वयाच्या 21 वर्षीच IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचा प्रेरणादायी प्रवास

By Naukari Adda Team


वयाच्या 21 वर्षीच IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचा प्रेरणादायी प्रवास, An inspiring journey of Snehal Dhayagude who became an IAS at the age of 21

वयाच्या 21 वर्षीच IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचा प्रेरणादायी प्रवास

खंडाळा, 14 जून : कोणतंही यश हे बघून मिळत नसतं. तुमच्याकडे जिद्द, मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही वयाच्या कितव्याही वर्ष यश खेचून आणू शकता. हे शब्द आहेत अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या स्नेहलची माती आणि गावाशी नाळ जोडल्यानं IAS होण्याचं स्वप्न होतं. 2018 रोजी तिने UPSC च्या परीक्षेत तिने देशात 108 क्रमांक मिळवून आपलं स्वप्न साकार केलं आहे.

खंडाळ्यातील रहिवासी असणाऱ्या स्नेहलचे वडील पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आई शेती करते. वडिलांवर स्नेहलप्रमाणेच इतर सख्ख्या चुलत भावंडांची जबाबदारी होती. त्यामुळे काटकसर करावी लागत होती. स्नेहलला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. तिनं मन लावून अभ्यास केला. इयत्ता आठवीनंतर वसतीगृहात राहण्यासाठी गेली आणि तिचा प्रवास सुरू झाला.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण साखरवाडी, लोणंद व माळेगाव इथे झाले.पुणे येथे बीएस्सी अॅग्री ही पदवी घेतल्यानंतर तिने UPSC करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कठोर मेहनत, मन लावून अभ्यास आणि आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव या सगळ्या गोष्टी मनात आणि डोक्यात ठेवून मन लावून अभ्यास केला आणि 21 व्या वर्षीच 2018च्या परीक्षेत स्नेहलनं उत्तुंग यश प्राप्त केलं.

 

स्नेहलाही करावा लागला या अडचणींचा सामना

खेडेगावातून आल्यानं भाषेचा प्रश्न होता. शुद्ध आणि नीट बोलता यावं यासोबतच इंग्रजी अधिक पक्क व्हावं यासाठी स्नेहलनं स्वत:वर मेहनत घेतली. बऱ्याचदा ती आपलं बोलणं, उत्तर रेकॉर्ड करून पुन्हा ऐकायची त्यामुळे त्यातील चुका समजायच्या असं स्नेहानं सांगितलं आहे.

असं म्हणतात की पांघरूण पाहून पाय पसरावेत तर मला वाटतं तुम्ही मोठी स्वप्न पाहा जिद्दीनं मेहनत घ्या नक्की आपलं पांघरुण आपण मोठं करू शकतो असं स्नेहलनं तरुणांना संदेश दिला आहे. तिच्या या उत्तुंग यशाचं देशभरातून कौतुक करण्यात आलं.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


An inspiring journey of Snehal Dhayagude who became an IAS at the age of 21

By Naukari Adda Team


An inspiring journey of Snehal Dhayagude who became an IAS at the age of 21

Khandala, June 14: No success can be achieved by looking at it. If you have perseverance and willingness to work hard, you can achieve success at any age. These are the words of Snehal Dhayagude, who became IAS at the tender age of 21. Snehal, who grew up in an ordinary farming family, dreamed of becoming an IAS after connecting the soil and the umbilical cord to the village. In 2018, she has achieved her dream by getting 108 marks in UPSC exams in the country.

Snehal's father, a resident of Khandala, is working as a police constable. Mother farms. Like Snehal, the father was responsible for a number of other siblings. So we had to be frugal. Snehal was fully aware of his situation. She studied hard. She went to live in a hostel after class VIII and her journey began.

She completed her primary and secondary education at Sakharwadi, Lonand and Malegaon. After completing her BSc Agri degree in Pune, she decided to do UPSC. For this, hard work, diligent study and awareness of the situation at home, all these things were studied with the mind and in the head, and at the age of 21, Snehal achieved great success in the 2018 exams.

Sneha also had to face these difficulties

Coming from a village, there was a question of language. Snehal worked hard on her own to become fluent and fluent in English. Sneha has said that most of the time she would record her speech and listen to it again so that she could understand the mistakes.

It is said that if you want to spread your legs by looking at the cover, I think you should dream big, work hard, you can make your cover bigger, Snehal has given a message to the youth. Her great achievement was appreciated all over the country.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda