पेट्रोल पंपावर काम करून तो झाला न्यायाधीश

By Naukari Adda Team


पेट्रोल पंपावर काम करून तो झाला न्यायाधीश, He became a judge working on a petrol pump

पेट्रोल पंपावर काम करून तो झाला न्यायाधीश
पहाडी पारगावच्या संतोष मुंडे यांचा थक्क करणारा प्रवास

(अशोक वाणी) 

धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव हे संतोष मुंडे यांचे गाव. एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडिल दोघेही अशिक्षीत. कुटुंबात आजवर कोणीही नौकरीला नाही. उपजीविका भागवीन्यासाठी फक्त वडीलोपार्जीत सव्वा एक्कर जमीन तीही कोरडवाहु अशा परिस्थितीत शेतीतुन मिळणऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा चालवीतांना वडिल विष्णू मुंडे व आई वृंदावणी यांची मोठी दमछाक व्हायची. अखेर काही वर्षापुर्वी संतोष यांच्या आई वडिलांना गाव सोडुन बीड येथे मजुरी कामासाठी यावे लागले. दहा वर्षा पासुन ते बीड शहरातील श्रीनीवास बाहेती यांच्या पाईपप्या फॅक्टरीत मजुरी काम करतात. मुलांना चांगले शिक्षण द्यावे त्यांचे आयुष्य आपल्या सारखे काबाड कष्ठ करण्यात जावू नये असे त्यांना वाटायचे. संतोष यांनी लहान पणापासुन ही परिस्थिती पाहायली होती. संतोष यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे सोनीमोहा ता.धारूर येथे झाले. शालेय शिक्षण घेत अतातांना त्यांनी एका कटलरी दुकानातही काम केले. पाचवी ते दहावी चे शिक्षण हे बीड शहरातील राज्यस्थानी विद्यालयात घेतले. दहावीमध्ये उत्तम गुण मिळाल्यानंतर आता पुढे काय हा प्रश्न पडला. त्यात घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची.चांगले शिक्षण घ्यायचे असेल तर पैसा नाही मात्र आपली परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही ते त्यांना माहित होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडायचे नाही हे ठरवले. अकरावी बारावीचे शिक्षण हे चंपावती महाविद्यालयात घेतले. एका दिवशी मित्रा सोबत शहरातील विधी महाविद्यालयात गेले असतांना त्या ठिकाणचे वाततावरण पाहीले आणि आपनही कायद्याची पदवी घेण्याचे ठरवीले. बारावी नंतर बीड येथील विधी महाविद्यालयात एलएलबीसाठी प्रवेश घेतला आणि येथुनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न होता. मात्र हार मानली नाही शिक्षणातुनच आपल्या जिवनात परिवर्तन घडवायचा निश्चय केला. बीड शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करायला सुरवात केली. दुपारपर्यंत कॉलेज करायचे त्यानंतर पेट्रोल पंपावर काम करायचे आणि रात्री अभ्यास करायचा असे सुरू झाले. तब्बल तीन वर्ष पेट्रोल पंपावर काम करूण एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. कोणती शिकवणी नाही कोणाचेही मार्गदर्शन नाही तरीही जिद्द अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर संतोष मुडे यांनी एलएलबी मध्ये विद्यापीठातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवित गोल्ड मेडेल मिळवीले. आता या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली होती यातच आपले करिअर घडेल असे स्वप्न दिसू लागले मात्र अजुन पूढे प्रवास करावा लागणार होता. पुढे एलएलएम चे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. तेथे एका विधी महाविद्यालयात दोन वर्षाचे एलएलएम केले. शिक्षण घेत असतांना संतोष मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे वकीलीही सुरू ठेवली. त्यांनतर एक वर्षाचा डिप्लोमा केला. कायद्याचा अभ्यासही बऱ्यापैकी झाला होता, वकीलीही जमु लागली होती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहील्याच प्रयत्नात त्यांना मोठे यश मिळाले. महाराष्ट्रातुन 137 वा रँक मिळाला तर मुलाखतीत महाराष्ट्रातुन द्वीतीय येण्याचा मान मिळवीणारे संतोष हे न्यायाधीश झाले. आपला मुलगा न्यायाधीश झाल्याचे समजल्यानंतर आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. मुलाच्या यशाने त्यांनी आयुष्यभर घेतलेल्या कष्ठाचे चीज झाले. पहाडी पारगावात लोकांच्या आनंदाला उधान आले होते. मुंडे यांचा ग्रामस्थांनी मोठा सत्कार सोहळा आयोतजीत केला होता. मिळविलेल्या ययामुळे गावची मान उंचावल्याचे ग्रामस्थ सांगतात.
--------------

तीन वर्ष पेट्रोल पंपावर केले काम
घरची परिस्थिती हालाखीची त्यामुळे शिक्षणासाठी पैसा नाही, बारवीनंतर एलएलबीला प्रवेश घेतला, आईवडिलांच्या मजुरीवर कुटुंबाचा गाढा कसाबसा चालायचा. आपले करीयर घडवीण्यासाठी जे कारायचे आहे ते आपल्यालाच. त्यामुळे संतोष मुंडे यांनी शिक्षणाचा आणि स्वताहाचा खर्च भागवीन्यासाठी बीड येथे एका पेट्रोल पंपावर तीन वर्ष काम करूण एलएलबीचे शिक्षण घेतले.अर्थिक परिस्थिती अडवी आली त्यावर मात केली मात्र शिक्षण सोडले नाही असे ते सांगतात.
---------

कोणत्याही शिकवणी शिवाय मोठे यश
स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी शिकवणी शिवाय पर्याय नाही अशी विद्यार्थ्यांची एक मानसीकता झालेली आहे.यासाठी आज विद्यार्थी मुंबई,पूणे औरंगाबाद सारख्या ठिकाणी जावुन शिकवणी लावतात. मात्र मेहनत आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर कोणत्याही शिकवणी शिवाय स्पर्धा परिक्षेत यश मिळविता येत हे न्यायाधीश झालेल्या संतोष मुडें यांनी दाखवुन दिले आहे.एलएलबी ते एलएलएम आणि न्यायाधिश पदासाठी दिलेल्या परिक्षेपर्यंत त्यांनी कोणतीच शिकणी लावलेली नाही स्वताहा अभ्यास करूण त्यांनी हे यश मिळवीले आहे.
---------

शिक्षणाने परिवर्तन घडवा
आपण कोणत्या परिस्थित जन्माला यावे हे आपल्या हातात नसते.मात्र परिस्थितीवर जो मात करतो तोच यशस्वी होतो हा माझा अनुभव आहे.तुम्ही जेथे आहात तेथे प्रमाणीक काम करा.शिक्षणाबद्दल आवड परिस्थितीची जाणीव आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचु शकता त्याला परिस्थिती आडवी येत नाही हा माझा अनुभव आहे. (संतोष मुंडे, पहाडी पारगाव )

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


He became a judge working on a petrol pump

By Naukari Adda Team


He became a judge working on a petrol pump
Surprising journey of Santosh Munde of Paargaon

(Ashok Vani)

Santosh Munde's village is Pahari, a hill in Dharur taluka. He was born into a peasant family. Both parents are uneducated. No one has a job in the family today. In this case only the father, Vishnu Munde and his mother Vrindavani, became the mainstay of the family while running the family's carriage on short income from the farm. Finally, a few years ago Santosh's parents had to leave the village and come to Beed for labor. For ten years he worked as a laborer in the pipeways factory of Srinivas Baheti in Beed city. They want their children to be better educated so that they do not have to spend their lives working hard. Santosh had seen this situation from a small leaf. Santosh's education from 1st to 4th was studied at Sonimoha Tal. While working in school, he also worked in a cutlery shop. He got his education from fifth to 10th grade at a school in Beed city. After getting good marks in class X, the question was what to do next. The situation in the house is extremely tense. So, in any case, he decided not to quit. Eleventh XII was studied at Champawati College. One day while traveling with a friend to a law college in the city, he saw the atmosphere of the place and decided to get a law degree. After the twelfth, he attended the law college at Beed for LLB and from there his life got a different career. The big question was how to cover the cost of education. But he did not give up and decided to change his life through education. Started working at a petrol pump in Beed City. By noon, after college, started working at a petrol pump and studying at night. After completing his LLB education for three years working on a petrol pump. No education, no guidance whatsoever, Santosh Mudde earned the Gold Medal for being the first to come to the University in LLB on strenuous study and hard work. Now that the interest was created in this area, it was dreaming that you would have a career but you still had to travel further. Later he went to Aurangabad to study for LLM. He did a two year LLM in a law college there. While studying, Santosh Munde also continued counsel at the Mumbai High Court Bench, Aurangabad. After that I got a one year diploma. The practice of law was very good, lawyers were gathering, they were successful in trying to get the first class judicial examinations conducted by the Maharashtra Public Service Commission in 2019. In the interview, Santosh, who received the 137th rank from Maharashtra, became the second highest judge in the interview. When parents realized that their son was a judge, there were tears in their parents' eyes. The child's success became the cheese of his life. The mountain was a delight to the people. Munde's villagers had arranged a big ceremony. The villagers say that the village has raised its neck due to the gains.
--------------
Three years work on a petrol pump
Due to the circumstances of the house, there is no money for education. After 12th, I joined LLB. It is up to you what you need to do to build your career. Therefore, Santosh Munde studied LLB after working for three years at a petrol pump in Beed to pay for his education and self-sufficiency.
---------
Great success without any teaching
There is a mentality that students have no choice but to succeed in the competitive exams. Today, students go to places like Mumbai, Pune, Aurangabad and start teaching. However, Santosh Muden, a judge who has shown that he can succeed in the competitive examination without any tuition, if he has to work hard and is ready to study, he has achieved this success by studying on his own.
---------
Make a difference with education
You are not in your control of what situation you are born in. It is my experience that only one who overcomes the situation will succeed. Be honest about where you are. No, this is my experience. (Santosh Munde, Hill Paragon)


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda