खोकरमोहाच्या डॉ.प्रियंका मिसाळ झाल्या तहसीलदार

By Naukari Adda Team


खोकरमोहाच्या डॉ.प्रियंका मिसाळ झाल्या तहसीलदार , Tehsildar Dr. Priyanka Mishal of Khokarmoha

(- अशोक वाणी )

सर्वसामान्य कुटुंबातील  मुलगी खुप शिकली डॉक्टरही झाली

प्रशासकिय सेवेची मात्र जिद्द नाही सोडली

खोकरमोहाच्या डॉ.प्रियंका मिसाळ झाल्या तहसीलदार

 

हल्ली शिक्षणाची गंगा खेडोपाडी वाहत आहे. शिक्षणाची संधी सहजगत्या उपलब्ध होत असल्यामूळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात सामिल झाले. प्रवाहाचा घटक बनले. त्यांच्याच जोडीने विद्यार्थीनिंही शिक्षणात प्रगती करु लागल्या. त्यांच्या पंखाणा  बळ मिळू लागले आणी त्या उंच आकाशात भरारी घेऊ लागल्या. आज विविध क्षेत्रामध्ये मुली चमकदार कामगिरी करुण आपले कर्तुत्व सिद्ध करत आहेत. आई-वडीलांचे प्रोत्साहन आणी गुरुजनांचे मार्गदर्शन यामूळे मुलिही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होवून बीडची मान उंचावत आहेत. अशीच एक कर्तुत्ववान  कन्या  शिरुर तालुक्यातील खोकरमोहा येथील डॉ.प्रियंका मिसाळ 

      खोकरमोहा सारख्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन प्रियंका मिसाळ दंतवैद्दक शास्त्राच्या  बिडीएस पदवीधर झाल्या. मात्र प्राप्त यशाचे त्यांनी फारसे समाधान मानले नाही. आणखी काहितरी वेगळे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणी त्यातूनच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षा देण्याची उर्मी त्यांच्यात जागृत झाली. विविध अडचणींचा सामना करत जिद्द चिकाटी आणी आत्मवीश्वासाच्या बळावर  त्यांनी एमपीएसीचा गड  सर करुण  या परिक्षेत यश संपादन केले. तहसीलदार या वरिष्ट आणी तालुका दंडाधिकारी पदासाठी त्या पात्र झाल्या आहेत. यावरच न थांबता  भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परिक्षेत यशस्वी होऊन त्यांचे आयएएस अधीकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यांची जिद्द आणी प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थी आणी विद्यार्थिंनीसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

 

खुल्या प्रवर्गातुन प्रियंका मिसाळ यांनी टॉप टेनमध्ये राज्यातून सहाव्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवीला आहे. जीवनात गोरगरिबांची सेवा करायची आहे त्यामूळेच मी प्रशासकिय सेवेत आल्याचे प्रियंका मिसाळ सांगतात

 

       स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नियोजन करणे महत्त्वाचे आहे तीव्र इच्छाशक्ती ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी निसटलेल्या यशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे अवघड नाही हे डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी दाखवून दिले आहे. गोरगरिबांची सेवा घडावी यासाठी मला प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचे हे जिद्द अखेर प्रियंका यांनी पूर्ण करून दाखवली.

       बीड शहरातील चंपावती शाळेत  पहिली ते नववी पर्यंतचे शिक्षण झाले. तर दहावीचे शिक्षण भगवान विद्यालय येथे पूर्ण केले.  शाळेमध्ये अभ्यासात अत्यंत हुशार आणी चाणाक्ष बुद्धीच्या  असलेल्या डॉ. प्रियंका यांना भविष्यात काहीतरी करायचे आहे ही जिद्द मनाशी बाळगून होत्या. पुढे बारावीचे शिक्षण हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथरी येथे पूर्ण केले. बारावी मध्ये उत्तम गुण मिळाल्यामुळे पुढे त्यांना अनेक संधी उपलब्ध होत्या. त्यानंतर सिईटीमध्ये उत्तम गुण घेऊन त्यांना नागपूर येथे बीडीएस च्या शिक्षणासाठी संधी मिळाली. शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी महाविद्यालयातून टॉपर असायच्या बीडीएस चे  शिक्षण पूर्ण होईपर्यंत डॉ. प्रियंका मिसाळ यांना स्पर्धा परीक्षेबाबत कसलीही माहिती नव्हती. बीडीएस पुर्ण  झाल्यानंतर एक वर्षाची इंटरंशिप चालू असताना एका मित्राने त्यांना सल्ला दिला तू अभ्यासात हुशार आहेस प्रयत्न केल्यास प्रशासकीय सेवेत अधिकारी होता येईल त्यासाठी तू स्पर्धापरीक्षेची तयारी कर असा सल्ला दिला. त्यानंतरच स्पर्धा परीक्षेबाबत डॉ. प्रियांका मिसाळ यांना माहिती मिळाली आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळी  कलाटणी मिळाली. डॉक्टर होवून आपल्याला लोकांची फारशी सेवा करता येणार नाही मात्र प्रशासकीय सेवेत जाऊन अधिकारी झाल्यास समाजातील गोरगरीब लोकांसाठी खूप काही करता येईल त्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचे ही जिद्द मनाशी बाळगली आणि येथूनच त्यांचा सुरू झाला प्रवास.  राज्य लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी थेट पुणे गाठले कोणाचे मार्गदर्शन नाही, अभ्यास कसा करायचा, एक्झाम कशा असतात याबाबत कसलीही माहिती नव्हती मात्र आपल्याला अधिकारी व्हायचे  ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुणे येथे आल्यानंतर त्यांनी युनिक अकॅडमी येथे क्लासेस केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे विद्यापीठ हे परीक्षा घेतात या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राहण्याची अभ्यासाची सोय  विद्यापीठामार्फत मोफत असते. त्यामुळे डॉ. प्रियंका यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली या मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची विद्यापीठांमध्ये राहण्याची सोय झाली. विद्यापीठातही क्लासेस व्हायचे विद्यापीठातील क्लासेस आणि युनिक अकॅडमी मध्ये क्लासेस करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ही तयारी करत असताना त्यांनी सेल्फ स्टडी वर अधिक भर दिला. एमपीएससीची चांगली तयारी करून 2015 ला राज्य लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा  प्रियंका यांनी दिली मात्र यामध्ये यशस्वी होऊनही समांतर आरक्षणाच्या विषयामुळे त्यांना कोणतीही पोस्ट मिळाली नाही त्यामुळे त्यांनी सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी एक्झाम दिली यामध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. मंत्रालयात जलसंपदा विभागात सहाय्य कक्ष अधिकारी म्हणून एक वर्ष सेवा बजावली. शासकिय नौकरी मिळाली असली तरी  ध्येय अजुन  पूर्ण झाले नव्हते त्यासाठी त्यांनी पुन्हा एमपीएससी परीक्षा देन्याचे ठरवले. या आधी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात पाया  पक्का झाला होता एक आत्मविश्वास आला होता त्यामुळे आपण पुन्हा परीक्षा दिली तर नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना होता. पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाची तयारी सुरू केली नौकरी करत असताना शनिवार रविवार पुणे गाठायचे, क्लासेस करायचे आणि सेल्फ स्टडी वर भर द्यायचा असी अभ्यासाची तयारी केली. आलेल्या अपयशामुळे अनेक विद्यार्थी खचून जातात ते पुन्हा प्रयत्न करत नाहीत मात्र जिद्दी स्वभावाच्या असलेल्या डॉ. प्रियंका यांनी आलेल्या अपयशाने खचून न जाता पुन्हा अभ्यासाच्या जोरावर जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्य यामुळे  फेब्रुवारी 20 19  मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत यश मिळवले खुल्या प्रवर्गातून प्रियंका मिसाळ यांनी  टॉप टेन मध्ये राज्यातून सहाव्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवून तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्या प्रशासकीय सेवेत रुजू होणार आहेत

 

भविष्यात आयएएस अधीकारी व्हायचे आहे

स्पर्धा परीक्षेमध्ये आज खूप मोठ्या संधी आहेत जो मेहनत करेल अभ्यास करेल तो नक्कीच यशस्वी होईल. मला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे हाच आत्मविश्वास आला आहे. यापुढेही मला प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे गोरगरिबांची सेवा करायची आहे तहसीलदार हे पद मिळाल्यानंतर यावरच न थांबता पुढे मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षेची तयारी करून आयएएस अधिकारी व्हायचे आहे हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज समाजात मुलींच्या बाबतीत  एक नकारात्मक भावना आहे ती दूर करायची आहे. त्यांनाही  संधी दिली तर  आपले कर्तुत्व सिद्ध करू शकतात हे तर मी एमपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन दाखवून दिले आहे. मात्र आता माझे पुढचे ध्येय हे यूपीएससी परीक्षेत यशस्वी व्हायचे आहे असे तहसीलदार डॉ. प्रियंका मिसाळ सांगतात.

 

आई वडील बहिण भाऊ आणि मित्राचा यशात मोठा वाटा

आपल्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणाचे तरी मोलाचे मार्गदर्शन मिळत असते त्यामुळेच आयुष्याला एक वेगळी  कलाटणी मिळत असते.  प्रियंका मिसाळ यांचे  बीडीएस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ त्यांच्या मित्रांने सल्ला दिल्यामुळे त्या स्पर्धा परीक्षेकडे वळल्या आणि आज तहसीलदार झाल्या. त्याचबरोबर आई-वडिलांनी स्वातंत्र्य दिले विश्वास टाकला आणि बहीण डॉ. प्रतिभा मिसाळ आणी भावाचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मानसिक आधार दिला त्यामुळेच मी आज तहसीलदार पदापर्यंत पोचले आहे.  माझ्या यशाचे श्रेय हे एकाला देता येणार नाही आई वडील मित्र बहिण भाऊ  यांचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे प्रियंका मिसाळ सांगतात

 

कोणतीही स्पर्धा परिक्षा देताना सर्वात मोठे आव्हान ही आपली ईच्छा शक्ती असते. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचन नव्हे तर स्पर्धा परिक्षा देताना अभ्यासाचे योग्य नियोजनही तितकेच महत्वाचे आहे. स्मार्ट वर्क करा अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सोडू नका एक ना एक दिवस यश नक्किच मिळेल. ग्रामीण भागातील मूलीनी शिक्षणा  च्या  जोरावर आपले करियर घडवून स्वत:च्या पायावर उभे रहावे मगच लग्नाचा विचार करावा.  तहसीलदार डॉ.प्रियंका मीसाळ

                                                                                                                                          

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Tehsildar Dr. Priyanka Mishal of Khokarmoha

By Naukari Adda Team


The girl from an ordinary family became a very learned doctor

Administrative service, however, did not give up

Tehsildar Dr. Priyanka Mishal of Khokarmoha

Nowadays the river of education is flowing in the villages. Students from rural areas also joined the stream of education as educational opportunities became readily available. Became a component of the flow. With their pair, the students also started making progress in education. Their wings began to gain strength, and they began to soar high in the sky. Today, girls are proving their mettle in various fields. Thanks to the encouragement of the parents and the guidance of the teachers, the girls are succeeding in the competitive examinations and raising the standard of Beed. One such talented girl is Dr. Priyanka Misal from Khokarmoha in Shirur taluka

Priyanka Misal graduated from rural areas like Khokarmoha with a BDS degree in dentistry. However, he was not satisfied with the success. The urge to do something different did not allow them to settle down. And from that, the urge to sit for the competitive examination of the State Public Service Commission was awakened in him. Overcoming various difficulties, on the strength of perseverance and self-confidence, he succeeded in the MPAC's Gad Sir Karun exam. She is eligible for the post of Senior Tehsildar and Taluka Magistrate. Not stopping at this, he dreams of becoming an IAS officer in the future by passing the UPSC examination of the Central Public Service Commission. His perseverance and journey will be an inspiration to students in rural areas.

In the open category, Priyanka Mishal is ranked sixth in the state in the top ten. Priyanka Mishal says that she came to the administrative service because she wants to serve the poor in life.

Dr. Priyanka Misal has shown that it is not difficult to succeed in competitive exams if you have all the qualities to be ready to work hard without getting exhausted due to success. Priyanka finally fulfilled her determination to become an officer in the administrative service to serve the poor.

Education was conducted from 1st to 9th standard in Champawati school in Beed city. He completed his matriculation at Bhagwan Vidyalaya. Dr. who is very clever and shrewd in his studies in school. Priyanka was determined to do something in the future. Later he completed his 12th standard education at Babuji Awhad College, Pathari in Pathardi taluka of Nagar district. Having got good marks in XII, he had many opportunities ahead. He then got excellent marks in CET and got the opportunity to study BDS at Nagpur. While studying, he used to be a topper from the college every year till the completion of BDS education. Priyanka Misal had no idea about the competitive exam. While completing the one-year internship after completing BDS, a friend advised them to prepare for the competition so that you can become an officer in the administrative service if you try hard. After that, Dr. about the competitive examination. Priyanka Misal got the information and from here her life got a different twist. Being a doctor, you will not be able to serve the people much, but if you go into the administrative service and become an officer, you can do a lot for the poor people of the society. He reached Pune directly to prepare for the MPSC competitive examination of the State Public Service Commission. There was no guidance from anyone, he did not know how to study, what the exams are like, but his determination to become an officer did not allow him to settle down. After coming to Pune, he took classes at Unique Academy. Different universities conduct these exams for the students who are preparing for the competitive exams. After passing the exams, the accommodation of the students is free through the university. Therefore, Dr. After passing the competitive exam of Savitribai Phule Pune University, Priyanka was able to stay in the university. Prepared for the competitive exam by taking classes at the university and classes at the Unique Academy. While preparing for this, he put more emphasis on self-study. After preparing for the MPSC, Priyanka appeared for the first exam of the State Public Service Commission in 2015, but despite succeeding in it, she did not get any post due to the issue of parallel reservation. Served for one year as Assistant Cell Officer in Water Resources Department in the Ministry. Although he got a government job, he decided to retake the MPSC exam as his goal was not yet achieved. Earlier, he had laid the foundation for a competitive exam. He was confident that if he took the exam again, he would be successful. Once again, Joma started preparing for her studies while doing her job on Saturday


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda