वर्दीतला दर्दी अन् कर्तव्यकठोर आयर्न मॅन आयजी डॉ.रविंन्द्रकुमार सिंगल

By Naukari Adda Team


वर्दीतला दर्दी अन् कर्तव्यकठोर आयर्न  मॅन आयजी डॉ.रविंन्द्रकुमार सिंगल, Aurangabad Territory

अशोक वाणी 

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.रविंन्द्रकुमार सिंगल या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा थक्क करणारा प्रवास

हौसले जिनके अकेले चलनेके होते है
एक दिन उनके पीछे ही काफीले होते है....

या ओळी सार्थ करणारा प्रवास आहे राज्यातील पोलिस दलातील केलेल्या कामगिरीतुन आपल्या कर्तत्वाची मुद्रा उनटवणारा अन एक खमक्या अधिकारी व आयर्न मॅन हा किताब पटकावुन पोलिस दलाची शान वाढवणारे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आयपीएस ऑफीसर डॉ.रविंन्द्रकुमार सिंगल या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा. त्यांच्या मागेपुढे धावणारा पोलिसांचा ताफा दिसतो. मात्र त्यांनी या स्वप्नपुर्तीसाठी जिद्द,चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( युपीएससी) परिक्षेत तीनवेळा आलेल्या यशाने खचुन न जाता नव्या जोमाने अभ्यास केला. अखेर चौथ्या प्रयत्नात युपीएससी परिक्षेचा गड सर करूण असामान्य यशाला गवसणी घालुन ते आपीएस ऑफीसर झाले .पोलिस दलातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीतुन त्यांचा प्रवास आज आयजी पदाच्या सोनेरी पानापर्यंत पोचला आहे.डॉ.सिंगल हे सद्या औरंबाबाद परिक्षेत्राला आयजी म्हणून लाभले ही एक आनंदाची बाब आहे. त्यांचा हा प्रवास आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणाईसाठी नक्कीच प्रेरणादाई ठरेल

                              केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेचा गढ सर करूण डॉ.सिघल ४ सप्टेंबर १९९६ मध्ये आयपीएस झाले. हरियाणा येथील रोटक जिल्ह्यातील निंदाणा हे त्यांचे मुळे गाव. आई वडिल सहा बहीणी असे कुटुंब. वडिल झिले सिंह हे पोलिसात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फौजदार या पदावर नौकरीला होते. त्यामुळे गाव सोडुन दिल्ली येथील पोलिस लाईनमध्ये सर्व कुटुंब राहत होते. डॉ.सिंगल यांचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातुन झाले. पोलिस लाईनमध्ये असतांना दिल्ली येथील सरस्वती सिशु मंदिर शाळेत तीसरी पर्यंत तर बलवंतराव मेहता विद्याभवन येथे दहावी पर्यंत शिक्षण झाले. तल्लख बुद्धी आणि हुशारी हे त्यांचे विशेष गुण त्यामुळे अभ्यासात अतिशय हुशार असायचे. भविष्यात मोठा अधिकारी होईल असे शिक्षकांना वाटायचे आणि ते खरेही ठरले म्हणा. दहावीला उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या नंतर दिल्ली येथीलच गव्हरमेंट कॉलेजमध्ये ११वी १२ वी चे शिक्षण झाले. बारावी नंतर पूढे इंजिनिअरिंग करण्याचे ठरवीले. नामांकीत अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रवेश घेवुन इलेकट्रीकल इंनिनिअरींगचे चार वर्षाचे शिक्षणही पुर्ण केले. त्यानंतर एक वर्ष नौकरी केली. पुढे दिल्ली गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या प्रयव्हेट कंपनीत चार वर्ष विद्युत अभियंता म्हणून नौकरी केली. एकीकडे मोठ्या पगाराची नौकरी मिळाली तरी ते समाधानी नव्हते. कारण त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न अजुन अपुर्णच होते. स्वप्न हे स्वप्नच राहु द्यायचे नाही तर कोणत्याही परिस्थिीतीत ते प्रत्येक्षात उतरवायचे या विचारात ते असायचे. मनाशी पक्का निर्धा केला आणि केंद्रीय लोकासेवा आयोगाच्या(युपीएससी) परिक्षेच्या तयारीला लागले. एकीकडे नौकरी करायची तर दुसरीकडे रिकाम्या वेळेत अभ्यास असा दिनक्रम सुरू झाला. परंतु अभ्यासासाठी वेळ कमी पडु लागल्याने अखेर डॉ. सिंगल यांनी नौकरीचा राजीनामा देवुन स्वताहाला पुर्ण वेळ अभ्यासात झोकुन दिले. प्रचंड मेहनतीनंत सुद्धा तीन वेळा युपीएससी परिक्षेत अपयश आले. आलेल्या आपयशाने ते खचले नाहीत तर पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले.अखेर जिद्द मेहनत आणि अभ्यासातील सातत्यावर चौथ्या प्रयत्नात यश आले व आयपीएस या असामान्य यशाला गवससनी घालती. आपला मुलगा आयपीएस झाल्याचे समजतात आई वडिलांना आनंदाने आभाळ ठेंगणे वाटु लागले. त्यानंतर नाशिक येथे काही दिवसाची ट्रेनींग घेतल्यानंतर ४ सप्टेंबर १९९६ मध्ये भारतीय पोलिस सेवेत पदार्पण करूण सांगली येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून पदभार घेतला. १२.९.१९९८ ते २००० पर्यंत सांगली येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर दोन वर्ष अमरावती येथे पोलिस उपायुक्त म्हणून सेवा बजावली. 2002 ते 2004 पर्यंत नाशिक पोलिस अधिक्षक म्हणून काम केले. नाशिक येथील त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. याच कालावधी मध्ये नाशिक मधील त्र्यंबकेश्वर परिसरात कुंभमेळा आयोजिक करण्यात आला होता. लाखोंच्या संख्येने असलेली गर्दी त्याचे नियोजन हे त्यांच्यापूढे मोठे आव्हानात्तक काम होते. मात्र डॉ.सिंघल यांच्या उत्कृष्ठ नियोजनामुळे कुंभमेळा शांततेत व यशस्वीरित्या संपन्न झाला. त्यांच्या या कामगिरीची राज्य सरकारने दखल घेवुन त्यांचा सन्मान केला.
पुढे 2004 ते 2005 दरम्यान धुळे येथे पोलिस अधिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर युनाटेड नेशन्स कोसोव्हा येथे प्रतिनियुक्तीवर काम केले,त्यानंतर डिजीपी कार्यालयात काही काळ सेवा केली. 2007 ते 2009 मध्ये नांदेड पोलिस अधिक्षक म्हणून काम केले
2009 ते 2010 पोलिस अधिक्षक रेल्वे नागपुर म्हणून काम, त्यानंतर 2.6.2010 मध्ये त्यांना डिआयजीच्या पदावर पदोन्नती मिळाली. नागपुर येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) म्हणून काम, 2010 ते 2014 दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे एससीझेडसीचे संचालक म्हणून काम केले. यावेळी त्यांना भारतीय संस्कृती बद्दल माहीती मिळविन्याची संधी मिळाली. त्यानंतर ठाणे शहर येथे पोलिस आयुक्त (अपराध शाखा) म्हणून काम, एक वर्ष मुंबई रेल्वेचे पोलिस आयुक्त म्हणून काम, 2016 मध्ये मुंबई पोलिस हेड क्वार्टर येथे विशेष आयजीपी म्हणून कर्तव्य, पुढे परत नाशिक येथे पोलिस आयुक्त म्हणून काम केले. आणि त्यानंतर 2019 पासुन डॉ.सिंगल हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कर्तव्य बजतावत आहेत. त्यांना सामाजिक कार्यात आवड आहे. राज्याच्या पोलिस दलातील खमक्या अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ.सिंगल आयजी म्हणून आल्यापासुन त्यांचे काम उल्लेखनीय ठरत आहे. त्यांनी कम्युनिटी पोलिसिंग द्वारे सामाजिक उपक्रम राबवुन औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना, येथे पोलिसांतर्फे श्रमदान करूण बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला पोलिस समाजासाठी पुढे येत असल्याचा संदेश गेल्याने इतर लोकही त्यासाठी पुढे सरसावत आहेत असे ते म्हणतात.

पोलिस अधिकाऱ्यांना पाहुन मिळाली प्रेरणा
वडिल झिले सिंह हे दिल्ली पोलिसात खात्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांचा प्रवास पूढे पोलिस उपायुक्त पदापर्यंत पोचला. पोलिस लाईन मध्ये राहत असतांना पोलिस अधिकारी पाहायला मिळायचे. आयएएस, आयपीएस, अधिकाऱ्यांचा रूबाब, मागेपुढे धावणारी यंत्रणा याचे नवल वाटायचे. विशेष म्हणजे डॉ.सिंघल यांना येथुनच प्रेरणा मिळाली आणि जिवनात आयपीएस होण्याचे ध्येय निश्चीत केले. अखेर वयाच्या २७ व्या वर्षी जिद्द मेहनत अभ्यासाच्या जोरावर त्यांनी गरूड भरारी घेवुन आयपीएस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले.

अशी केली युपीएएसीची तयारी
जोपर्यंत ध्येयाला गवसणी घालत नाही तोपर्यंत ध्येयवेडी माणसं थांबत नसतात. डॉ.सिंगल यांनी इंजिनिगरिंगचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर दिल्ली येथील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) या प्रायव्हेट कंपनीमध्ये विद्युत अभियंता म्हणून नौकरीला लागले. मोठ्या पगाराची नौकरीही मिळाली मात्र आयपीएस होण्याचे ध्येय अजुन तसेच होते त्यामुळे नौकरीत त्यांना समाधान वाटत नव्हेत. नौकरी करूण युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. तीन वर्ष नौकरी करूण सोडली आणि पुर्ण वेळ अभ्यासात झोकुन दिले. काही विषयांची तयारी करण्यासाठी क्लासेस लावले, आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. अनेक पुस्तकांचे वाचन केले. 10 ते बारा तास अभ्यास केला. युपीएससी परिक्षेत तीन वेळा अपयश आले तरीही जिद्द सोडली नाही अखेर चौथ्या प्रयत्नांत त्यांनी युपीएससीचा गढ सर केला आणि आयपीएस होण्याचे स्वप्न पुर्ण केले.

बीडच्या तरूणाईला डॉ.सिंगल यांचा सल्ला
जिवनात काय मिळवायचे आहे याचे अगोदर ध्येय निश्चीत केले पाहीजे. मग ते ध्येय मिळवितांना कोणतीही परिस्थिती आली तरी मार्ग बदला पण ध्येय बदलु नका, एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल. मराठवाडा व बीड जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत त्यांच्यामध्ये टॅलेंन्ट आहे हे मी दिल्लीला युपीएससी परिक्षेची तयारी करताना पाहीलेले आहे. आज बीड जिल्ह्यातील बरेच जण स्पर्धा परिक्षेत यशस्वी होवुन मोठ्या पदावर काम करत आहेत.(डॉ.रविंन्द्रकुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र)

वडिल पोलिस खात्यातुन निवृत्त झाले
अन् माझ्या अंगावर वर्दी आली...

माझे वडिल जिले सिंह हे दिल्ली पोलिस खात्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ए एसआय) पदावर कार्यरत होते. १९९६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पण माझ्या जिवनात एक योगायोग आला तो मी कधीच विसरू शकत नाही. तो म्हणजे माझे वडिल ज्या दिवशी पोलिस खात्यातुन निवृत्त झाले त्याच दिवशी माझ्या अंगावर खाकी वर्दी आली. मी पोलिस खात्यात वरिष्ठ पदावर रूजु झालो. हा प्रसंग कोणाच्याच जिवनात आला नसेल असे मला वाटते.
एरवी नौकरीतुन निवृत्त होतांना अनेक अधिकारी सद्दगदीद होतात. वडील याला अपवाद ठरले. मी पोलिस खात्यात रूजु झाल्यामुळे आमच्या घरात खाकी वर्दी कायम राहीली असे ते म्हणत असत.

गर्दी नियोजनात हातखंडा
2003 च्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुयोग्य नियोजनामुळे डॉ.सिंगल यांच्याकडे 2008 मध्ये नांदेडच्या गुरूदा गद्दी या शिखबंधुच्या धार्मीक उत्सवाचे नियोजन सोपविन्यात आले होते. दोन्ही ठिकाणी ते पोलिस अधिक्षक होते. 2015 मध्ये पुन्हा कुंभमेळ झाला. पहील्या शाही स्नानानंतर काही अडचणी आल्या. त्यामुळे डॉ.सिंगल यांना पुन्हां बोलविन्यात आले. गर्दीचे व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. कुंभमेळ्याबाबत केलेले सुयोग्य नियोजन व गर्दी हाताळण्याचे विशेष प्रयत्न यांची दखल घेवुन शासनाने त्यांचा यथोचीत सन्मान केला.

शिक्षणातही चढता आलेख

*बॅचलर ऑफ इंजीनिरिंग (इलेक्ट्रिकल)
*कला शाखेतुन पदव्युत्तर पदवी
*माहिती तंत्रज्ञान पदविका
*जनसंवाद व वृत्तपत्र,पत्रकारिता पदवी
*एमबीए पदवी
*पी.एच.डी (व्यवस्थापन शास्त्र)
*ऑनलाईन कोर्स
*जागतिक दहशदवाद प्रमाणपत्र
*पीस किपींग मध्ये एथिक्स प्रमाणपत्र
*सुरक्षा उपाय योजनांसाठी सट्रिफीकेट कोर्स,
*युनायटेड नेशन्स कमांडिंग प्रमाणपत्र
*संघर्ष व्यवस्थापन
*संघर्ष उभारणी प्रक्रिया
*प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण

ब्लॉग अन् पुस्तकांचे लेखन
भारतीय पोलिस सेवेते आयजी म्हणून कर्तव्य बजावत असतांना उर्वरित वेळेत आरोग्य,पर्यावरण यासह इतर विषयावर ब्लॉग लिहीतात. तसेच तीन पुस्तक लिहीले आहेत.
         फ्रान्सच्या विचीमध्ये 2018 मध्ये आयर्न मॅन स्पर्धा झाल्या.जगभरातील तेराशे सर्धाक सहभागी झाले होते.महाराष्ट्रातुन भारतीय पोलिस सेवेतील(आयपीएस) एकमेव अधिकारी म्हणून सहभागी झाले होते.स्पर्धेत, चार किलोमीटर पोहणे,108 किलोमीटर सायकलींग,42 किलोमीटर धावणे या तीन स्पर्धा सोळा तासामध्ये पुर्ण कराव्या लागतात.मात्र डॉ.सिंगल यांनी पंधरा तास तेरा मिनीटात या स्पर्धा पुर्ण करूण आयर्न मॅनचा किताब पटकावाला त्यामुळे त्यांनी देशाची मान उंचावली आहे.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Aurangabad Territory's Special Inspector General of Police, Dr. Ravindra Kumar Singal

By Naukari Adda Team


Ashok Vani

Aurangabad Territory's Special Inspector General of Police, Dr. Ravindra Kumar Singal

Freshman who has to walk alone
One day there are plenty behind them ....

The journey that accomplishes these lines is the passionate personality of Dr Ravindrakumar Singal, IPS officer, Special Inspector General of Police, Aurangabad area, who unveils his duty through the work of the police force in the state. The policemen running behind them are seen. But they were determined to persevere, persevere and work hard to achieve this dream. The three-time achievement of the Central Public Service Commission (UPSC) exam was a fresh test. Finally, on the fourth attempt, he succeeded UPSC Examiner for his remarkable achievement .His journey has reached the golden page of IG post. Their journey will surely be inspiring for the young people who dream of becoming IPS

Dr. Sehgal, the founder of the Central Public Service Commission (UPSC) exam, became IPS on September 9, 1979. His native village is Nindana in Rotak district of Haryana. Family of six parents. Elder Zile Singh served as Assistant Police Deputy Inspector Faujdar in the police. So, leaving the village, all the families were staying in the police line in Delhi. Dr. Singal's education came from the English medium. While in the police line, Saraswati Sishu Mandir School in Delhi got education till the third and Balwantrao Mehta Vidya Bhavan till Class X His special qualities of brilliant intellect and ingenuity, therefore, made him very clever in his studies. Teachers would think that they would become great officers in the future and say that was true. After passing the 10th standard, he got his education in Government College, Delhi. XII then decided to go ahead with engineering. He completed four years of electrical engineering by joining a renowned engineering college. He then worked for a year. Later, he worked for four years as an electrical engineer in a private company, Delhi Gas Authority of India Limited. On the one hand, he got a big salary job but was not satisfied. Because their dream of becoming an IPS is still completely unfulfilled. They did not want the dream to be a dream, but in any case, they had to think it over. He was determined and prepared for the Central Public Service Commission (UPSC) examination. On the one hand there was a job to do the job, and on the other hand, the practice of free time started. But as time is short for study, Dr. Singal resigned from his job and offered himself full time to study. The UPSC exam failed even three times due to enormous hard work. They did not suffer from the catastrophe, but resumed their studies. Finally, the fourth attempt at hard work and persistence in the study succeeded and the IPS had an unusual success. The parents felt that their son had become IPS. After taking a few days training in Nashik, Karun Kaur, who made his Indian police service on September 9, 1979, took over as Sangli. He served as the Superintendent of Police in Sangli from 6.1989 to 6. He then served as Deputy Commissioner of Police in Amravati for two years. He served as Superintendent of Police in Nashik from 2002 to 2004. His performance at Nashik was remarkable. During this period, Kumbh Mela was organized in Trimbakeshwar area in Nashik. Planning a crowd of millions was a major challenge ahead of them. However, with the excellent planning of Dr. Singhal, the Kumbh Mela was held in peace and successfully. He was honored by the state government for his performance.
Later, he worked as a police superintendent in Dhule between 2004 and 2005. He then worked on deployment to the United Nations Kosova, then served for some time in the DGP office. Nanded served as Superintendent of Police from 2007 to 2009
He served as Superintendent of Railways Nagpur from 2009 to 2010, and was promoted to the post of DIG on 2.6.2010. Worked as Additional Police Commissioner (Crime) at Nagpur, 2010-2014 Director of SCZC of South Central Area Cultural Center. At this time, they had the opportunity to learn about Indian culture. He then worked as the Police Commissioner (Crime Branch) in Thane City, one year as the Police Commissioner of Mumbai Railway, in 2016 as the Special IGP at the Mumbai Police Headquarters, then returned to Nashik as the Police Commissioner. And since 2019, Dr. Singal has been serving as the Inspector General of Police in the Aurangabad area. They love social activities. His work has been remarkable since Dr. Singal IG, who is known as the Chief Officer of the police force in the state. He initiated social activities through community policing and started construction of Shraddan Karun Bandas by the police in Beed, Jalna, Aurangabad area.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda