एमबीबीएस डॉक्टर ते आयपीएस

By Naukari Adda Team


एमबीबीएस डॉक्टर ते आयपीएस, MBBS Doctor to IPS

अशोक वाणी

श्रेणिक लोढा यांनी युपीएससीचा गड सर करूण देशातुन मिळविला 133 वा रँक

बीड जिल्ह्याची ओळख आतापर्यंत ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि राजकीय ख्याती असलेला अशी होती त्यानंतर क्रिडा क्षेत्रासह चित्रपट सृष्टीतही येथील ताऱ्यांनी संपुर्ण राज्यासह देशात आपले नाव कमावले. मात्र आता बीड जिल्ह्याची ओळख ही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून होवु लागली आहे. येथील तरूण मेहनत, जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन यश मिळवत आहेत. यामध्ये बीडचे भुमीपुत्र नुकतेच आयपीएस झालेले श्रेणिक दिलीप लोढा यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तब्बल चार वेळा प्रयत्न करूणनही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत आलेल्या अपयशाने खचुन न जाता पुन्हा जोमाने अभ्यास केला अन अखेर 2018 मध्ये झालेल्या युपीएससी परिक्षेचा गड सर करूण दाखवला. त्यांना देशातुन 133 वा रँक मिळवुन आयपीएसमध्ये त्यांनी आपली पात्रता सिद्ध तर केलीच मात्र बीड मधुन पहीले आयपीएस होन्याचा बहुमानही मिळविला. गुणवत्ता ही फक्त महानगराचीच मक्तेदारी नाही तर मेहनत आणि प्रयत्नांच्या जोरावर बीड जिल्ह्यातील तरूण सुद्धा एमपीएससी, युपीएससी परिक्षेत यशस्वी होवु शकतात हा आदर्श श्रेणिक लोढा यांनी घालुन दिला आहे. सुरवातीला एमबीबीएस डॉक्टर आणि आता आयपीएस अशी आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटविणाऱ्या श्रेणिक यांचा प्रवास हा बीडच्या तरूणाईला एक नवीन दिशा आणि आदर्श देणारा ठरेल.

                            काही वर्षापासुन बीडमध्ये आता कष्टाळु आणि प्रयत्नवादी युवकांची पिढी घडु लागली आहे. जिल्ह्यामधुन आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडु लागले आहेत ही एक अभिमानाची बाब आहे.येथील तरूणांनी जर एकदा ठरवले तर यश नक्कीच खेचुन आणु शकतात हे आयपीएस झालेल्या श्रेणिक दिलीप लोढा यांनी दाखवुन दिले आहे. बीड शहरातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते दिलीप लोढा यांचे श्रेणिक हे सुपुत्र आहेत. दिलीप लोढा हे मुळचे चौसाळा येथील. मात्र उद्योगधंद्याच्या निमित्ताने काही वर्षापासुन ते बीड शहरात स्थायीक आहेत. त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने उद्योग व्यावसायात जम बसवुन आज ते एक नामांकीत उद्योजक झाले आहेत. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा सुदर्शन, दुसरा श्रेणीक आणि सर्वांत लहान मुलगा. आपल्या वडीलांनी उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी किती मेहनत घेतली हे त्यांनी शालेय शिक्षण घेतांना आपल्या डोळ्यांनी पाहीले होते.परिस्थितीमुळे आपल्याला जास्त शिकता आले नाही मात्र आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आणि मोठे अधिकारी बनवायचे असे स्वप्न दिलीप लोढा आणि त्यांच्या पत्नी ज्योती लोढा यांनी पाहीले होते. शिक्षणाबद्दलची आवड मुलांच्या मनामध्ये अधिकाधिक निर्माण करण्याचे काम या दोन्हींही दाम्पत्यांनी केले. शिक्षणामुळे अनेकांच्या जिवनात झालेले परिवर्तन त्यांनी पाहीलेले होते त्यामुळे आपल्या मुलांना मोठे अधिकारी बनवायचे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगले होते आणि ते स्वप्न खरेही झाले. दुसरा मुलगा श्रेणिक दिलीप लोढा हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. शहरातील सेन्टेन्स इंग्लिश स्कूल येथे श्रेणिक यांचे पहीली ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातुन झाले. त्यामुळे इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीने अवगत झाले. शाळेत असतांना अभ्यासात हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचे असलेले श्रेणिक यांचे शिक्षकांना आणि आई-वडीलांना मोठे कौतुक वाटायचे. दहावी मध्ये उत्तम गुण मिळाल्यानंतर डॉक्टर होण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादला जाण्याचे ठरविले. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात 11 वी 12 वीचे शिक्षण पुर्ण केले. बारावीला उत्तम गुण मिळाल्यानंतर सिईटीची परिक्षी दिली. यामध्ये श्रेणिक यांनी उत्तम गुण मिळवीले यामुळे श्रेणिक यांचा वैद्यकीय एमबीबीएस शिक्षणासाठी ससुन हॉस्पीटल बी.जे.मेडीकल कॉलेज पुणे येथे नंबर लागला. त्यानंतर साडेचार वर्षाचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करूण एक वर्षाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. एक दिवस कॉलेज मध्ये आयएएस डॉ.श्रीखर परदेशी यांचे लेक्चर होते. त्यांचे लेक्चर ऐकल्यानंतर श्रेणिक यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरविले आणि येथुन त्यांचा प्रवास सुरू झाला आणि स्पर्धा परिक्षेकडे वळले. मोठा भाऊ हा दिल्लीला केईएममध्ये एमबीबीएस पूर्ण करूण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेची तयारी करत होता. भावाच्या मार्गदर्शनाखाली श्रेणिक यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. बारा ते अठरा तास अभ्यास केला. 2014 पासुन ते 2018 पर्यंत श्रेणिक यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पाच वेळा परिक्षा दिली. युपीएससीच्या दोन परिक्षामध्ये लेखी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानंतर थेट मुलाखतीसाठी निवड झाली. दिल्ली येथे मुलाखती दिल्या परंतु यशाने हुलकावनी दिली. मात्र अपयश आले म्हणून श्रेणिक हे थांबले नाहीत तर पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले. काहीही झाले तरी आपल्याला ही स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण व्हायचेच असा त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता. आपण अभ्यासात नेमके कोठे कमी पडतोय याचे त्यांनी आत्मपरिक्षण केले. त्यानंतर मुलाखतीत यशस्वी होवुननही ॲन्सर राईटिंगमध्ये कमी पडल्यानेच आपण अयशस्वी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि पुर्ण तयारीनिशी अखेर 2018 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला ते मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे गेले. लेखी परिक्षेत उत्तम गुण मिळाले आणि मुलाखतीतही यश मिळाले. अखेर बीडच्या या भुमीपुत्राने 2018 च्या युपीएससी परिक्षेत भारत देशातुन 133 वा रँक मिळवुन आयपीएसमध्ये आपले स्थान पक्के करूण यशाची गुढी उभारलीच यामुळे बीडकरांचीही मान अभीमीनाने उंचावली. आपला मुलगा आयपीएस झाल्याचे समजतात आईवडिलांना आनंदाने अक्षरशाहा आभाळ ठेंगणे वाटु लागले. श्रेणिक हे तसे बीड मधुन पहीलेच आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे या बीडच्या भुमीपुत्राचा बीडकरांना मोठा अभीमान आहे. श्रेणिक हे आता लवकरच मसुरी उत्तराखंड येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यानंतर हैद्राबाद येथे प्रशिक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी मिळाली प्रेरणा.
प्रत्येकाला आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कोठुन तरी प्रेरणा मिळत असते यातुनच तो व्यक्ती यशस्वी होत असतो. अशीच प्रेरणा श्रेणिक यांना वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना मिळाली. श्रेणिक यांचे पुणे येथे बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण चालु असतांना एका दिवशी आयएएस अधिकारी डॉ.श्रीखर परदेशी यांचे लेक्चर ऐकले आणि त्यामुळेच श्रेणिक यांच्यात परिवर्तन झाले आणि पुढे आपल्यालाही आयएएस अधिकारी होवुन लोकांची सेवा करायचे त्यांनी ठरविले. एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करूण आयपीएस अधिकारी झाले.

अशी केली युपीएससीची तयारी
अभ्यासातील सातत्य, मेहनत, जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वाच्या बळावर अखेर पाचव्या प्रयत्नात श्रेणिक यांनी युपीएससीचा गड सर केला.
एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर श्रेणिक लोढा यांनी थेट दिल्ली गाठली आणि 2014 पासुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(युपीएससी) परिक्षेची तयारी ही त्यांचे मोठे बंधू सुदर्शन लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. या परिक्षेसाठी विविध पुस्तकांचा अभ्यास केला. भुगोल, पर्यावरण, चालु घडामोडीसाठी वर्तमानपत्रांचे नियमीत वाचन याचबरोबर ॲन्सर राईटिंगवरही अधिक भर दिला. दरदीवस बारा ते अठरा तास अभ्यास केला. चार वेळेस परिक्षा दिल्यानंतरही अपययशच आले. अखेर पाचव्या प्रयत्नानंतर युपीएससी परिक्षेत यश मिळाले आणि भारतातुन 133 वा रँक मिळवुन आयपीएस मध्ये आपले स्थान निश्चीत केले.

बीडच्या तरूणाईला सल्ला
अभ्यासाची आणि मेहनतीची तयारी असेल त स्पर्धा परिक्षेमध्ये तरूणांना खुप संधी आहे.येथील तरूण जेव्हा दिल्ली येथे युपीएससीची तयारी करण्यासाठी येतात तेव्हा पहील्या परिक्षेत अपयश आल्यानंतर परत बीडला येतात.मात्र तसे न करता तीन चार वेळा परीक्षा दिली पाहीजे तेव्हा यश मिळते.मला पाचव्या प्रयत्नात यश आले.बीडची विद्यार्थी हुशार आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहेत इतर राज्यातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करतांना ते कोठेही कमी पडु शकत नाहीत.आयपीएस झालो असलो तरी मला अजुन एक संधी आहे.आयएएस होण्याचे माझे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणारच (श्रेणिक दिलीप लोढा,बीड )


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MBBS Doctor to IPS

By Naukari Adda Team


Rankik Lodha earned UPSC's title from Karun Kaur 133rd

Beed district was known for being an avid laborer district and political fame till then. However, the identity of Beed district is now being introduced as a district of IAS and IPS officers. Here the youngsters are gaining success through competitive exams on the strength of hard work and stubbornness. In this, the name of Dilip Lodha, the recently deceased IPS officer of Bhumiput of Beed, must be mentioned. Despite repeated attempts four times, the failure of the Central Public Service Commission (UPSC) Examination was done again and again. Not only did he prove his eligibility in IPS by earning him the 133rd rank in the country but he also won the first IPS honors from Beed. Quality is not only a monopoly of the metropolis but due to the hard work and effort, the youth of Beed district can also succeed in the MPSC, UPSC examination. Beginning with MBBS Doctor and now IPS, Kritik's journey will provide a new direction and ideal for the young people of Beed.

For a few years now, a generation of hard working and hard-working youth has started to flourish in Beed. It is a matter of pride that IAS and IPS officers are starting to come from across the district. If youths decide once, success can be achieved if they decide to do so. He is the son of category of Dilip Lodha, an entrepreneur of Beed city. Dilip Lodha is a native of Chausala. However, they have been permanent in Beed city for some years due to industry reasons. He has become a renowned entrepreneur today with great stubbornness and hard work. They have three children. Older son Sudarshan, second grader and youngest son. Dilip Lodha and his wife, Jyoti Lodha, had dreamed of teaching their children well and becoming a great officer. Both couples worked to create more and more children's interest in education. They had seen the many changes in their lives due to education, so they had dreams of making their children great officers and that dream came true. Another son, Dilip Lodha, was very talented in the study. At Sainte's English School in the city, Graduate's education in grades one through tenth was through English medium. As a result, they became well acquainted with the knowledge of the English language. While in school, the teacher and parents of the talented and talented intellectuals in the study were greatly appreciated. He decided to become a doctor after getting good marks in class X. He then decided to go to Aurangabad for further education. He completed his 11th and 12th education at Deogiri College, Aurangabad. After the best score of XII passed the exam of the citi. In this category, category was achieved by category, which led him to get honors at Sasun Hospital BJ Medical College Pune for his medical MBBS education. He completed MBBS education for one and a half years and also completed one year training. One day a lecture was given by IAS Dr. Shrikhar Pardeshi in college. After listening to his lectures, Rangeik decided to become an IAS officer, and his journey started from here and the competition turned to examination. The elder brother was preparing for the Central Public Service Commission (UPSC) examination, completing his MBBS in KEM in Delhi. Under the guidance of his brother, category started preparations for the Central Public Service Commission competition. Twelve to eighteen hours of study. From 2014 to 2018, Rangeik conducted five examinations of the Central Public Service Commission. After a written pass in two UPSC exams, he was selected for a live interview. Interviews were given here in Delhi but success was shocking. However, due to the failure, the category did not stop, but the study began again. Whatever the case, he was determined to win the competition. They self-examined where exactly we were falling short in the study. After that, even after the interview was successful, they realized that they were failing due to a lack of writing experience. And with full preparation, he finally came to the Central Public Service Commission examination in 2018 with great confidence. The written test yielded good marks and the interview was successful. In the end, this Bhumaiputra of Beed raised the honor of winning the Bidkar as he secured his place in IPS by securing 133rd rank from India in the 2018 UPSC Examination. The parents thought that their son had become IPS. Category is the first IPS officer from Beed to do so. Therefore, the Bhumiputra of this seed has a great deal of privilege. Category is now Mussoorie in Uttarakhand soon


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda