डोक्यावर दगडी खालगोट्याचा प्रवास

By Naukari Adda Team


डोक्यावर दगडी खालगोट्याचा प्रवास, The journey of the stone under the head

एका मजूरी करणाऱ्या माणसाची पत्नी गावकुसाबाहेरच्या पालावर राहणाऱ्या या कुटुंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. दोन लहानगी लेकर घेऊन संसाराचा गाडा ओढताना या पती-पत्नीने यातून बाहेर पडण्याची जी असामान्य धडपड केली तिला आज यश आले आहे. त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण तर केलीच पण त्यांनतर तिने चक्क पोलिस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली आहे. ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य महिलेची.

 

महाराष्ट्र पोलिस अकादमीत नुकत्याच झालेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या यशस्विनीसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा- अभिमानाचा ठेवा ठरलाच तसाच तो अनेकांना प्रेरणा देणारा क्षण होता. तो अनुभवण्यासाठी तिने प्रचंड संघर्ष केला त्याचीच ही सुखद परिणीती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे २४ हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची १०८ वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक १,५४४ फौजदार दिले आणि त्यात १२० महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीला यांचा दहा वर्षांतील जीवन प्रवाह अनेकांना प्रेरणादायी आहे.


 
मुळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्या सांगतात “पोलिस अधिकारी” व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खुप सोसलंय. हमाली केली, समोसे विकले, मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले. पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक) सांगतात. “आयुष्यात एक दिवस असा आला की, घरात अन्नाचा दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. खुप वाईट वाटले. खुप रडलो तसेच उपवाशी झोपलो, पण त्या दिवशीच निश्चय केला की, मोठ्ठ अधिकारी व्हायचं.” पद्मशीला शिकल्या अन् मोठी अधिकारी व्हायचं या स्वप्नासाठी त्यांनी खुप कष्ट केले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पद्मशीला यांचे पती पेव्हर ब्लॉकचे मजुरीचे काम करुन घर चालवत होते.


 
नाशिकच्या गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह त्यांनी संसार थाटला होता. पण त्यांच्या मनात यातून बाहेर पडण्याची, भरारी घेण्याची जिद्द होती, त्यांना त्यांच्या पतीची साथ होती त्यामुळे अनेक आव्हानांशी लढत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होत त्यांची निवड राज्य पोलिस दलात आज उपनिरिक्षक पदावर झाली आहे. जीवनात वाईट स्थिती आली म्हणून तिथेच न थांबता त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क पोलिस फौजदार होवून अनेक जणींसमोर आदर्श तर ठेवलाच आहे पण स्वत:च्या जीवनाला असामान्य वळण देण्याची किमया साधली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The journey of the stone under the head

By Naukari Adda Team


The family of a laborer living on the outskirts of the village has set an example to the world. The couple struggled to get out of the situation while pulling the cart of the world with two small children. Today, she has succeeded. The labourer's wife passed the graduation exam, but after that she got a job as a police officer. This is the story of an extraordinary woman from Padmashila Tirpude.

The recent convocation of a team of Sub-Inspectors at the Maharashtra Police Academy was a source of great joy and pride for Yashwini and it was an inspiring moment for many. This was the happy result of her struggle to experience it. This year's 108th Battalion of the Maharashtra Police Academy, which has so far provided 24,000 sub-inspector level officers to the state police force, was special in many respects. The unit has the highest number of 1,544 criminals and includes 120 women police officers. Padmashila, one of them, has been an inspiration to many for ten years.

Ramesh Tirpude, a native of Bhandara district, had a love affair with Pawan Tukaram Khobragade of Pahela village near Wakeshwar in the same district ten years ago. She says she is happy that her dream of becoming a "police officer" has come true. But, all the credit goes to her husband. They have suffered a lot. Carried out, sold samosas, hired. All the hard work they put in came to fruition today. Padmashila Tirpude, (Sub-Inspector of Police) says. “There was a day in my life when there was no grain in the house. He lost fifty rupees in the market. Too bad. We cried a lot and slept fast, but that day we decided that we wanted to be a great officer. ” He worked hard for the dream of becoming a senior officer after learning Padmashi. The condition of the house was very bad. Padmashila's husband was running the house as a laborer in Paver Block.

He had lived with two children in a pala on the banks of Godavari in Nashik. But she was determined to get out of it, to take a leap, she had the support of her husband, so she struggled with many challenges and studied till graduation. After passing the MPSC examination, he was selected for the post of Sub-Inspector in the State Police Force today. He did not stop there because of the bad situation in his life, but on the strength of his relentless will, he became a police constable and set an example for many people, but he also managed to give an unusual turn to his own life.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda