ऊसाचा फड सोडून आलेल्या रामने दिला 150 युवकांना रोजगार

By Naukari Adda Team


ऊसाचा फड सोडून आलेल्या रामने दिला 150 युवकांना रोजगार, Ram, who quit the sugarcane crop, provided employment to 150 youths

ऊसाचा फड सोडून आलेल्या रामने दिला 150 युवकांना रोजगार
क्लासेसच्या माध्यमातून राम सरांची गगण भरारी
बीडसह औरंगाबादेतही इंग्लिश स्कूल स्थापन
केशव कदम 9763138176
पदवीपर्यंत शिक्षण घेवून केवळ नोकरी नाही म्हणून रस्त्याने बेरोजगार म्हणून फिरणार्‍यांची संख्या आज कमी नाही. या सुशिक्षीत बेकारांकडे पाहून ‘शिकून कुणाचं भलं झालयं’ असा समज आता ग्रामीण भागात वाढत चालला आहे. याच समजातून आई-वडीलांनी त्याला ऊस तोडणीसाठी घेवून गेले. मात्र जन्मदात्यांचे कष्ट आणि कपाळावरचा घाम त्याला स्वस्त बसू देईना. फक्त नोकरीसाठी नाही तर चांगला माणूस व समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण घेण्याचा त्याने संकल्प केला. ऊसाचा फड सोडून आलेल्या राम आब्दर या ध्येयवेड्याने आज नोकरीच्या मागे न लागता 150 युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर चांगला माणूस होण्यासाठी सुद्धा आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची राज्यातच नव्हे तर देशात ओळख... पोटाची खळगी भरायला जातांना पोटच्या पोरांना कुठं ठेवायचं हा सर्वांत मोठा प्रश्न इथल्या पालकांच्या समोर असतो. म्हणूनच आजही ऊसाच्या फडात शाळाबाह्य मुले फिरतांना दिसतात. नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या दिमाखवाडी येथील गरीब कुटूंबात राम आब्दर यांचा जन्म झाला. घरात आठराविश्व दारिद्रय, जन्माआधीपासून आई-वडील ऊसतोड कामगार... त्यामुळे वारसा हक्कानं हाती कोयत्याशिवाय काहीच मिळणार नाही हे त्यांनी जाणलं होतं. परंतू या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे जाणलेल्या राम सरांनी ऊसाच्या फडातून काढता पाय घेतला. जन्मजात मिळालेल्या गरिबीवर मात करत वाट्टेल ते काम करुन त्यांनी शिक्षण घेतले. ‘कमवा आणि शिका’ च्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. पदवीचे शिक्षण सुरु असतांनाच खासगी क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना शिकवू लागले. मिळणार्‍या मानधनातून शिक्षणाचा आणि पोटाचा प्रश्न मिटला. परंतू आयुष्याचा व भविष्याचा प्रश्न मिटणार नाही याची त्यांना पुर्ण खात्री होती. या एकाच प्रश्नातून आणि दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या अनुभवातून त्यांनी ओम कोचिंग क्लासेसची स्थापना केली. एका किरायाच्या खोलीत सुरु झालेल्या खासगी शिकवणीला सुरुवातीच्या काळात अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे किराया देण्यासाठीही पैसे कमी पडत. मात्र ‘युद्ध रणात जिंकण्यापुर्वी मनात जिंकावं लागतं’ या म्हणीप्रमाणे त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अफाट मेहनतीच्या जोरावर ओम कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. आज 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बीड शहरात ओम कोचिंग क्लासेसच्या तीन शाखा आहेत. तर मित्रांच्या सहाय्याने बीडमध्ये श्री.ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूल व श्री. संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल तर औरंगाबाद या ठिकाणी हिमालया पब्लिक स्कूलची स्थापना केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेवून सुशिक्षीत बेरोजगार म्हणून फिरणार्‍या 150 युवकांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलं आहे. कधी काळी ऊसाच्या फडात आई-वडीलांच्या मागे फिरतांना आपलं भविष्यात काय हा प्रश्न पडलेल्या राम सरांनी आज अनेकांच्या भविष्याला आकार दिला आहे. हे सगळं काही सहजासहजी झालं नाही. त्यासाठी त्यांच्या भुतकाळात डोकावून पाहिल्यास त्यांचा संघर्ष आजही प्रत्येकाला थक्क करुन सोडतो. या यशामागे आई-वडील आणि मोठ्या बंधुचा मोठा वाटा असल्याचे राम सर सांगतात.


अशीही सामाजिक बांधिलकी
परिस्थितीवर मात करुन आरामात आयुष्य जगणार्‍या प्रत्येकालाच आपल्या भुतकाळाची आठवण राहते असे नाही. मात्र राम आब्दर हे याला अपवाद ठरले आहेत. आज सर्व सुख मिळत असतांना आपण समाजाचं काही देणं लागतो याचा त्यांना कधीच विसर पडला नाही. म्हणूनच दरवर्षी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या परंतू शिक्षण घेवून काहीतरी वेगळं करण्याची धडपड असणार्‍या ध्येयवेड्यांना ते मोफत प्रवेश देतात.


आज शिक्षण नोकरीभोवती केंद्रीत झालं आहे-राम आब्दर
शिक्षण हे व्यक्तीमत्व विकासाचं माध्यम आहे. परंतू आज शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचं साधन बनवलं असून संपुर्ण शिक्षणव्यवस्था नोकरीभोवती केंद्रीत झाली आहे. त्यामुळे शिकून नोकरीशिवाय काही तरी वेगळं करावं ही भावनाच विद्यार्थ्यांमध्ये राहिली नाही. म्हणूनच आज क्षमता असूनही तरुणाई मानसिकदृष्ट्या अपंग होत चालली आहे.
राम घनशीराम आब्दर (राम सर)
ओम कोचिंग क्लासेस, बीड


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Ram, who quit the sugarcane crop, provided employment to 150 youths

By Naukari Adda Team


Ram, who quit the sugarcane crop, provided employment to 150 youths
Through the classes, Ram Ghani of Bhagavan is filled
Establishment of English School in Aurangabad with Beed
Keshav Kadam 9763138176
There is no shortage of people who are unemployed by road as it is not just a job to get a degree. Looking at these well-educated unemployed, the notion of 'getting better at learning' is now increasing in rural areas. It was through this belief that his parents took him to harvest sugarcane. But the birth pains and the sweat on his forehead did not allow him to settle down. He resolved to get an education, not just for a job but for a good man and a reputation in society. Ram Abadar, who quit the sugarcane crop, has provided employment to 150 youths without leaving their jobs today. He has shown that education is not just for the job but also for the good person.
Beedi's identity as a district of laborers, not only in the state but in the country ... The biggest question facing parents here is how to keep the stomach full while filling the stomach. That is why even today, out of school children are seen walking in sugarcane traps. Ram Abdar was born in a poor family in Dimakhwadi, at the foot of Narayangad. Poverty in the house, the labor of the parents before birth ... so they knew that their inheritance rights would be left to them with nothing. But Ram sir realized that there was no alternative to education to overcome this situation. He learned to work in whatever way he could to overcome inherent poverty. Completion of graduate education through 'Earn and Learn'. As soon as graduation started, students began to teach in private classes. Respect for education eliminated the question of education and the stomach. But they were absolutely sure that the question of life and future would not go away. Through these same questions and experiences taught to students who failed in Class X, they established Om coaching classes. The private tutoring that started in a rented room received little response in the beginning. Therefore, even paying rent would be less money. But he did not give up trying to say that he had to win before he won the war. Through the hard work of OM coaching classes, the students have been provided with quality education. So the number of students increased day by day. Today, there are three branches of Om coaching classes in Beed city for students from 5th through 12th. With the help of friends, Shri. Gyaneshwar Public English School and Shri. Himalayan Public School has been established at Sant Dnyaneshwar English School and Aurangabad. Through these institutes, he has worked to provide employment to 150 youths who are getting educated unemployed through higher education. Ram sir, who has been questioning his future in the past during the black sugarcane crop, has shaped the future of many. All of this did not go smoothly. For them, peering into their past will still leave everyone struggling today. Ram sir says parents and elder brother have a big share in this success.


social commitment
Not everyone who overcomes the situation has a comfortable life in mind. However, Ram Abdar has been an exception to this. They have never forgotten that they have to give something to the community while getting all the happiness today. That is why every year, they are financially weak but they give free access to the goaltenders who are struggling to do something different by studying.


Today education is centered around jobs - Ram Abdar
Education is the medium of personality development. But today education is made only as a means of getting a job and the whole education system is centered around jobs. So, the feeling of doing something different without a job was not in the students. That is why, despite the potential, the young person is becoming mentally handicapped.
Ram Ghanshiram Abdar (Ram sir)
Om Coaching Classes, Beed


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda