IAS साठी निवड होऊनही वर्दीच्या आकर्षणामुळे IPS : विनीता साहू

By Naukari Adda Team


IAS साठी निवड होऊनही वर्दीच्या आकर्षणामुळे IPS : विनीता साहू, IPS: Vinita Sahu due to uniform attraction despite being selected for IAS

IAS साठी निवड होऊनही वर्दीच्या आकर्षणामुळे IPS : विनीता साहू

 

नागपूर : आयपीएस झाल्यानंतर नांदेडला पोलीस अधिक्षक होते. पुढील अभ्यास सुरुच होता. आयएएससाठी सिलेक्‍ट झाले होते, पण मला वर्दीचे आकर्षण आधीपासून होते आणि नांदेडच्या कारकिर्दीत ते अधिकच वाढले. त्यामुळे पोलिस म्हणून काम करण्याला प्राधान्य दिले. विविध संकटांनी त्रस्त झालेले `डिस्ट्रेस' लोक पोलिसांकडे येतात. त्यांना न्याय मिळवून देण्यात समाधान मिळते. आयपीएसचे प्रशिक्षण हे देशातील सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण आहे, असे नागपुर शहर झोन दोनच्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांनी सांगितले.महिला दिनानिमित्त विनिता साहू `सरकारनामा'शी बोलत होत्या. विनिता साहू म्हणाल्या, की आयपीएस प्रशिक्षणाच्या सुरुवातीला 100 मीटर चालणे या प्रकारात मी दमून जात होते. पण प्रशिक्षण झाल्यानंतर 16 किलोमीटर अंतराच्या क्रॉस कंट्रीमध्ये मी प्रथम क्रमांक सहज पटकावला होता. भाषा प्रशिक्षणामध्ये मराठी शिकले आणि मराठी भाषा पुरस्कारही पटकावला. नागपुरमध्ये रुजू होण्यापूर्वी ग्रामीण भागातच काम केले. अधीक्षक म्हणून वाशीम, भंडारा, गोंदीया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काम केल्याचा अनुभव होता. शहर आणि ग्रामीण पोलिसींगमध्ये तफावत आहे. त्यामुळे नागपूरला येताना थोडे दडपण होते. कारण येथे व्हीआयपी मुव्हमेंट आहेत. विधानभवन, उच्च न्यायालय, संविधान चौक आहे. संवेदनशील प्रकरणांचे निकाल येथे लागतात. पण पोलीस आयुक्त चांगले आहेत. सर्व सहकाऱ्यांना समजून घेऊन काम करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे लवकरच नागपुरशी एकरुप झाले. 

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यापक युवतीला जाळून मारल्याची घटना दुर्दैवी आहे. अशा घटना टाळण्यासाठी एकटे पोलीस काही नाही करु शकणार. त्यासाठी संवेनशील समाज घडला पाहीजे. रस्त्यावर चालताना प्रत्येकाने जागरुक असले पाहीजे. आजही अशा घटना घडताना लोक केवळ बघत राहतात आणि गुन्हेगार पळून गेल्यावर आरडाओरडा, धावपळ करतात. घटना घडताना तेथे हजर असलेल्यांनी एकत्रित होऊन गुन्हेगारांवर तुटुन पडले पाहीजे. याशिवाय शाळांमधून मुला-मुलींवर तसे संस्कार झाले पाहीजे. महीलांचा सन्मान करण्याचे धडे पालकांनीच मुलांना देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. 

महिला पोलिस अधिकाऱ्याकडून महिलांना अपेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरविले. पोलिसांत तक्रार कशी करावी, याची देखील माहिती महिलांना नसते. त्यामुळे सर्वप्रथम त्यासाठी जनजागृती केली. सप्टेबर 2019 मध्ये `जागरुक मी व समाज' हा उपक्रम राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वाकर्स स्ट्रीट आणि बगिचे असामाजिक तत्वांचे लक्ष्य असतात. त्यामुळे अशा ठिकाणी दामीनी पथकांची पेट्रोलींग वाढविली. जाफनीज गार्डन आणि फुटाळा तलावाजवळची दुकाने रात्री 2-3 वाजेपर्यंत सुरु राहायची. ती आता 11 वाजता बंद होतात. त्यामुळे अर्धे काम हलके झाले. त्यानंतर तेथे फीस्क पॉइंट बनविला. आता गुन्हेगारी आटोक्‍यात असल्याचे विनीता म्हणाल्या.

महिला दिनापासून शहरात येणार `पोलिस दीदी'
शहरातील महिला आणि मुलींचे आत्मबल वाढविण्यासाठी जागतिक महिला दिनी "पोलिस दीदी' उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. या दीदी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतील. याच धर्तीवर "पोलिस काका' उपक्रमसुद्धा विभागातर्फे सुरु करण्यात येणार असल्याचे विनीता यांनी सांगितले. नागपूर शहरात "भरोसा सेल' स्थापन करण्यात आले आहे. येथे महिलांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या जातात. येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. भरोसा सेलमध्ये केवल महिला अधिकारी व कर्मचारी काम करतात. या सेलमध्ये महिला समूपदेशन, विधी सल्लागार, पिडीत महिलांसाठी राहण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा, मानसोपचार तज्ञांची मदत मदत मिळवून दिली जाते. येथे महिलांना पोलिसांकडून सर्वच प्रकारची मदत केली जाते. त्यामुळे महिलांचे माहेर म्हणून "भरोसा सेल' ओळखला जातो.

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "होम ड्रॉप' योजना सुरू केली. शहरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला रात्री नऊ वाजतानंतर घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्यास किंवा भीती वाटत असल्यास अशा मुलींना, तरूणींना महिलांना घरापर्यंत पोलिस पोहोचवून देतील. रात्रीच्या सुमारास एकट्या मुलींना भीती बाळगण्याचे कारण नाही. मुलींकडे दुचाकी जरी असली तरी दुचाकीसह घरी पोहोचवून देण्याची जबाबदारी पोलिसांची असेल. महिला सुरक्षिततेसाठी नागपूर पोलिसांनी उचललेले महत्वाचे पाऊल आहे.

महिला व मुलींसाठी टीप्स
तरूणींनी मनात भीती बाळगून समाजात वावरू नये. जेणेकरून मनात भीती नसल्यामुळे आत्मविश्‍वास निर्माण होईल. पालकांनीही मुलींनाच सारखे सल्ले देऊन कमजोर बनविण्यापेक्षा तिला ब्रेव्ह बनविण्याकडे लक्ष द्यायला हवे. संकट समयी काय करावे, याबाबत मुलींना माहिती द्यावी. पोलिसांचा 100 डायल क्रमांक हा कॉंटॅक्‍ट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवावा. जेणेकरून संकटकाळात लगेच पोलिसांची मदत घेता येईल. रात्री उशीरा रस्त्यावरून एकटे जाणे शक्‍यतो टाळावे किंवा एकटे जात असताना पालक किंवा नातेवाईकांच्या संपर्कात राहावे. तसेच पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी प्रयत्न करावा. संशयित व्यक्‍ती किंवा पाठलाग करीत असल्याचा संशय आल्यास लगेच अलर्ट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. शाळकरी मुलीपासून ते अगदी भाजीपाला विक्री करणाऱ्यांकडे स्मार्ट फोन आहे. मात्र, स्मार्टफोन वापरण्याच्या मर्यादा प्रत्येकाने लक्षात घ्यायला हव्या. अनेक विवाहित महिला आपला अधिकाधिक वेळ वॉट्‌सऍप आणि फेसबूकवर घालवतात. त्यापायी मुलांकडे, पतीकडे आणि कुटूंबियांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महिलांनी मोबाईलला एवढा वेळ दिल्यापेक्षा कुटूंबियांकडे लक्ष द्यावे. तरूणींनी मोबाईलचा अतिवापर करू नये. वॉट्‌सऍप किंवा फेसबूकवर पर्सनल फोटो टाकण्याचा मोह टाळावा. अनेकदा हॅकर्स किंवा असामाजिक तत्व फोटोशॉपमध्ये छेडछाड करून (मॉर्फ) ब्लॅकमेल किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शक्‍यतोवर पर्सनल फोटो सोशल मीडियावर शेअर करू नये. जसे आपण अनोळख व्यक्‍ती भेटल्यास फक्‍त "हाय-हॅलो' पर्यंत मर्यादा ठेवतो. तसेच फेसबूकवर अनोळखी व्यक्‍तींशी मैत्री करू नका. त्यांच्या फ्रेंड रिक्‍वेस्ट स्विकारू नका, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचता येईल.

सध्याच्या युगात मुलींनी परफेक्‍ट असणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणापासूनच मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायला हवे. मुलांप्रमाणे मुलींनाही खेळ आणि मैदानावर मोकळीक द्यायला हवी. मुलींना कराटे किंवा ज्युडोचे प्रशिक्षण द्यावे आहे. तसेच क्रीडा प्रकारात सहभागी होण्यास पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच संकटसमयी उपयोगासाठी मुलींनी पर्समध्ये पेपर स्प्रे, मिरची पावडर, नेल कटर ठेवण्यास काही हरकत नाही. परिस्थितीला न घाबरता दोन-दोन हात करण्याची क्षमता निर्माण होईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे.

शालेय शिक्षण घेताना मुली वयात येतात. त्यांना प्रेम आणि शारीरिक आकर्षण यामधील फरक कळत नाही. कुणीतरी माझ्याशी गोड बोलतो किंवा माझी काळजी घेतो, म्हणजे तो माझ्यावर प्रेम करतो, असा गैरसमज मुलींचा असतो. शाळकरी मुली मोठ्या तरूणींचे अनुकरण करतात. तिला बॉयफ्रेंड आहे म्हणून मलाही बॉयफ्रेंड हवा. ही भावना मुलींच्या मनातून काढून टाकायचा प्रयत्न पालकांनी करावा. लहान मुलीं लवकर जाळ्यात फसतात. त्यामुळे तरूण अल्पवयीन मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करतात, अशा घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. जेणेकरून ती सर्व गोष्टी घरी शेअर करू शकेल.

पालकांनी मुले आणि मुलींना समान लेखावे. जेणेकरून हीनभावनेची घरातूनच सुरूवात होणार नाही. मुलींना सतत उपदेशाचे डोज पाजल्यापेक्षा त्यांच्या काय समस्या आहेत, त्या प्रेमाने समजून घ्या आणि त्यावर समाधान शोधा. कुणी त्रास देत असेल तर कुटूंबातील वरिष्ठांशी नंतर पोलिसांपर्यंत पोहोचा. मुलीकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्‍न विचारू नका. मुलाप्रमाणे तिलाही प्रेम द्या जेणेकरून समाजात वावरताना ती गर्वाने आणि मान ताट करून वावरेल.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IPS: Vinita Sahu due to uniform attraction despite being selected for IAS

By Naukari Adda Team


IPS: Vinita Sahu due to uniform attraction despite being selected for IAS

Nagpur: After IPS, Nanded becomes Superintendent of Police. Further study was underway. I was selected for IAS, but I was already attracted to the uniform and it grew even more during Nanded's career. Therefore, he preferred to work as a policeman. Distressed people come to the police, suffering from various crises. They find satisfaction in getting justice. "IPS training is one of the best training in the country," said Vinita Sahu, an IPS officer in Nagpur City Zone Two. "At the beginning of IPS training, I was tired of running 100 meters," said Vinita Sahu. But after training, I was easily ranked number one in the 16-kilometer cross country. He learned Marathi in language training and also won Marathi language award. Prior to joining Nagpur, he worked in rural areas. As a superintendent I had experience working in Washim, Bhandara, Gondia and Gadchiroli districts. Differences between city and rural policing. So, coming to Nagpur was a little stressful. Because there are VIP movements. Vidhanbhavan, High Court, Constitution Chowk. Here are the results of sensitive cases. But the Police Commissioner is good. All colleagues have a tendency to understand and work. Soon there was a merger with Nagpur.

It is unfortunate that Professor Youth was burnt to death in Hinganghat in Wardha district. Police alone cannot do anything to prevent such incidents. For that, a sensitive society must happen. Everyone should be vigilant while walking on the road. Even today, people keep watching only when such incidents take place and the criminals run away and scream after fleeing. At the time of the incident, those present must gather together and break down on the culprits. Apart from this, such rites should be performed on children and girls in schools. Parents should teach their children the lessons of honoring women. An example is Jijau and Chhatrapati Shivaji Maharaj in front of the people of Maharashtra.

Expectations are high for women by a police officer. Therefore, women paid special attention to security. Women do not even know how to complain to the police. So, first of all, it raised awareness. In September 2019, 'Awareness Me and Society' was launched. He got a good response. Walkers Street and Gardens are the target of anti-social elements. This increased the patrolling of the Damini squad at such places. Shops near Japhnese Garden and Lake Futala were open until 2-3 pm. They close at 11am now. So half the work was done lightly. Thereafter Fisk Point was created. Now the crime is under investigation, said Vinita.

'Police Didi' will be coming to the city from women's day
To strengthen the women and girls of the city, we will start the World Women Day 'Police Didi' program, which will always be prompt for the safety of women and girls. A trust cell has been set up in Nagpur city, where the complaints of women are taken seriously and senior police inspector quality officers are working in the trust cell. Medical facilities, psychotherapy specialists help get help from women police here All kinds of help are given, hence the "trust cell" is known as the mother of women.

Police Commissioner Bhushan Kumar Upadhyay initiated the "Home Drop" scheme. If any girl or woman in the city is not available or scared to go home after nine o'clock, such girls will deliver the women to the police at home. There is no reason to fear the girls alone at night. However, it is the responsibility of the police to deliver the bike home It is an important step taken by Nagpur police for women's safety.

Tips for women and girls
Young women should not behave in the society with fear. So that there is no fear in the mind will build confidence. Parents should also look at making girls brave rather than making them vulnerable with the same advice. Girls should be informed about what to do during a crisis. The 100 dial number of the police should be number one on the contact list. So that you can get the help of the police immediately in times of crisis. It is possible to avoid being alone on the road late at night or staying in touch with parents or relatives when going alone. Also, try to help the police control cell. He appealed to be alerted immediately if the suspect or suspect is being pursued.

Now everybody has got a smartphone in their hands. From schoolgirls to even those who sell vegetables, it's a smart phone. However, everyone should know the limitations of using a smartphone. Many married women spend most of their time on WhatsApp and Facebook. There have been some complaints that children, husbands and families are being neglected. Therefore, families should pay more attention to their families than give them time for mobile. Women should not overuse mobile. Avoid the temptation to put personal photos on WhatsApp or Facebook. Often hackers or Assam


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021