दामिनीची गगन भरारी

By Naukari Adda Team


दामिनीची गगन भरारी , Selected as Flying Officer in Indian Air Force

भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड

अशोक वाणी ,बीड


  बीड जिल्ह्यातील महिला व मुली राजकीय, सामाजिक, कला, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात आज उत्तृंग भरारी घेवून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मात्र आता एका नवीन क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करूण आपल्या कर्तृत्वाची मुद्रा जीने उमटविली ती आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी येथील दामिनी दिलीप देशमुख. आई-वडिलांनी दिेलेले संस्कार, जिद्द आणि आत्मविश्वाच्या बळावर 2019 मध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या कॉमन ॲडमीस्टेट या खडतर परिक्षेत देशभरातील दिड लाख उमेदवारांमधुन गुणवत्ता यादीमध्ये येत दैदिप्यमान यश संपादण केल्याने तीची एअर फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तीने शासनाची उच्च शिक्षणासाठी मिळालेली शिष्यवृत्ती सोडली, दोन वेळा अपयशही आले मात्र खचुन न जाता आपले ध्येय गाठणाऱ्या दामिनिचा हा प्रवास बीडच्या मुलींना नक्कीच प्रेरणा देणारा आहे. हैद्राबाद येथील अकॅडमी मध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ती फ्लाइंग ऑफिसर म्हणून भारतीय वायुदलात रूजु होणार आहे.

                       बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी हे दामिनी देशमुखचे मुळ गाव. वडिल दिलीपराव देशमुख हे शेतकरी कुटुंबातील दिलीपराव यांना शिक्षणाची प्रचंड आवड त्यामुळे त्यांनी नौकरीसाठी गाव सोडले आणि एमपीएससी परिक्षेत कठोर परिश्रण घेवुन न्यायाधीश झाले. त्यापुर्वी सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम केले. ते सद्या पूणे येथे धर्मादाय सहआयुक्त म्हणून आहेत. शिक्षणात प्रचंड आवड असल्याने आपल्या मुलांनीही शिकुन मोठे व्हाणे आणि आपले करिअर घडवावे अशी त्यांची इच्छा होती. दिलीप यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार. त्यातील दामिनी ही अभ्यासात अत्यंत हुशार आणि मेहनती . दामिनीचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे पुणे येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे झाले. नौकरीमुळे दिलीपराव यांची बदली दर तिन वर्षाने इतरत्र होत असे. त्यामुळे चार शाळा बदलाव्या लागल्या. मात्र शिक्षण एकाच शाळेतुन व्हावे यासाठी खेळ आणि शिक्षणाला सारखेच महत्व देणारी शाळा म्हणून पुणे येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची शाळा येथे दामिनीचे पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. दहाविमध्ये 95.82 टक्के तर बारावीत 87.50 टक्के गुण मिळवीले. या निवासी शाळेत सैनिकी प्रशिक्षणामध्ये अश्वारोहण, कराटे, योगा धनुर्विद्या, रायफल शुटींग तसेच खोखो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल असे विविध खेळ शिकवीले जातात. बारावीनंतर तीला महाराष्ट्र सरकारची चार लाखाची इन्स्पायर ही शिष्यवृत्ती मिळाली. मात्र दामिनीला आपल्या आवडत्या क्षेत्रात एअर फोर्स मध्ये करिअर करायचे होते. त्यामुळे बारावीनंतर तीने अभियांत्रिकीला प्रवेश घेवुन मॅकॅनिकल शाखेची अभियांत्रिकीची पदवी घेतली. सैनिकी शाळेत असतांना प्रशिक्षणामध्ये अश्वारोहन, कराटे योगा, धनुर्विद्या, रायल शुटींग, खो खो, व्हॉलीबॉल,बास्केटबॉल असे विविध खेळ शिकवीले जायचे त्यामुळे एकप्रकारचे घाडस निर्माण झाले. आठवीत असतांना करीअर संबंधी मार्गदर्शन शिबीर झाले आणि एक दिशर मिळली तेव्हाच वायुदलात करिअर करण्याचे ठरवीले होते. पूढे दामिनीने याच दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवली. एअर फोर्स मध्ये जाण्यासाठी ग्रॅजवीशन अनिवार्य आहे. फ्लाइंग ऑफिसर पदासाठी देशपातळीवर एक कॉमन ॲडमीशन टेस्ट घेतली जाते. यामध्ये देशभरातुन सुमारे दिड लाख विद्यार्थी ही परिक्षा देतात. त्यापैकी दिड ते दोन हजारच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात. मैदाणी खेळ, व्यक्तीमत्व चाचणी घेतली जाते. वैद्यकीय देखील चाचणी घेतली जाते. त्यानंतर एअरफोर्स सलेक्शन बोर्डाकडुन मुलाखत घेतली जाते. या सर्व अवघड प्रक्रीया पार करूण दामिनी देशमुख हीने हे यश संपादन केले आहे. या परिक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येन्याचे प्रमाण तीन ते चार टक्केच असते. हैद्राबाद येथील एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर फ्लाईंग ऑफिेसर म्हणून ती रूजु होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैद्राबाद येथे प्रशिक्षणासाठी ती रवाणा झाली आहे. दामिनी देशमुख ही महाराष्ट्रातील पत्रकार एस.एम.देशमुख यांची पुतणी आहे.आई-वडिलांनी दिेलेले स्वातंत्र्य आणि प्रोत्साहनाचे दामिनिने चिज करूण दाखवीले आहे.

मिळवीलेली परितोषीके
आठवीत असतांना महाराष्ट्र प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण
adventuer mourtaineering course   हिमाचल प्रदेश
basic mountaineezing course हिमाचल प्रदेश उर्त्कृष्ठ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड
मार्शल आर्टस कराडे मध्ये ब्लॅक बेल्ट
उच्चशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाकडुन चार लाखाची स्कॉलरशिप
राज्य पातळीवरील कराटे स्पर्धेत सिल्वर मेडल
राज्य पातळीवरील धनुर्विद्या स्पर्धेत सहभाग


विद्यार्थ्यांना दामिनीचा सल्ला
शिक्षण घेत असतांना प्रत्येकाने आपल्या डोळ्या समोर एक ध्येय ठेवले पाहीजे.आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करतांना कीतीही संकटे आली तरी त्यातुन मार्ग शोधत आपले ध्येय गाठले पाहीजे.आवडत्या क्षेतात अपयश आले तर दुसरा पर्याय सुद्धा असला पाहीजे म्हणून आपण देखील अभियंता झाल्याचे सांगितले.

दोनवेळा आले अपयश
फ्लाइंग ऑफीसर पदाची परिक्षा उत्तीर्ण होणे ही सोपी बाब नाही. देशभरातुन तीन लाखावर उमेदवार या परिक्षेसाठी असतात. दोन वेळा लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दामिनीला मुलाखतीत यश मिळविता आले नाही. तीने हार न मानता मोठ्या जिद्दीने या परिक्षेला सामोरे जावुन अवघड असा मुलाखतीचा टप्पा पार करूण देशभरातील 98 उमेदवारामध्ये व 20 ते 25 मुलीमध्ये दामिनीची एअर फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.

नौकरी करत अभ्यास केला
दामिनीचे मुख्य ध्येय होते ते एअर फोर्समध्ये करिअर करण्याचे. अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर टाटा व किर्लोस्कर या दोन कंपन्यामध्ये अकरा महीने नौकरी केली. नौकरी करतच तीने फ्लाइंग ऑफिसर पदासाठी सेल्फ स्टडी केली.

मुलीच्या कर्तृत्वाचा अभिमान
मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जो भेदभाव होतो हे अत्यंत चुकीचे आहे.मी जेव्हा स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालो यशाचस एकएक टप्पा पार करत आत पूणे येथे धर्मादाय सहाआयुक्त ही झालो मला मिळालेल्या यशात मला जो आनंद झाला नाही तो आज माझी मुलगी दामिनी ही फ्लाइंग ऑफिसर झाल्यानंतर झाला.तीच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. खरेतर मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत.मला तिच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे दामिनीचे पिता दिलीप देशमुख यांनी सांगितले.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Selected as Flying Officer in Indian Air Force

By Naukari Adda Team


Selected as Flying Officer in Indian Air Force


Women and girls in Beed district are proving their duty today by taking a huge load in various fields of political, social, art, medical. But now, in a new area, the name of the Beed district is highlighted and the one who made the mark of his duty is Damini Dilip Deshmukh of Damini in Devdi in Wadwani taluka of Beed district. She has been selected as a Flying Officer in the Air Force for her outstanding achievement in the quality list of more than 1.5 lakh candidates across the country in the tough examination of Common Admistate conducted in 2019 on the strength of her parents' dedication, stubbornness and self-confidence. Notably, she quit her government scholarship to pursue a career in her field of interest, but despite failing twice, her journey to reach the goal of Damini is definitely inspiring to the Beed girls. After a year of training at the academy in Hyderabad, she will join the Indian Air Force as a Flying Officer.

Devdi is a native village of Damini Deshmukh in Vadwani taluka of Beed district. Diliprao Deshmukh, father of Diliprao Deshmukh of the peasant family, had a great passion for education, so he left the village for a job and became a judge by working hard in the MPSC examination. Prior to that, he also worked as a government lawyer. He is presently the Assistant Commissioner of Charities in Pune. With a keen interest in education, she also wanted her children to grow up and pursue careers. Dilip has two daughters and a son. Among them, Damini is a very intelligent and hard working person. Damini's education up to Class X was done at the Rani Laxmibai Girls' Military School in Pune. Diliprao was replaced every three years due to his job. So four schools were changed. However, Damini was educated at Rani Laxmibai Girls' School in Pune from 5th to 12th as a school that gave equal importance to sports and education in order to get education from one school. He got 95.82 per cent marks in Class X and 87.50 per cent in XII. In this residential school, military training teaches equestrian, karate, yoga archery, rifle shooting as well as various sports such as hollow, volleyball, basketball, handball. After the twelfth she received a four lakh Inspire scholarship from the Government of Maharashtra. However, Damini wanted to pursue a career in the Air Force in his preferred field. So after the twelfth she enrolled in engineering and obtained a degree in engineering from the mechanical branch. While in military school, various sports such as equestrian, karate yoga, archery, Royal Shooting, Kho Kho, Volleyball, Basketball were taught in training. When I was eighth, there was a career guidance camp and it was only after getting one direction that I decided to pursue a career in the Air Force. Damini continued her journey in this direction. Graduation is compulsory to enter the Air Force. A Common Admission Test is conducted at the country level for the post of Flying Officer. About 1.5 lakh students from across the country take the exam. One and a half to two thousand students succeed in this. Outdoor games, personality tests are conducted. Medical is also tested. They are then interviewed by the Air Force Selection Board. Damini Deshmukh has achieved this success by going through all this difficult process. In this test, the ratio of the national quality to the list is three to four percent. She will become a Flying Officer after a year of training at the Air Force Academy in Hyderabad. She left for training in Hyderabad in the first week of January. Damini Deshmukh is the granddaughter of SM Deshmukh, a journalist from Maharashtra. The freedom and encouragement given by her parents has shown a great deal of compassion.

Earned rewards
While passing the eighth, passed the Maharashtra Knowledge Scholarship Exam
adventuer mourtaineering course HP
basic mountaineezing course Himachal Pradesh selected as the best trainee
Black belt in martial arts karate
Four lakh scholarship from Government of Maharashtra for higher education
Silver medal in state level karate competition
Participate in the state level archery competition

Damini's advice to students
While studying, everyone should set a goal in front of his eyes. Whatever career you may face in your career, you should find ways to reach it. If you fail in the field, there should be another option.

Failure to come twice
Passing the exam for the post of Flying Officer is not an easy matter. There are over three lakh candidates from across the country for this exam. After passing the written test twice, Damini could not be successful in the interview. Damini has been selected as a Flying Officer in the Air Force in 98 candidates and 20 to 25 girls across the country, without having to give up.

Studied doing a job
Damini's main goal was to make a career in the Air Force. After earning an engineering degree, he worked for two months at Tata and Kirloskar. While doing her job, she did a self study for the position of Flying Officer.

Proud of a girl's duty
The discrimination that occurs between boys and girls

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda