पहील्याच प्रयत्नात सुरुडीच्या सविता गर्जे झाल्या डीवायएसपी

By Naukari Adda Team


पहील्याच प्रयत्नात सुरुडीच्या सविता गर्जे झाल्या डीवायएसपी, At the first attempt, Surudi

पहील्याच प्रयत्नात सुरुडीच्या सविता गर्जे झाल्या डीवायएसपी
------------
अशोक वाणी
----------
आयुष्यात पाहिलेले स्वप्न हे सहजा सहजी पुर्ण होत नसतात त्यासाठी प्रचंड मेहनतिचा डोंगर हा उचलावाच लगतो. जिद्द, चिकाटी आणी आत्मविश्वास असेल तर  कितीही संकटे आली तरी आपल्या ध्येयापर्य्ंत पोहचता येते हे सिद्द करुण दाखवले आहे एमपीएससी परीक्षेत  पहील्याच प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातलेल्या आष्टी तालूक्याती सूरुडी येथील सविता मारुती गर्जे यांनी. मुलींनाही शिक्षणाची संधी दिली तर त्या सुद्धा आपले कर्तूत्व सिद्द करु शकतात हे दाखवून दिले आहे फ़क्त चार महिन्याचा अभ्यास आणी पहील्याच प्रयत्नात डीवायएपी झालेल्या सविता गर्जे यांनी यांनी. पोलिस प्रशासनात काम करतांना महिला आणी मुलींसाठी काम करायचे असुन यूपीएससीतही यश मीळवुन दाखवायचे आहे असे सविता गर्जे सांगतात. नुकत्याच पोलिस प्रशासनात अधीकारी झालेल्या सविता गर्जे यांची घेतलेली विशेष मुलाखत
----------
प्र. आपली कौटूमबिक माहिती
उ. वडील मारुती गर्जे  हे मुंबई येथे बेस्ट मध्ये लिपिक आहेत.  आई जना मारुती  गर्जे गृहिणी आहे. बहीण मनीषा आहे जी एका कंपनीत जॉब करत आहे.
लहान भाऊ ओमकार याने  12 वीची परीक्षा दिली आहे आणि आता तो नीट ची तयारी करत आहे. सद्या वडिलांच्या जॉब मुळे आम्ही सानपाडा , नवी मुंबई इथे 2000 पासून राहत आहोत
---------
प्र. थोडक्यात परिचय
उ. माझे नाव सविता मारुती गर्जे
मूळ गाव - मुक्काम पोस्ट सुरुडी , तालुका आष्टी, जिल्हा बीड
सद्या वडिलांच्या जॉब मुळे आम्ही सानपाडा , नवी मुंबई इथे 2000 पासून राहत आहोत. गावी माझे काका अशोक गर्जे , तुकाराम गर्जे ,कारभारी गर्जे , ज्ञानदेव गर्जे , काकू मंगल गर्जे, सविता तुकाराम गर्जे ,सुमन गर्जे , शोभा गर्जे , आजी शिशिकला गर्जे ,आजोबा रामचंद्र भिमाजी गर्जे असतात.
------    
प्र. आपले शिक्षण कूठपर्यंत आणी कुठे झाले

उ. माझे शालेय शिक्षण हे विवेकानंद संकुल,  सानपाडा , नवी मुंबई येथे   पहिले ते  10 वी पर्यंत झाले. 11वी 12वी रामनिवस रुईया ज्यूनीयर कॉलज माटुंगा , मुंबई येथे झाले.  11वी 12वी मध्ये मी सायन्स  घेतल होते.
नंतर सीईटी ची परिक्षा दिली. मेडिकल शाखेला जायचे होते. पण सीईटी  मध्ये मेडिकलला जाण्या एवढे चांगले गुण  मिळाले नव्हते. सर्वांचं म्हणणं होत की मी सीईटी  परत द्यावी  पण मला ते करण्याची इच्छा नव्हती म्हणून फार्मसी करायचं ठरलं मुंबई च्या नामांकित कॉलेज मध्ये  मध्ये मला प्रवेश मिळाला.
2016 ला माझी पदवी पुर्ण  झाली. त्यानंतर एका  कंपनीत जॉब मिळाला. मात्र  तेव्हा मी काही तरी वेगळं करण्याच्या शोधात होते. ह्या कोणत्याच गोष्टीत मन रमले नाही मग 2017 पासून यूपीएसीची तयारी करायला सुरुवात केली
-------------
 प्र. पोलीस प्रशासनात आपली निवड झाली असुन तेथील कामकाजात कोणत्या सुधारणा करता येतील

उ. पोलिस प्रशासनात डीवायएसपी म्हणून काम करत असताना  लोकाभिमुख पोलीस यंत्रणा बनवायची आहे.  विशेषतः ग्रामीण भागातील लोक पोलिसांकडे जाण्यास घाबरतात. यामुळे पोलीस स्टेशन ते लोकांचे घर यातील दुरावा मला कमी करायचा आहे.
2. महिलांनसाठी काम करायचं आहे . आपल्याकडे महिलांच्या सुरक्षतेसाठी खूप कायदे करण्यात आले आहेत. पण त्या पैकी एक ही कायदा महिलांना नीट माहिती नाही. तर महिलांना कायद्याचे ज्ञान देण्यावर मी भर देईल.
---------
 प्र. एमपीएससीकडे वळन्याची प्रेरणा कोनाकडून मिळाली

उ. माझे काका कारभारी गर्जे  मी शाळेत असताना मला नेहमी बोलायचे खुप शीकुन मोठी हो.  तू अस काही तरी कर की तुझा अभिमान वाटावा. पण तेव्हा या  सर्वांचा अर्थ मला कळत नव्हता. पण  त्यांनी ह्या गोष्टी माझ्या मध्ये बिंबवल्या
आणि मी पण ठरवलं होतं की अस क्षेत्र निवडायचे की आपल्या हातून लोककल्याण झाले पाहिजे. आणि असे क्षेत्र म्हणजे एमपीएसी  होते.
-----------
 प्र. शालेय किंवा महाविध्यालयीन जीवनातील एखादी अविस्मरणीय घटना

उ. नऊवीत असताना आमच्या वर्गाची सहल राळेगणसिद्धीला गेली होती. घरचे एवढ्या लांब पाठवायला तयार नव्हते. पण  आमच्या शाळेच्या टीचर खताल यांनी सर्व पालकांना विश्वासात घेऊन पालकांना राजी केले.  त्यावेळी आमच्या सर्वांना अण्णा हजारे यांना भेटण्याचा योग आला. त्या वेळी समाजासाठी आपणही काही तरी केलं पाहिजे हे माझा मनात घर करून गेले त्या सहलीने खरच माझ्या विचारांना कलाटणी दिली.
------------
प्र. स्पर्धा परिक्षेची तयारी करणर्यांना काय संदेश देताल

उ. एमपीएसीचा अभ्यास करताना सातत्य महत्वाचे असते. पूर्ण प्रक्रियेला साधारण पणे 2 वर्ष लागतात .म्हणजे जर 2022 ची परिक्षा द्यायची  असेल तर त्या परीक्षेच्या आधी 1 वर्ष अभ्यासाची तयारी करावी लागते. आणि पूर्व ते फायनल निकाल याला पुढील 1 वर्ष जातो. त्यामुळे संयम , चिकाटी , आणि सातत्य महत्वाचे आहे . अभ्यासाला सुरवात करताना त्याच्या सिल्याबस ची कॉपी आणि मागील वर्षीचे  आयोगाने विचारलेले प्रश्न याचे विश्लेषण नीट करावे. आणि नंतरच अभ्यासाची  दिशा ठरवावी. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा खूप मोठा आहे आणि पूर्व आणि मुख्य परिक्षेमध्ये जास्तीत जास्त 4 महिने किंवा कधी कधी त्याहून कमी दिवस असतात. त्या मुळे मुख्य परीक्षेचा काही अभ्यास हा आधीच झालेला असेल तर नेमक्या वेळेला टेन्शन कमी येत . नेहमी लक्ष्यात ठेवा कोणतीही परीक्षा असो , कमीतकमी पुस्तकातून जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. दहा पुस्तक वाचण्यापेक्षा 1 पुस्तक 10 वेळा वाचा जास्त लक्षात राहील.एमपीएससीची
पूर्व आणि मुख्य हे दोनीही objective paper असतात म्हणून प्रश्न सोडवायचा सराव असला पाहिजे त्यामुळे पूर्व अणि मुख्य दोनी साठी कोणत्याही क्लास ची एक टेस्ट सेरिस लावावी सराव हाच यशाचा गुरुमंत्र आहे ..
------------
प्र. एमपीएससिची तयारी कशी केली

उ. 2016 मध्ये माझी पदवी पुर्ण झाल्यानंतर  मला एका  कंपनीत जॉब मिळाला. या कोणत्याच गोष्टीत मन रमले नाही  मग 2017 पासून यूपीएससीची तयारी  करायला दिल्लीला  जायचे  होते , पण आई वडिलांचा त्याला विरोध होता म्हणून , पुणे येथे जायचे ठरवले . पुणे मध्ये  एक वर्षाचा क्लास लावला आणि अभ्यासाला सुरवात केली.
2017 चा यूपीएससीची attempt दिला preliminary exam मध्ये फेल झाले .
2018 सालचा attempt न देत आपला अवघड विषय पक्का करायचं ठरवले . पण त्या काळा मध्ये दुसरा एक्झाम  दिल्या पीएसआय  एसटीआय
त्यामध्ये मी पीएसआय ची पूर्व परीक्षा पास झाले पुढे त्याची मुख्य परीक्षा दिली ..
2019 चा यूपीएसीचा attempt चांगला द्याच ठरवलं . पण mpsc च्या जागा खूप चांगल्या  आल्या होत्या. पण गणित चांगलं येत नसल्या मुळे जरा  भीती वाटतं होती. पण upsc च्या gs च्या अभ्यासा वर माझा hold खूप चांगला होता .. म्हणून एमपीएससी  द्यायची ठरवली. पूर्व परीक्षा ही 17 फेब्रुवारी 2019 ला होती .. answer key ने माझा score खूप चांगला होता त्या मुळे किती cutoff लागेल ह्या चर्चेत न पडता मी मुख्य परीक्षाचा अभ्यास करायचं ठरवलं. माझ्या कडे फक्त 4 महिने होते सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणून मी कमीतकमी पुस्तकात जास्तीतजास्त कसे मार्क्स मिळवता येतील ते बघितलं . म्हणून यूपीएससी ची परीक्षा द्यायची नाही असं ठरवलं.
मुख्य परीक्षा ही 13,14,15 जुलै 2019 ला होती ..
मुख्य परीक्षेचा score चांगला होता म्हणून लगेच मुलाखतीची  तयारी चालू केली .माझा interview हा 19 मार्च 2020 ला मुंबई ला होता
एमपीएससी ची मुख्य परीक्षा दिल्या नंतर न थांबता दुसऱ्या एक्झाम दिल्या
जसे CAPF (AC - central armed police force ) , State excise ची exam दिली . ह्या दोनीचाही निकाल येणं बाकी आहे... आणि मला विश्वास आहे की यात ही मी पास होईल. एमपीएससीचा निकाल   19 जून 2020 ला लागला. आणि त्यात माझी निवड डीवाएसपी पोलिस उपअधीक्षक )  पदी झाली.
--------
प्र. एमपीएसीची तयारी करताना काही अडचणी आल्या का

उ. ही मला  खुप अडचनी आल्या .पुण्यात मी तीन वर्षात 10 रुम बदलल्या.  ,30 हुन जास्त लायब्ररी बदलाव्या लागल्या . खूप त्रास झाला ह्या सर्वांच गोष्टींचा. पण या एका पण गोष्टीला न जुमानता मी माझं काम चालू ठेवलं . माझा अभ्यास चालू ठेवला. देव अडचणी च्या रुपात माणसाला नवीन संधी देतो आणि या नेहमी चांगल्या माणसाच्याच मार्गात असतात. ह्या एक वाक्यावर मी नेहमी विश्वास ठेवला. आणि आज माझ्या प्रयत्नांना यश आले .या एका क्षणासाठी हा सर्व अठ्ठाहास केला होता. मुलींनी खरच या क्षेत्रात उतरावं खूप संधी आहे इथे ,स्वःताला सिद्ध करण्याची ,स्वःताच्या पायावर उभा राहण्याची खुप संधी आहे.
जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना चुली पासून  पाटी पर्यंत आणले , पण पाटी पासून अस्तित्वा पर्यंतचा प्रवास आपल्यालाच करावं लागणार आहे. त्यामुळे न घाबरता पुढे एवढच मी सांगेल
मुलींसाठी पोलीस हे क्षेत्र चांगलं नाही असे बरेच जण म्हणतात पण जर मुली यात उतरल्या नाहीत तर मुलींच्या समस्या जगापुढे येणार कश्या .. ह्या एका विचार मुळे मी इतर पोस्ट पेक्ष्या डीवाएसपी वरती प्रेफेरेन्स दिला.
-----------------
प्र. कितव्या प्रयत्नात आपल्याला यश मिळाले

 उ. खरेतर मला केंदीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेची 2017 पासूनच मी  तयारी करत होते. त्यामूळे मला याचा खुप मोठा फायदा झाला. एमपीएससी देण्याचा  पहिलाच प्रयत्न होता यातच यश भेटले. मी  मेन्सचा   अभ्यास चार महिन्यात केला होता.
----------
प्र. पुढील जीवनात गाठावयाचे ध्येय

उ. एमपीएसी मध्ये यश भेटले म्हणून थांबायचे नाही. इथून पुढे मी यूपीएससी ची तयारी करणार आहे. मला IFS(Indian foreign service) मध्ये जायचं आहे..


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


At the first attempt, Surudi's Savita Garje became a DYSP

By Naukari Adda Team


At the first attempt, Surudi's Savita Garje became a DYSP
------------
Ashok Vani
----------
Dreams seen in life do not come true easily, so it takes a lot of hard work. Savita Maruti Garje from Ashti taluka, Surudi, who has secured the post of DYSP in her first attempt in the MPSC examination, has proved that she can reach her goal no matter how many adversities come with perseverance, perseverance and self-confidence. Savita Garje, who has just completed four months of study and DYAP in her first attempt, has shown that if girls are given the opportunity of education, they too can prove their worth. While working in the police administration, Savita Garje says that she wants to work for women and girls and also to show success with UPSC. Exclusive interview with Savita Garje, who recently became an officer in the police administration
----------
Q. Your family information
A. Father Maruti Garje is a clerk at BEST in Mumbai. Mother Jana Maruti Garje is a housewife. Sister Manisha is working in a company.
Younger brother Omkar has passed the 12th standard examination and is now preparing well. We have been living in Sanpada, Navi Mumbai since 2000 due to our father's job
---------
Q. Brief introduction
A. My name is Savita Maruti Garje
Native Village - Stay Post Surudi, Taluka Ashti, District Beed
We have been living in Sanpada, Navi Mumbai since 2000 due to our father's job. My uncle Ashok Garje, Tukaram Garje, Karbhari Garje, Gyandev Garje, Kaku Mangal Garje, Savita Tukaram Garje, Suman Garje, Shobha Garje, Aji Shishikala Garje, grandfather Ramchandra Bhimaji Garje are in the village.
------
Q. How far and where did your education go?

A. My schooling was at Vivekananda Sankul, Sanpada, Navi Mumbai from 1st to 10th. 11th 12th Ramnivas Ruia Junior College was held at Matunga, Mumbai. I was taking Science in 11th and 12th.
Then passed the CET exam. I wanted to go to the medical branch. But he did not get good marks in CET. Everyone was saying that I should give back the CET but I didn't want to do it so I decided to do pharmacy. I got admission in a reputed college in Mumbai.
I graduated in 2016. Then I got a job in a company. But then I was looking for something different. I didn't like any of this and started preparing for UPAC from 2017
-------------
Q. We have been selected in the police administration and what improvements can be made in its functioning

A. While working as a DYSP in the police administration, he wanted to create a people-oriented police system. People in rural areas in particular are afraid to go to the police. I want to reduce the distance between the police station and the people's house.
2. Want to work for women. We have a lot of laws for the safety of women. But one of those laws is not well known to women. So I will focus on imparting knowledge of law to women.
---------
Q. The motivation to turn to MPSC came from Kona

A. My uncle's caretaker needs me to learn a lot when I was in school. Do something to make you feel proud. But then I did not understand the meaning of all this. But they planted these things in me
And I also decided to choose an area that should be in our hands. And one such area was MPAC.
-----------
Q. An unforgettable event in school or college life

A. When I was nine, our class trip was to Ralegan Siddhi. Home was not ready to send so far. But our school teacher Khatal persuaded all the parents. At that time, we all had the opportunity to meet Anna Hazare. At that time, the trip that made me think that we should also do something for the society really changed my mind.
------------
Q. What message will you give to those who are preparing for the competitive exam?

A. Consistency is important when studying MPAC. The whole process usually takes 2 years .If you want to take the 2022 exam, you have to prepare for 1 year study before that exam. And the pre-final result goes to the next 1 year. So patience, perseverance, and perseverance are important. At the beginning of the study, a copy of the syllabus and the questions asked by the previous year's commission should be analyzed. Only then should the direction of the study be decided. The syllabus of the main exam is very long and the pre and main exams have a maximum of 4 months or sometimes less days. As a result, if some study of the main exam has already been done, the tension will be reduced at the right time. Always keep in mind that no matter what the exam, you should at least get the most out of the book. Read 1 book 10 times more than reading 10 books
As both East and Main are objective papers, it should be a practice to solve the problem, so for both East and Main, a test series of any class should be introduced. Practice is the guru mantra of success.
------------
Q. How to prepare for MPSC

A. After completing my degree in 2016, I got a job in a company. I didn't like any of this. I wanted to go to Delhi to prepare for UPSC from 2017, but my parents were against it.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda