भिल्लाचं पोर कलेक्टर बनलं

By Naukari Adda Team


भिल्लाचं पोर कलेक्टर बनलं, Rajendra Bharud

भिल्लाचं पोर कलेक्टर बनलं, राजेंद्र भारूड यांची प्रेरणादायी कहाणी


शाळेचा पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय… मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी मोठमायच्या घराकडे धावत सुटलो… मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं, हे त्या वेळी माझ्या बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण या दोघीही माझ्याकडे जराही ढुंकून न पाहता घरी निघून गेल्या…
  धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा… याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या… माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक म्हैस असा आमचा कुटुंबकबिला. आमच्या भिलाटीमध्ये शिक्षण, शाळा याचा कित्येक वर्षे कुणाचाही दुरान्वये संबंध आला नव्हता. चुकून कधीतरी एखादा मुलगा फाटका सदरा आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मध्येच कळपातून चुकलेल्या वासरासारखा शाळेत जाताना दिसे, पण तेवढाच… त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशा परिस्थितीत मोठमाय आणि मायने शाळेत माझे नाव घातले. तिथेच माझ्या आयुष्याच्या बदलाला सुरुवात झाली. मावशी आणि आई निरक्षर असली तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले होते. कदाचित त्याचमुळे मला शाळेत पाठवण्याचा अट्टहास होता…
  पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारी आम्ही भिल्ल समाजातील माणसं… पोट नेईल तिथं जायचो. असेच आमचे पूर्वज कधीतरी सामोड्यामध्ये येऊन स्थिरावले… काही भिल्लांची स्वत:च्या मालकीची जमीन असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे शेवटी मजुरीसाठी परप्रांतात जावंच लागत असे. बहुतेककरून आमच्या खान्देशातील भिल्ल गुजरातेत जात असत. बहुसंख्यांकडे ना स्वत:चा व्यवसाय ना शेतजमीन; रानावनात राहणारे आम्ही, मासे पकडणे अथवा दारू गाळणे हा व्यवसाय करीत असू. घरातील लहान-थोर सर्वच दारू पीत. त्यामुळे दारू हे व्यसन वाईट असून ते करू नये, असे सांगणारे घरात कुणीच नाही. अशा वातावरणात मी वाढलो. मी आईच्या पोटात असतानाच वडील गेले. गर्भपात करून घेण्यासाठी प्रचंड दबाव असताना माझ्या आईच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणा-या मावशीने आईला आणि माझ्या दोन्ही भावंडांना तिच्या घरी आणले. आमच्या सामोड्यामध्येदेखील अभिजनांची शाहू वस्ती होती. तेथील मुले शाळेत जात.
 
…माझी शाळेमधली प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये मला गती होती. आता शाळेतील शिक्षक घरी येऊन माझी प्रगती सांगत होते. मी प्रगती करतो म्हणजे काय, हे जरी कळत नसलं तरी मी काही तरी चांगलं करतोय आणि म्हणूनच शाळेतले शिक्षक घरी येताहेत, इतकंच मायला आणि मोठमायला कळत होतं. मी दहावीत असतानाच, माझ्या ब-याचशा मित्रांची लग्नं झाली होती. म्हणजे 15-16व्या वर्षीच माझ्या मित्रांची लग्नं होऊन ते भिलाटीतील इतरांसारखे मजुरीवर जात होते. शाळा शिकाऊन पो-याला कोठे नोकरी लागाऊ शे? घर राही त पैसा तरी कमाई, असा साधारण सगळ्यांचा सूर होता. खरे तर त्या पालकांचे म्हणणे बरोबर होते. कारण गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावणे, ही त्या क्षणाची गरज होती.

   अगदी माझ्या मामा, काका यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. या सर्वांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे; तर अज्ञान होतं, असंच मला वाटतं. कदाचित हेच आमच्या मायला आणि मोठमायला कळलं होतं आणि म्हणूनच गावातल्या शाळेतून नंतर मला ‘नवोदय’ या अक्कलकुव्याच्या शाळेत शिक्षकाच्या आग्रहाखातर पाठवले. माझ्या आयुष्यात सुदैवाने चांगली माणसे आली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा, असं मनात होतं. कारण गणितामध्ये चांगले मार्क मिळत होते. परंतु इंजिनिअर झालास तर केवळ तुझा आणि तुझ्या कुटुंबीयांचाच फायदा होईल; आणि डॉक्टर झालास तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल.
    शिवाय डॉक्टर झाल्यानंतर प्रशासक झालास तर अधिक व्यापक प्रमाणात लोकसेवा करता येईल, हे माझ्या देवरे सरांनी समजावून सांगितले… जी. एस. मेडिकलसारख्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. सामोड्यातील नवोदयसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये कधी जातीवरून माझी क्षमता जोखली गेली नव्हती. मात्र मुंबईसारख्या आधुनिक विचारांच्या शहरामध्ये असा अनुभव आला. खरे तर मला त्यांची कीव वाटली होती. पण या गोष्टी उराशी कवटाळून, मला माझी प्रगती रोखायची नव्हती… सामोड्यातून ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेला एक आदिवासी मुलगा उत्तम गुणांनी डॉक्टर झाला होता. ज्या ‘केईएम’मध्ये सुरुवातीला तुच्छतेची वागणूक मिळाली होती, त्याच ‘के ईएम’मध्ये ‘बेस्ट स्टुडंट अवॉर्ड’ मिळवून मी स्वत:ला सिद्ध केले. त्या वेळच्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन समाजाची सेवा करणार असल्याचे मी सांगितले होते. पहिल्या प्रयत्नात माझी ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली होती; परंतु ‘आयएएस’ बनण्याचे ध्येय पक्के असल्याने मी पुन्हा एकदा प्रयत्न करून 2012मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि अखेर आयएएस झालो… एक ध्येय गाठले…
    आयुष्य एका नव्या वळणावर उभे असताना मला लहानपणी घडलेला प्रसंग आठवतोय… भिलाटीमध्ये आमच्या घरी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही आमचा दारू विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असू. गावातील लोक दारू पिण्यासाठी घरीच येत असत. ब-याच वेळेस आम्हा लहान मुलांना त्यांना चखणा वगैरे आणून द्यावे लागत असे.माझी परीक्षा असली की साहजिकच मी ही कामं करायला तयार होत नसे, यावरून आमच्या एका गि-हाइकाने, तो-यात ‘जाय थोडं काम करीये, शिकसीन मोठा डाक्टर-कलेक्टर व्हनार शे’ असं हिणवून मला चखणा आणायला सांगितले. मी रडू लागलो, तेव्हा आईने त्या गि-हाइकाला सांगितले, ‘मना बी पो-या एक दिन डाक्टर-कलेक्टर हुई.
तुम्ही चखणा आज दुस-या कडतीनं मांगडा, आनी याले अभ्यास करू द्या!’


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Rajendra Bharud's inspirational story

By Naukari Adda Team


Bhalla  Boy become  Collector, Rajendra Bharud's inspirational story

I still remember the first day of school… I was crying since morning. Put my pencil, pencil, book in a nylon bag, and take me to school. My cries were constantly going on. In the meantime, with my hand jerking, I ran to the big house… At that time, my child didn't understand that going to the big house meant getting out of the fire. Great is Mahakali. She straightened me up and took me along with me straight to the headmaster. I was lying on the ground in protest and roaring. But they both left home without looking at me…
Dhule district is a tribal district… I was born in a Bhil family in the same district and in the village of Samode in the district. Although there were no working men in the house, there were two unmarried wives… My family, my great grandmother, older brother, older sister, and one buffalo. In our bhilati, education and school were never connected for many years. Sometimes a kid accidentally wore a loose suit and a pair of tights and went to school like a missed calf from a flock, but that's it… Then he came back to me. In this case, Big and Maine put my name in school. It was there that my life began to change. Even though the aunt and mother were illiterate, they understood the importance of education. Maybe that's why I was desperate to send him to school…
We, the people of Bhil community, carrying the B-bone on the back… would go there. This is how our ancestors sometimes settled in Samodia… Some villagers even owned land, but due to water scarcity, they eventually had to go to the region for wages. Most of the villagers in our country used to go to Gujarat. The majority do not have their own businesses or farms; We live in the wilderness, doing business with catching fish or drinking alcohol. All small and great people in the house drink alcohol. Therefore, there is no one in the household who says that alcohol is an addiction that is bad. I grew up in such an environment. Dad was gone while I was in my mother's womb. With a tremendous amount of pressure to get an abortion, the aunt standing firmly on my mother's side brought her and my two siblings to her house. Even in our samodas, Abhijin's Shahu was inhabited. The children went to school there.

… The progress of my school progressed steadily. Among other things was the pace of the book study. Now the schoolteacher was coming home to tell me his progress. Even though I do not know what I mean by progress, I am doing something good and so the teachers in the school are coming home, so much so that they are getting older and older. By the time I was on the 10th, many of my friends were married. That is, at the age of 15-16, my friends got married and they were going to labor like everyone else in Bhilati. Where can I get a job teaching a school? It was common for all to say that staying home earns money. In fact, those parents were right. Because of poverty, it was the need of the hour to leave education partly to support the family.

Even my aunt and uncle never attended school. Not that the real enemy of all this was poverty; So ignorance is what I think. This was probably the case with our grandmother and grandmother, and so from school in the village, I was later sent to the school at Akkalkuya, Navodaya, under the guidance of a teacher. Fortunately, there were good people in my life. After 12th, I wanted to get into engineering. Because mathematics was getting good marks. But being an engineer will only benefit you and your family; And if you become a doctor, it will benefit the entire community.
Moreover, if I became an administrator after becoming a doctor, my brother explained that if I could do more widespread public service…. S. I was admitted to a college named as medical. In rural areas like Navodaya in Samodia, my ability was never compromised on caste at school. But such an experience was felt in a modern thinking city like Mumbai. In fact, I was curious about them. But after scrutinizing these things, I did not want to stop my progress… A tribal boy who came to KEM for medical education had become a very good doctor. I proved myself by getting the 'Best Student Award' at KEM, which was initially treated with contempt. During the interview, I had said that I would serve the community by examining the Central Public Service Commission. On the first attempt, I was selected for the Indian Revenue Service; But since the goal of becoming an 'IAS' is firm, I once again tried the Central Public Service Commission exam in 2012 and finally became an IAS… reached a goal…
Life is a new turning point. People from the village used to come home to drink alcohol. Most of the time, we had to bring the kids to taste them. She asked me to taste it. When I started crying, my mother told the gi-haka, 'One day I am a doctor-collector.
You


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda