आई - वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी शेत विकलं, मुलाने कलेक्टर होऊन पांग फेडले......

By Naukari Adda Team


आई - वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी शेत विकलं, मुलाने कलेक्टर होऊन पांग फेडले......, Mother and father sold the farm for the education of the child, the child became a collector and paid the rent ......

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्रीकांत खांडेकर यांनी २३१ क्रमांकाची रँक मिळवली आहे. श्रीकांत खांडेकर हे कलेक्टर झाले त्यावेळे त्यांची आई शेतात खुरपण करत होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात 231व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन मुलाच्या शिक्षणासाठी विकली आणि प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्टर बणण्याचे ध्येय पूर्ण केले.

दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी स्वत: अशिक्षित असूनही आपल्या तीन मुलांना शिक्षित केले. थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरू आहे. बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर श्रीकांतने निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत झालेली निवड सोडून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे एक वर्ष तयारी केली. त्यानंतर दिल्लीत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशात 33 वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. दहावीपर्यंत मराठी माध्यमानंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सुरवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला; पण परिस्थितीची आईवडिलांनी जाणीव करून दिली नसल्याने लोकसेवा आयोगात चांगले करिअर करता आले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mother and father sold the farm for the education of the child, the child became a collector and paid the rent ......

By Naukari Adda Team


Solapur: The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of the Civil Service Examination 2019. Pradeep Singh came first in the country, while Jatin Kishor came second in the country. Pratibha Verma is third in the country and first among women candidates.

UPSC announced the results based on the results of written interviews conducted in September 2019 and interviews or personality tests conducted from February to August 2020. The final list of successful candidates has been announced on the website. A total of 829 candidates have been selected for various civil service examinations. In 2019, for the first time, 78 candidates have been selected under the ‘EWS Quota’ (Economically Backward) in the Civil Services Examination. The results of 11 candidates have been withheld.

Solapur: The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of the Civil Service Examination 2019. Pradeep Singh came first in the country, while Jatin Kishor came second in the country. Pratibha Verma is third in the country and first among women candidates.

The UPSC announced the results based on the results of written interviews conducted in September 2019 and interviews or personality tests conducted from February to August 2020. The final list of successful candidates has been announced on the website. A total of 829 candidates have been selected for various civil service examinations. In 2019, for the first time in the civil services examination, 78 candidates have been selected under the ‘EWS quota’ (financially backward). The results of 11 candidates have been withheld.

Shrikant Khandekar has got the rank of 231 in the Central Public Service Commission examination. When Shrikant Khandekar became a collector, his mother was weeding in the field. Shrikant Khandekar, who was ranked 231st in the country in the Central Public Service Commission examination, sold three acres of land for his son's education and spent the money on his children's education. Aware of his father's hard work, the boy finally achieved his goal of becoming a collector.

Kundlik Khandekar of Bawchi village, who lives as a laborer as he cannot afford the cost of agriculture in Bawchi village in the southern part of the drought taluka, educated his three children despite being uneducated. The eldest son got employment through marketing and the second passed the Public Service Commission exam. The third child is pursuing a degree. After completing his education at the Zilla Parishad School in Bavchi, Srikanth completed his secondary education at Nimboni English School. After completing his 12th year of Science from Dayanand College, Solapur, he was studying Agricultural Engineering at the Agricultural University, Dapoli. After that, preparations started in Delhi for six months. In the first attempt, he got 33rd position in the country and 1st position in Maharashtra in the forest service examination. After Marathi medium till 10th, he got admission in 11th branch of science. Initially I had to struggle with the English subject; But since his parents were not aware of the situation, he was able to pursue a good career in the Public Service Commission.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda