दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली

By Naukari Adda Team


दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली, Story of Quick Heal Antivirus

नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलेलं.  पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी  कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल?

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.  सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं,

” याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं  ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर  कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं

क्विक हील.

साल होत १९९५.

quick heal company founder

संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.

आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय यावर कोण विश्वास ठेवणार नाही.

तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल.
 "हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलान"

Quick heal antivirus official website

Quick heal antivirus download


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Story of Quick Heal Antivirus's Birth

By Naukari Adda Team


Kailash Katkar Biography

By cutting the boat Kailas. The village is originally Rahimpur in the Satara district. To stay in Narvir Tanajiwadi in Shivajinagar, Pune. Helper, mother to houseworker at Father Phillips Company. A younger brother and a sister. Such a family of five lived in a small room in Natawadi.

Kailash was the first. So everyone expects from him. No matter the circumstances of the house, he was placed in an English medium school. No money to buy books, with no money to pay fees. Kasabas weeping reached the tenth. But after the tenth year, the book became a rallying cry and started learning the truth. Practical education that teaches life.

Likewise, Kailas loved to deal with the spoils of his childhood as a child. Seeing his father started repairing the radio while he was in VI. I had done a one month course about it. He started looking for a job without waiting for the Class X results.

One day he saw an ad in a paper, in a company that needed a calculator fix. Calais never even saw a calculator in his life. He did apply. He was selected from the twenty-five destined for the interview. Built-in toughness came in handy. Not only did he learn calculator work, but he also started to repair various machinery, such as laser posting machines, facet machines in banks.

No matter how much, how many days will a diligent person stay quiet in his job?

He quit his job and started his own repair shop in Peth on Tuesday. Along with this, there was also an accompanying boy. They used to interact with different machines all day long. Money started to get a lot of money. One day Calais saw a new machine in a bank. He inquired, somebody told,

It's called a computer. Now the coming age is going to be the computer. "

Kailash asked. If the coming age is a computer, then we must learn. But it was also a question of where to learn.

That period in the nineties. The computer had recently entered India. Left-right organizations were fighting together to keep their jobs going. Computers were hugely expensive and only looked in large organizations. Nobody even allowed Kailash to come near the computer.

Once a chance is found. There is a Times of India office on Ferguson College Road in Pune. Their three printers had fallen off. Those who told the repairs are worth throwing away. The officers had prepared the same. But by coincidence, Kailash had come there. They fixed the machine on the page in an hour and a half.

The Times of India gave away not only the printer but also his computer in the hands of Kailash. Signed a two year repair contract. It became a turning point in Kailash's life. After watching the Times of India, the rest of the companies and banks started giving them work. Kailash Katkar became famous in computer hardware repair in Pune.

The education itself was partially missed but Kailash did not compromise on his siblings' education. The younger brother Sanjay was also intelligent. He got admission in Computer Engineering at Modern College. He was also assisting with brother's work from college all evening.

At that time, the virus had emerged as a new issue. Just as people get ill with an epidemic, computers also get sick if a particular program is infected. Then they should not get sick, called a prophylactic anti-virus.

Many of the computers infected with the virus came to Kailash's shop in Pune to repair it. People say you are the one to fix it. But the topic was software. The hardware ones will do it. He wanted to do something to launch Kailash to his computer. His younger brother Sanjay had created a tool to deal with similar infectious viruses. Which their customer liked very much.

At the same time, Kailash Katkar's business mind came to the idea that this anti-virus business would make a lot of money. He handed the brother a special computer. Sanjay cut off the house of one of the settlements in Natawadi and started making anti-virus. It took a year and a half but the Marathi man got his own anti-virus. He was named

Story of Quick Heal Antivirus

The year is 1949.

quick heal company founder

Sanjay himself designed this anti-virus logo, made the packaging. Calais cut the company's liquor and began to consume your product. They tried to prove that they needed to have an anti-virus virus that was destroying the data in the computer, but they did not give up.

At that time many IT companies were starting up in Pune. ITPark used to stand up. All such old companies liked the fact that native anti-virus was better and cheaper than foreign anti-virus. Many companies signed a contract with Quick Hill Anti-Virus for the year.

After-service was also of great importance when mobile phones were not yet available. Kailash Katkar took care of his clients. He also established his team with Pune in Nashik, Mumbai. They also benefited from going to different cities. QUICKHILL grew up in a time of competition over quality lives. Did you know that one million square feet of office has been transformed from the office of in maglavar peth?

Quick heal antivirus official website

Quick heal antivirus download


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda