प्रश्न : बारावी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणे योग्य आहे का.
उत्तर : माझ्या मते ही कल्पना चुकीची आहे, सध्या आपण पाहिले तर स्पर्धा परीक्षेंचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. यूपीएससी परीक्षेत दरवर्षी देशातील दहा लाख युवक व युवती सहभाग घेत आहेत. त्यातील फक्त एक हजारच विद्यार्थी पास होतात. परत यातील २०० जणच आयएएस व आयपीएस अधिकारी होतात. यामुळे सहाजिकच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना युवकांनी बॅकअप प्लॅन ठेवूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, म्हणजे जरी अपयश आले तरी, बॅकअप प्लॅननूसार यश मिळवता येईल.
प्रश्न : ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते का.
उत्तर : हो, ग्रामिण भागात राहुन सुद्धा, चांगल्या प्रकारे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करता येऊ शकतो. ग्रामीण भागात असणाऱ्या युवक-युवतींना खऱ्या अर्थाने देशातील महत्वांच्या विषयांचा चांगला अभ्यास असतो. परंतु अनेकांना असे वाटते की, आपण शिकवणी शिवाय या परीक्षेत यश मिळू शकत नाही. पण असे काही नाही, ग्रामिण भागातील युवक व युवतींनी जर आत्मविश्वासाने व प्रामणिक पणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर त्यांना चांगले यश मिळु शकते, पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यां युवक व युवती कडुन नोटस किंवा इतर साहित्य उपलब्ध करुन अभ्यास केल्यास, याचा अधिक फायदा होईल. यासह इंटरनेटच्या मदतीने न समजारे विषय समजुन घेऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा, कोणत्याही शिकवणी न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतात.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असेल तर काय करावे.
उत्तर : स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्येक व्यक्ती हा पास होऊ शकत नाही, यामूळे स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच एक बॅकअप प्लॅन तयार असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्या नंतर अनेकांना वाटते, आता आपले आयुष्य संपले आहे. परंतु असे विचार करणे, चुकीचे आहेत. सध्या देशात मोठ्या प्रमाणात विविध पर्याय खुल्ले आहेत. यामुळे एक रस्ता बंद झाला म्हणजे, आयुष्य संपले असे होत नाही. अपयश आले तर असे समजा की आपल्यासाठी या पेक्षाही काही तरी वेगळे किंवा मोठे आहे. आयुष्यात यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक पणे अभ्यास व कष्ट करणे खुप महत्वाचे आहे.

प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना काय संदेश द्याल.
उत्तर : सध्याचे लाॅकडाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यांसाठी एक चांगली संधी आहे. यामुळे या परिस्थितीत विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. व घरात बसून समाजाला सुद्धा सहकार्य करू शकतात. यासह अभ्यास करताना एकदा चांगला विषय आला तर त्या विषयावर परिवारासोबत चर्चा होऊ शकते. भविष्यात आपण एक चांगले लीडर होऊ शकतात व लीडर हा सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारा असतो. यामुळे आपण या परिस्थितीत सर्वांना घरी राहण्याचा सल्ला द्या व आपणही घरीच राहुन, चांगला अभ्यास करा. यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक बॅकअप प्लॅन ठेवूनच, स्पर्धापरीक्षेची तयारी करा. एक वेळेस अपयश आले, दोन वेळेस आले, तीन वेळेस आले तर आपण बॅकअप प्लॅननूसार यश संपादन करु शकतोत. एक रस्ता बंद झाला म्हणजे आयुष्य संपले असे होत नाही, त्यामुळे निराश न होता पूर्ण ताकतीने आत्मविश्वासाने इतर क्षेञात यश संपादन करुन चांगल्या प्रकारे आयुष्यभर जगा.