इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय 'ZOOM' अ‍ॅपचे सर्वेसर्वा, आज 48.44 हजार कोटींची संपत्ती

By Naukari Adda Team


इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय

इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय 'ZOOM' अ‍ॅपचे सर्वेसर्वा, आज 48.44 हजार कोटींची संपत्ती

 

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी ZOOM हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप तारणहार बनले आहे. दरम्यान या अ‍ॅपच्या सीईओंचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम मिळाले आहे. परिणामी या कालावधीत Zoom या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा वापर वाढला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चेच आलेले नाव म्हणजे या अ‍ॅपचे सीईओ Eric Yuan.

 

 

चीनमधील शानडोंग प्रांतात 1970 मध्ये एरिक यांचा जन्म झाला होता. Shandong University of Science and Technology मधून त्यांनी त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांंची मायनिंग इंजिनीअरिंग डिग्री युनिव्हरसिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केली.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचा व्हिसा 8 वेळा नाकारण्यात आला होता. नवव्यांदा त्यांना यश आले. 22व्या वर्षी लग्न केल्यानंतर ते अमेरिकेला पोहोचले

 

अमेरिकेला पोहोचल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे भाषेचा. एरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोडिंगमध्ये त्यांचे काम अधिक असल्याने त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व नव्हते. ते सांगतात की आता जी काही थोडीफार इंग्रजी येते ती मित्रांशी बोलून शिकलो आहे. त्यांनी इंग्रजीसाठी कोणतं शिक्षण घेतलेलं नाही.

1997 मध्ये एरिक WebEx नावाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम पाहत होते. 2007 मध्ये WebEx ने खरेदी केलेल्या Cisco Systems कंपनीमध्ये एरिक यांना डिपार्टमेंट चीफ बनवण्यात आले. 2011मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली.

स्वत:च काहीतरी सुरू करावं अशी कल्पना एरिक यांच्या पत्नीने त्यांना सूचवली होती. एरिक यांना कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जाताना 10 तासांचा प्रवास करावा लागे. त्याचवेळी तिच्याशी एका क्लिकवर बोलता यावं याकरता त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची कल्पना सुचली होती. आज तिच गर्लफ्रेंड एरिक यांची पत्नी आहे.

वयाच्या 41 व्या वर्षी जेव्हा त्यांनी ZOOM App सुरू केले त्यावेळी त्यांनी सिलीकॉन व्हॅलीमधील अनेक कंपन्यांनी दुषणं दिली होती. मार्क झुकरबर्ग यांनी युनिव्हर्सिटीचा अभ्यासानंतर लगेचच फेसबुकची सुरूवात केली होती. त्यामुळे या वयात स्टार्टअप सुरू करणं जोखमीचं होतं


ZOOMची सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीचा काळ एरिक यांच्यासाठी कठीण होता. मात्र आता ते सुद्धा आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी देखील ZOOM चाच वापर करतात. त्याकारता दौरा करण्याची गरज भासत नाही. आता 2020 एप्रिल महिन्यात फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार अब्जाधीशांच्या यादीत एरिक युआन यांचे देखील नाव आहे. फोर्ब्सनुसार त्यांची रियल टाइम नेटवर्थ 6.4 बिलियन डॉलर आहे. म्हणजेच ते 48.44 हजार कोटींचे मालक आहेत. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 293 व्या स्थानावर आहेत.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Popular 'ZOOM' app becomes all-encompassing despite not coming in English, assets worth Rs 48.44 lakh crore today

By Naukari Adda Team


Popular 'ZOOM' app becomes all-encompassing despite not coming in English, assets worth Rs 48.44 lakh crore today


Corona virus lockdown has made ZOOM a video conferencing app savior for those working from home. Meanwhile, the life journey of the CEOs of this app is astounding.
 

The corona virus has given many work from home. As a result, the use of the Zoom video conferencing app has increased during this period. The most talked about name after that is the CEO of this app, Eric Yuan.


Eric was born in 1970 in Shandong Province, China. He graduated from Shandong University of Science and Technology. He then completed his Mining Engineering degree from the University of Mining and Technology.

According to Forbes, his visa to the United States was denied eight times. They succeeded for the ninth time. They arrived in the United States after being married for 22 years

After reaching America, the important question was language. According to Eric, he was not fluent in English as his work was more in coding. He says that now he has learned a little bit of English by talking to his friends. He did not take any education for English.

In 1997, Eric was working as a software engineer at a video conferencing company called WebEx. Eric was named department chief of Cisco Systems, a company acquired by WebEx in 2007. He left the company in 2011.

Eric's wife suggested that he start something on his own. Eric had to travel 10 hours to visit his girlfriend while in college. At the same time, they came up with the idea of ​​video conferencing so that they could talk to her at the click of a button. Today she is the wife of his girlfriend Eric.

When he launched the ZOOM App at the age of 41, he was spotted by several companies in Silicon Valley. Facebook was started by Mark Zuckerberg soon after his university studies. So starting a startup at this age was risky

 
The early days after ZOOM began were difficult for Eric. But now they also use ZOOM for international meetings. There is no need to visit for that. Eric Yuan is now on the list of billionaires, according to a list released by Forbes in April 2020. According to Forbes, his real-time net worth is 4 6.4 billion. That means he owns Rs 48.44 lakh crore. He is ranked 293rd on Forbes' list of richest people.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda