बारावीत नापास होऊनही सोडली नाही जिद्द, मेहनतीच्या जोरावर झाले IPS

By Naukari Adda Team


बारावीत नापास होऊनही सोडली नाही जिद्द, मेहनतीच्या जोरावर झाले IPS,  Perseverance did not give up despite failing in the twelfth, IPS became due to hard work

बारावीत नापास होऊनही सोडली नाही जिद्द, मेहनतीच्या जोरावर झाले IPS

मुंबई, 18 जुलै: बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकदा बारावीत कमी मार्क मिळाले किंवा विषय राहिल्यानं आपल्याला नैराश्य येतं. यामधून मनात नको ते विचार येतात आणि खच्चिकरण होतं. मात्र असे काही अधिकारी आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात बारावीच्या परीक्षेत अपयश मिळालं मात्र ते डगमगून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमानं उभे राहिले आणि आज अधिकारी म्हणून मोठ्या हुद्द्यावर आहेत.

अपयशातून न डगमगता धाडसानं उभं राहाणारे आयुष्यात खूप जास्त यशस्वी होतात. बारावीला पदरी अपयश आलं, नापास झाल्यानं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं. ही संघर्षगाथा आहे महाराष्ट्र कॅडरमधून IPS झालेल्या मनोज शर्मा यांची. 2005 मध्ये ते IPS झाले मात्र त्यांचा प्रवास खूप संघर्षमय होता.

 

मनोज शर्मा मुळचे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याचे रहिवासी. 11वी पर्यंत शिक्षण नीट पार पाडलं पण 12 वीच्या परीक्षेत गाडी अडकली. नापास झाल्यानंतर मनोज आपल्या भावासोबत टेम्पो चालवायचे. एकदिवस पोलिसांनी त्यांचा टेम्पो जप्त केला. हा टेम्पो सोडवण्यासाठी ते ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी पोलीस खात्यातील परीक्षांबाबत चौकशी केली. पैशाची चणचण असल्यानं कामधंदा करून घरी हातभार लावणं गरजेचं होतं.

दिल्लीतील मोठ्या घरांमध्ये त्यावेळी कुत्रे पाळण्याची प्रथा होती. या श्वानांना सांभाळणाऱ्याचे 400 रुपये मिळत होते. जे मिळेल ते काम करून शर्मा यांनी आपली सुरुवातीची गुजराण केली. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी काम सांभाळून IPS साठीचा अभ्यास सुरू केला.

 

पहिले तीन प्रयत्न थोडक्यासाठी अपयशी ठरले मात्र तेव्हाही खचून न जाता त्यांनी आणखीन एक प्रयत्न करण्याचं धाडस दाखवलं. चौथ्या प्रयत्नात 121 व्या क्रमांकानं परीक्षेत अव्वल यश मिळवलं. मनोज यांनी ग्वाल्हेरमधून पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. मनोज शर्मा यांच्यावर अनुराग पाठक यांनी 'बारावी फेल, हारा वही जो लडा नहीं' हे पुस्तक लिहिले आहे. आयुष्यात छोट्या गोष्टींसमोर हा मानणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देण्यासाठी ही कथा असेल असं अनुराग यांनी एका मुलाखतीत सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Perseverance did not give up despite failing in the twelfth, IPS became due to hard work

By Naukari Adda Team


Perseverance did not give up despite failing in the twelfth, IPS became due to hard work

Mumbai, July 18: The results of Class XII have been announced. Often you get frustrated because you get less than 12 marks or because the subject remains. This leads to unwanted thoughts in the mind and is crushed. However, there are some officers who failed in the 12th standard in their life, but they did not waver and once again stood up with new vigor and today they are in a big position as officers.

Those who stand firm without fail are very successful in life. Twelfth grade failed, important year wasted due to failure. This is the story of struggle of Manoj Sharma who became IPS from Maharashtra cadre. He became an IPS in 2005 but his journey was a struggle.


Manoj Sharma is a native of Morena district in Madhya Pradesh. He completed his education till 11th standard but got stuck in 12th standard examination. After the defeat, Manoj used to play tempo with his brother. One day the police seized his tempo. When he went to Thane to solve this tempo, he inquired about the examinations in the police department. Due to lack of money, it was necessary to work and help at home.
It was customary to keep dogs in big houses in Delhi at that time. The keeper of these dogs was getting Rs.400. Sharma made his living by doing what he could. He started studying for IPS by working to make his dream come true.


The first three attempts failed for a while, but he did not give up and dared to make another attempt. At number 121 in the fourth attempt, he got the top success in the examination. Manoj also completed his post graduation from Gwalior. Anurag Pathak has written a book on Manoj Sharma titled 'Baravi Fell, Hara Wahi Jo Lada Nahi'. Anurag said in an interview that the story will be to inspire children who believe in the small things in life.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda