे नव्हते. मित्रांनीच रिझल्ट पाहिला आणि माझं नाव यादीत दिसल्यावर पार्टी मागितली. खुशीनं मिठाई वाटण्याएवढे पैसे नव्हते तेव्हा, मग मित्रानंच मदत केली. मेहनतीचं फळ मिळालं याचाच जास्त आनंद होता. आता त्या मेहनतीच्या जोरावरच सगळं हाती आलंय."

अन्सार शेख यांनी 2015 मध्ये UPSC ची परीक्षा दिली. 2016 च्या बॅचचे ते IAS ऑफिसर आहेत आणि West Bengal Cadre मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे.

Source:lokmat

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Once upon a time, the hotel also had floors wiped out. Maharashtra gave the country the youngest officer

By Naukari Adda Team


Maharashtra gave the country the youngest officer. He became the IAS at the age of 21, earning 371st rank in the country. This story of a young man who lives in a small village in Jalna district in Marathwada.


There is so much money at home that even two full-time meals are not enough money. The father rickshaw driver. He used to earn two hundred rupees a day and spend that night on alcohol. Then they would come home and scamper. He grew up studying under such conditions. The hotellam worked on occasion to complete his education and diligently provided the UPSC. He became the IAS, gaining the 371st rank in the country and is now working for a special position in West Bengal. This story of a young man who lives in a small village in Jalna district in Marathwada. He became an IAS at the age of 21. This inspiring story by Ansar Ahmed Sheikh, the youngest chartered officer in the country.

Ansar grew up in a small town called Shellgaon in Marathwada. I attended the school of the Zilla Parishad in this village in Badnapur taluka. Even though they were smart in their studies, the family wanted them to quit their education. Because there was money in the house. The father used to run a rickshaw, but the family was not getting enough income from it. Mother was forced to work, though she could not get enough food for two time. "Then leave the school that his father told him to go to work and work. He went to school to tell his father. But the teacher explained to him. Ansar is smart, told him not to stop teaching," Ansar Shaikh says in an interview.

Somehow the father was ready and his education till the tenth grade was completed. Good marks were obtained, which allowed me to study up to class XII. He joined the Zilla Parishad School for further education. Ansar studied hard and earned a mark of 91 percent. No one around has ever received such a mark. After that, the householders never mentioned education as a leave.

The families did not have the money to complete their education, but they did not have any money. Then Ansar accepted the work he would get to complete his next education. He also worked for a while at a hotel. Sometimes there was watering, and sometimes floors. But by then Ansar had set his goal.

Ansar Shaikh, meanwhile, had decided to become an officer. It was during the twelfth that he met a government officer who was a block officer. He took this lesson to be as big as he was. He got information on what to do, what to take the exam for, and decided to give UPSC. Ansar came to Pune for further preparation and started to study daily with his mind. Routines like day work and night study begin.

Ansar Shaikh says, "The result of the UPSC exam was that day, there was no money to eat my sash. The friends saw the result and asked for a party when my name appeared on the list. When happiness was not enough money to distribute sweets, then the friends helped. Now all that is in the power of that hard work. "

Ansar Shaikh appeared in UPSC exam in 2015. He is an IAS officer of the 2016 batch and has been appointed to the West Bengal Cadre.

Source: lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda