IAS आणि IPS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच केलं लग्न

By Naukari Adda Team


IAS आणि IPS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच केलं लग्न, IAS and IPS boyfriend-boyfriend got married in the office

IAS आणि IPS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच केलं लग्न

 

अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे विवाहासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नसल्याने एका IAS अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच IPS प्रेयसी सोबत विवाह केला. तृषार सिंगला असे या आयएएस अधिकाऱ्याने नाव आहे. ते २०१५ बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तृषार सिंगला उलुबेरियामध्ये एसडीओ पदावर कार्यरत आहेत.

व्हॅलेंटाइन्स डे च्याच दिवशी तृषार सिंगला यांनी आपल्या ऑफीसमध्ये नवजोत सिम्मी यांच्याबरोबर रजिस्टर पद्धतीने विवाह केला. नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची सध्या पाटण्यामध्ये पोस्टिंग आहे. त्या डीएसपी म्हणून सेवा बजावत आहेत. या लग्नासाठी नवजोत सिम्मी खास पाटण्याहून बंगालला आल्या होत्या.

नवजोत आणि तृषार दोघेही पंजाबचे असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमाचे हे त्यांचे नाते विवाहामध्ये बदलले आहे. लग्नासाठी तृषार यांना पंजाबला जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी कार्यालयातच विवाहाचा निर्णय घेतला अशी माहिती सिंगला यांच्या एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विवाहानिमित्त खास स्वागत समारंभ आयोजित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. एकत्र राहता यावे, यासाठी दोघे केडर बदलण्याचा विचार करत आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IAS and IPS boyfriend-boyfriend got married in the office

By Naukari Adda Team


IAS and IPS boyfriend-boyfriend got married in the office


Due to a very busy schedule, it is not possible to schedule a separate wedding, but an IAS officer married an IPS lover in his office. This IAS officer is named after Trishar Singh. He is an officer of 7 batch West Bengal cadre. Trishar Singh is working for SDO in Uluberia.

On Valentine's Day, Trishar Singla married Navjot Simmi in his office in a register manner. Navjot Simmi is an IPS officer of the 8-batch Bihar cadre. He is currently posting in Patna. He is serving as DSP. Navjot Simmi had come to Bengal from Patna for this wedding.

Navjot and Trishar are both from Punjab, and have been in love affair for many years. This relationship of love has turned into a marriage. Singh was not able to go to Punjab for marriage, so they decided to get married in the office, said employees of Singla's SDO office. He has promised to hold a special reception for the wedding after the assembly elections of 9 in Bengal. The two are planning to change the cadre to stay together.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda