पुढील थांबा IAS! बस कंडक्टर UPSC उत्तीर्ण

By Naukari Adda Team


पुढील थांबा IAS! बस कंडक्टर UPSC उत्तीर्ण, Next stop IAS ! Meet this bus conductor who studied 5 hours daily to clear the UPSC civil service exam

पुढील थांबा IAS! बस कंडक्टर UPSC उत्तीर्ण

माणसाला एकदा ध्येयाने पछाडलं की, माणून त्या ध्येयाच्या हात धुवून मागे लागतो आणि यशस्वी होतो, याचं ताजं उदाहरण म्हणजे बेंगळुरूतील बस वाहक मधु एनसी. या बस कंडक्टरने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे

बंगळुरू मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असलेल्या मधुने युपीएससी परीक्षा पास केलीय. नुकतेच मधुने युपीएससीची मुख्य परिक्षा (मेन एक्झाम) पास केली असून आता आपलं ध्येय गाठण्यासाठी एकच स्टॉप बाकी आहे. म्हणून नेक्स स्टॉप आयएएस.. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची मुलाखत चाचणी घेण्यात येणार आहे.

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील मालावली या लहानशा खेड्यातील मधुने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले ते आता पूर्णत्वास उतरत आहे. वयाच्या 19 व्या बस कंडक्टर बनून मधुने आपल्या परिस्थितीशी दोनहात करायला सुरुवात केली. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्याने आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मधु हा राज्यशास्त्र विषयाची पदवीधर आहे. माझ्या घरातून सर्वाधिक शिक्षण घेतलेला मीच आहे, मी कुठली परीक्षा पास केली, याबद्दल माझ्या आई-वडिलांना काहीच माहिती नाही. पण, मी कुठलीतरी परीक्षा पास केलीय, याचा त्यांना अत्यानंद झालाय. 

तास नोकरी आणि तास अभ्यास

आएएस होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधु यांनी चिकाटी कधी सोडली नाही. दिवसभर ८ तासांची नोकरी आणि दैनंदिन कामातून वेळ काढत ते दररोज ५ तास यूपीएससीचा अभ्यास करीत होते. कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या मधु यांनी जिद्द सोडली नाही. यानंतर त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात मधु यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती. ही परीक्षा त्यांना कन्नड या आपल्या मातृभाषेतून दिली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षेसाठी जोरदार तयारी केली आणि मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेतून दिली. यूपीएससी परीक्षेसाठी मधु यांनी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, नैतिक मूल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या विषयांची विशेष तयारी केली. जानेवारी महिन्यात यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. त्या यादीत आपले नाव पाहिल्यावर मधु यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मधु राज्यशास्त्र विषयात पदवीधर

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्याश्या खेड्यात मधु राहतात. २९ वर्षीय मधु, कुटुंबात सर्वांत मोठे असल्याने घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. वयाच्या १९ वर्षी ते बस वाहक बनले. गरिबी आणि कठीण परिस्थितीशी दोन हात करत मधु यांनी आपले स्वप्न पूर्णत्वास आणले आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मधु यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे.

मी कोणती परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो, याबाबत माझ्या पालकांना काहीच माहिती नाही. मात्र, मला मिळालेल्या यशाचा त्यांना आनंद झाला आहे. आमच्या घराण्यात एवढे शिक्षण घेतलेला मी एकटाच आहे, असे मधु यांनी सांगितले. परीक्षेचा अभ्यास करताना कामात कधीही कसूर केली नाही. कितीही गर्दी असली तरी सर्व प्रवाशांना तिकिटे मिळतील, याची खात्री केली. मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज २ तास वेळ देत असून, मुलाखतही उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास मधु यांनी व्यक्त केला.

पुढे काय 

सी शिखा या बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट सर्व्हीसचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक (सनदी अधिकारी) आहेत. आता, मुलाखत पास होऊन मला सी शिखा या माझ्या बॉससारखं अधिकारी व्हायचंय, असे मधुने परीक्षा पास केलेला रोल नंबर दाखवताना सांगितले. सध्या, प्रत्येक आठवड्यात शिखा आपल्या व्यस्त वेळेतून मधुला दोन तास देतात. या दोन तासात मुलाखतीची कशी तयारी करायची याचं मार्गदर्शन करतात. मॅडम शिखा खूप चांगल्या पद्धितीने मला मार्गदर्शन करत असल्याचंही मधुने सांगितलं.

 मधुचा बस कंडक्टर ते IAS अधिकारी हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. आता, केवळ थोडाच अवधी असून पुढचा स्टॉप IAS असणार आहे. मधुची जिद्द, चिकाटी अन् परीश्रमाची तयारी देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे, मधुप्रमाणेच आता मंड्या जिल्ह्यातील सर्वांनाच 23 तारखेच्या मुलाखतीची अन् त्यानंतर येणाऱ्या आनंददायी वार्ताची उत्सुकता लागली आहे. 

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Next stop IAS ! Meet this bus conductor who studied 5 hours daily to clear the UPSC civil service exam

By Naukari Adda Team


Next stop IAS! Bus conductor passed UPSC

The latest example of a man who washed away with a goal, washed his hands, and succeeded, is a recent example from Bangalore bus carrier Madhu NC. The bus conductor has passed the Central Public Service Commission (UPSC) exam, and his dream of becoming an IAS is now going to come true.

Madhu, who is a conductor in the Bengaluru Metropolitan Transport Service, has passed the UPSC exam. Madhu recently passed the UPSC Main Exam and now there is only one stop left to reach our goal. So Nex Stop IAS .. That is not to say it won't work. Madhu's interview test will be held on March 25 for the UPSC exam.

Madhu, a small village in Malavali in Karnataka's Mandya district, dreamed of becoming an IAS. By becoming the 19th bus conductor at the age of 19, Madhu started to deal with his situation in two languages. He completed his undergraduate and post-graduate education through the Distance Learning System. Madhu is a bachelor of science degree. I am the most educated person in my house, my parents do not know which exam I passed. But, they are glad that I passed the exam.

2 hours job and 3 hours study

Madhu never gave up on fulfilling her dream of having an AIDS. He was studying for 5 hours a day at UPSC, taking time out of his day job and daily work. Madhu, who failed the Karnataka administrative service test, did not give up. He then started preparing for the UPSC exam. Madhu passed the UPSC exams in June last year. He took the exam from his mother tongue Kannada. After passing the Pre-Examination, he prepared for the main exam and gave the main exam in English language. For the UPSC exam Madhu made special preparations for the subjects of political science, international relations, moral values, language, common sense, mathematics and essay writing. The results of the UPSC exam were released in January. After seeing his name on the list, Madhu was delighted to be in the Garden.

Bachelor of Science degree in honey

Madhu lives in this small village of Mawali in Mandya district of Karnataka. The 90-year-old Madhu, the eldest in the family, fell on his shoulders to take charge of the house. At the age of 19, he became a bus carrier. With two hands on poverty and hard times, Madhu has fulfilled her dream. He completed his undergraduate and post-graduate education through the Distance Learning System. Madhu holds a bachelor's degree in political science.

My parents do not know what exam I passed and passed. However, they are happy with the success I have had. "I am the only one who has studied so much in our family," Madhu said. I never did any work in studying the exam. Ensured that all passengers get tickets, no matter how crowded. Madhu, who is giving 3 hours a day to prepare for the interview, also believes that the interview will pass.

What next
C Shikha is the current Managing Director (Chartered Officer) of Bengaluru Metropolitan Transport Services. Now, after passing the interview, I want to be an officer like my boss, Si Shikha, ”Madhu said while showing the roll number that passed the exam. Currently, each week the Sikhs give Madhu two hours from their busy time. These two hours guide you to how to prepare for an interview. Madhu Shikha also said that she was guiding me in a very good way.

The journey from Madhu's bus conductor to IAS officer is now in full swing. Now, with only a short period, the next stop will be IAS. Madhu's stubbornness, persistence and preparation for exams will inspire millions of young people across the country. So, like Madhu, everyone in Mandi district is now looking forward to the 23rd interview and the pleasant talk that will follow.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda