याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

By Naukari Adda Team


याला म्हणतात जिद्द!  अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा,  UPSC 2019 Result: This is called persistence! Overcoming blindness, Jayant Mankale of Pune is 143rd in UPSC

UPSC 2019 Result: याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

 

-   : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेनं.

महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने 2018मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143वा क्रमांक मिळवला.

जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र IESमध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

2015पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


UPSC 2019 Result: This is called persistence! Overcoming blindness, Jayant Mankale of Pune is 143rd in UPSC

By Naukari Adda Team


UPSC 2019 Result: This is called persistence! Overcoming blindness, Jayant Mankale of Pune is 143rd in UPSC

-: The final result of the Central Public Service Commission (UPSC) service examination was announced today. In this examination conducted for UPSC Civil Service, 829 aspiring youths from all over the country have been selected. In this exam, Pradip Singh is number one in the country. So, Jatin Kishor and Pratibha Verma are ranked second and third respectively. Maharashtra's Neha Bhosale is ranked 15th in the country. However, it was Jayant Mankale from Pune who caught everyone's attention.

Jayant Mankale, a blind student from Maharashtra, has secured 143rd position in the Central Public Service Commission examination. Earlier, Jayant had also appeared for the Public Service Commission examination in 2018. But at that time it was ranked 937th. So he re-examined after two years of hard work, and this time he succeeded. Jayant was also in a year of depression due to lack of success in 2018. However, after studying hard, Jayant got 143rd position this year.

Jayant graduated from Amrutvahini College in Sangamner in 2013 with a first class degree in Mechanical Engineering. After that he worked as a maintenance engineer at Talegaon Dabhade and Bhosari for two years. During this period, Jayant contracted an incurable disease called 'retina pigmentosa'. As a result, Jayant's vision became less and less. Jayant had to appear for the Public Service Commission examination from the very beginning. However, the disabled do not have access to IES. So Jayant decided to take the UPSC exam so that education could be used.

Jayant started studying for competitive exams from 2015. Jayant had reached out for the interview in 2017, but was not selected. Finally, this year Jayant has achieved a proud performance by getting 143rd rank.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda