बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक आर राजा यांचा थक्क करणारा प्रवास

By Naukari Adda Team


बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक आर राजा यांचा थक्क करणारा प्रवास, The dream of a farmer father came true When R Raja became IPS

शेतकरी पित्याचे स्वप्न साकार झाले
जेव्हा आर राजा आयपीएस झाले
----------
बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक आर राजा यांचा थक्क करणारा प्रवास
-----------

अशोक वाणी

-----------

आपला मुलगा शिकुन सवरुन मोठा अधिकारी व्हावा त्याला लोकांनी झुकुन सलाम करावा. अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. असेल तो पिता गरीब, दुबळा, शेतकरी  अथवा शेतमजुर. मुलाला घडवीन्यासाठी तो अपार कष्ट करतो. घाम गाळतो आणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभाही राहतो. तामिळनाड़ू  राज्यातल्या सेलम गावातील रामास्वामी या शेतकरी पित्यानेही हेच केले. आपल्या नशिबी जे काबाड कष्ट आले ते मुलाच्या नशिबी येऊ नये. मुलगा मोठा अधिकारी व्हावा यासाठी त्या पित्यानेही जीवाचे रान  केले. गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणुन तो हिंमत हरला नाही. दिवसभर शेतात राबायचे,  सकाळच्या प्रहरी उठून मुलाला सायकलवर  आठ किलोमीटर  शेजारच्या गावतील शाळेत नेहून सोडायचे.  परत  येवून पुन्हा शेतात राबायचे. सायंकाळ होण्याच्या आत पुन्हा शाळेत आणायला जायचे. कित्येक दिवस हा दिनक्रम सुरुच होता. ना उन्हाची चिंता ना पावसाची पर्वा....अभ्यासात हुशार असलेल्या पुत्रानेही पित्याची तळमळ आणी तगमग जाणली...हाडाची काडे आणी रक्ताचे पाणी करुण शेतात घाम गाळनार्या वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवुन तो मूलगा  शिक्षणाच्या जोरावर यशाच्या पायरया चढतच राहिला. प्रयत्नांची पराकाष्टा करणार्या  त्या तरुणाच्या जीवनात अखेर  असा एक सोनेरी दिवस उजाडला. यूपीएससीचा अवघड असा गढ सर करुण जे  आएपीएस ऑफीसर झाले ते आहेत बीडचे पोलिस अधिक्षक आर राजा.नावाने आणी कर्तुत्वाने देखील राजा असलेल्या पोलिस अधिक्षक आर.राजा  यांची यशोगाथा प्रत्येक शेतकरयाच्या मुलांना प्रेरणा देणारी आहे.
-------------
आपन कुठे जन्माला यावे हे कोणाच्याही हातात नसते. गरीब कूटूबात जन्माला आलो म्हणून काही  जण आपल्या नशिबाला दोष देत बसतात. मात्र काही जिद्दी माणस परिस्थितीला दोष न देता आई वडीलांचे  कष्ट डोळ्यासमोर ठेऊन   शिक्षणाच्या जोरावर संकटाचे अनेक डोंगर सर करत  कर्तुत्व सिद्ध करुण दाखवतात त्यांचाच जयजयकार होतो. आएपीएस आर.राजा यांनीही असेच आपले कर्तुत्व घडवले. मागे पुढे धावणारी पोलिस यंत्रणा  त्यांचा रुबाब पाहताना अनेक जण आच्ंबित होतात मात्र त्यासाठी दिवसाची रात्र आणी रात्रीचा दिवस करुण अभ्यास करावा लगतो, प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो, अपयश आले तरी खचून न जाता यशापर्य्ंत मजल मारावी लागते तेव्हा कुठे पोलिस दलात राजा होता येते.
         आर.राजा यांचा जन्म तामीळनाडू  राज्यातील सेलम येथे एका शेतकरी कुटंबात झाला. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय  हा शेतीच. वडिल रामास्वामी यांच्याकडे वडीलोपार्जीत पाच एकर कोरडवाहु शेती. शेतितून मिळनार्या  उत्त्पन्नावरच कुटुंबाचा  गाडा चालवावा लागत असे. त्यात आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने पैशाची चणचणही निर्माण व्हायची. परिस्थिती मूळे रामास्वामी यांना शीक्षण घेता आले नाही.  आपल्या मुलाला खुप शिकवायचे  आणी मोठा अधिकारी करायचे हे  स्वप्न त्यांनी पाहिले . रामास्वमी हे नीरक्षर असले तरी शीक्षणाचे किती महत्व आहे हे ओळखुन होते . शिक्षणाच्या जोरावर अनेकांच्या जीवनात झालेले  परिवर्तन त्यांनी पाहीले होते. आपल्या नशिबी काबाड कष्ट आले ते मुलाच्या नशिबी येऊ नये असे वाटायचे. गावात शिक्षणाची सोय नव्हती. आठ किलोमिटर अंतर असलेल्या शेजारच्या गावातील सरस्वती विद्यालय या शाळेत आर.राजा यांना शिक्षणासाठी टाकले. दिवसभ शेतात राबायचे, भल्या सकाळी उठायचे, राजा यांना तब्बल आठ किलोमिटर सायकलवर  शाळेत नेहून  सोडायचे. परत घरी येऊन शेतात राबायचे आणी परत पाच वाजले की  आणायला जायचे...म्हणजे दररोज 16 किलोमिटर प्रवास करावा लागायचा. अनेक दिवस हा दिनक्रम सुरुच होता. हाडाची काडे आणी रक्ताचे पाणी करुण आई वडिलांचे शेतातील कष्ट पाहून  मनाला वेदना व्हायच्या शीक्षण घेत असताना शेतात घाम गाळणारे आई वडिल डोळ्यासमोर दिसायचये. मुलाच्या शिक्षणासाठी दररोजचा 16 किलोमिटरचा प्रवास दिसायचा. काहीही झाले तरी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही जीवनात परिवर्तन घडवायचे त्यांच्या कष्टाचा मळा फुलला पाहीजे  यासाठी आर राजा मोठ्या जिद्दीने अभ्यासाला लागले. दहावी पर्यंत वडीलांना शेतीच्या कामात मदत केली. आठवडी बाजार आला की वडिलांबरोबर जाऊन  शेतातील भाजीपाला सुद्धा  विकला. शेतीत काम करुण चांगला अभ्यासही केला त्यामुळे दहावी मध्ये 84 टक्के गुण मिळाले.  मुलगा  काहितरी करु शकतो असा रामास्वामी यांना विश्वास वाटू लागला. दहावीनंतर पूढे  एसऑरव्ही कॉलेज येथे सायन्स मधून 11वी 12 विचे शिक्षण घेतले.  12 वी मध्ये 92 टक्के गुण घेऊन   उत्तिर्ण झाले. आर.राजा यांनी  पूढे इंजीनिअरींग क्षेत्रात करिअर  करण्याचे ठरवीले. त्यासाठी तामिळनाडू येथील  कोयमातुर सीआयटी अभीयांत्रीकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल शाखेला प्रवेश घेतला. अभ्यासाच्या जोरावर ईंजिनीअरींगची पदवी घेतली. इंजिनीअर झालो आता पुढे काय असा प्रश्न पडला. घरातील परिस्थिती नाजुक आहे याचीही जाणिव होती. वडीलांना हातभार लागावा त्यांना आर्थिक मदत होईल यासाठी आर. राजा यांनी नौकरी करायचा निर्णय घेतला. पुढे आयपीएस ऑफिसर व्हायचे स्वप्न आहे हे विसरले नव्हते. त्यानंतर बंगळूर येथील वीप्रो कंपनीत  चार वर्ष नौकरी केली. आर.राजा यांची गुणवत्ता पाहुन पूढे  कंपनीने त्यांना अमेरीकेत पाठवले. तेथे  सॉप्टवेअर इंजीनीअर म्हणून दोन वर्ष नौकरी केली. चांगल्या पगाराची नौकरीही  मिळाली, करिअरही सेटल झाले, मात्र आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न अजुन अधुरे होते. देशसेवा करावी आपले जिवन सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कामी आले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही हा विचार आर.राजा यांना स्वस्थ बसू देत नव्हता.  मुलाने मोठा अधिकारी होऊन देशसेवा करावी अशी वडिल रामास्वामी यांचीही इच्छा होती.  याच काळात आर.राजा यांचे काही मित्र केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. मित्रांच्या सोबतीने अभ्यास होईल असा विचार केला आणी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. येथूनच आर.राजा यांच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळाली. अखेर 2008 मध्ये अमेरिकेतली नौकरी सोडून चैन्नईला आले. मित्रांसोबत यूपीएससिची तयारी सुरु केली.आर्थिक आडचण  येऊ नये यासाठी परत वीप्रो कंपनीत काही महिने नौकरी केली. अभ्यासाला अधीक वेळ मिळत नव्हता त्यांमुळे  पुन्हा नौकरी सोडली व पुर्ण वेळ स्वताहाला अभ्यासात झोकून दिले. काही विषयासाठी क्लासेसही लावले. अभ्यास करूनही दोन वेळा त्यांना अपयश आले तरिही जीद्द सोडली नाही. पुन्हा नव्या जोमाने अभ्यास केला. अखेर तिसरया प्रयत्नात  2012 मध्ये यूपीएससीत यश मिळवुन अखेर आर.राजा हे आएपीएस झाले. देशतून त्यांना 374 वा  र्यँक  मिळाला. आपला मुलगा एसपी झाल्याचे आईवडीलांना समजल्यानंतर आनंदाने आकाश ठेंगने वाटू लागले. मुलाच्या कर्तुत्वाने समाजात मान उंचावली.
   हैद्राबाद येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर पहीली पोस्टींग अमरावती येथे झाली. अहमदनगर येथेही दोन महिने आडिशनल एसपी म्हणून काम केले. त्यानंतर गडचीरोली येथे अडीशनल एसपी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. त्यावेळी देशातील सर्वात मोठी नक्षलवीरोधी कारवाईची मोहीम सुरु केली होती. तेव्हा आर.राजा यांनी नक्षलवादयांना चांगलीच अद्दल घडवली. त्यांना सळोकी पळो करुण सोडले. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलिस दलाची मान उंचावली आर.राजा यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह आणी विशेष सेवा पदक मीळाले. त्यानंतर 13 महिने उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक  म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. कायद्याचा धाक निर्माण  करण्याबरोबरच भल्या भल्या  गुन्हेगारांना वठनीवर आणले. पोलिस कल्याण विभागामार्फत पोलीसांसाठी विविध उपक्रम राबविले. यानंतर मुंबई  येथे राज्यगुप्त वार्ता विभागात एक वर्ष काम पाहीले. आणी आता बीडचे पोलिस अधिक्षक म्हणून नेमणूक झाली असुन  उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
----------------
दोन वेळा यशाने हुलकावनी 
दिली मात्र जिद्द नाही सोडली 
----------
स्पर्धा परीक्षेची तयारी करनारया  विद्यार्थ्यांना बर्याचदा चांगला अभ्यास करूनही दोन तीन प्रयत्नानंतर यश मिळते. मात्र काही जण अपयशाने खचून गेल्याने प्रयत्न सोडतात. परंतु काही जिद्द बाळगनारे  अपयश ही यशाची पहीली पायरी समजून हार न मानता यूपीएससीचा गड सर करुणच दाखवतात. आर राजाही असेच अभ्यासू आणी जिद्दी स्वभाववाचे. पहील्या प्रयत्नात  अपयश आले त्यांनी हार मानली नाही दुसर्या प्रयत्नात यश आले परंतु आयपीएस मिळाले नाही . अखेर तिसर्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. अपयश आले म्हणून थांबू नका प्रयत्न सोडू नका एक दिवस तुमच्या स्वप्नपर्त्तीचा दिवस नक्किच उजाडल्याशिवाय राहणार नाही असे आर राजा सांगतात.
--------------
  आई वडिलांच्या कष्टामूळेच
 आयपीएस झालो
-----------
आपल्या मुलांनी खुप शिकावे  त्याचे उज्वल भवीतव्य घडावे यासाठी शेतकरी, मजुर असे असलेले आई वडिल खुप कष्ट करतात.मात्र त्यांच्या कष्टाची जाणिव ठेवून शिक्षण घेतले पाहिजे.आयूष्यभर केलेल्या  त्यांच्या कष्टाला फळ मिळावे असे कर्तुत्व करुण दाखवावे. अभ्यास करताना मला कोरडवाहू शेतात राबनार्या आईवडीलांचे कष्ट दिसत होते. दररोज 8 कीलोमीटर सायकलवर शाळेत घेउण जाणार्या वडीलांची शिक्षणासाठी तगमग दिसत होती. आर्थिक परिस्थिती नाजुक असतानाही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी कधी काहीही कमी पडू दिले नाही. काहीही झाले तरी त्यांचे कष्ट वाया जाऊ देणारा नाही अशी जिद्द डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले म्हणूनच आज एसपी झालो असल्याचे  आर राजा सांगतात.
--------------
बीड जिल्हा कायम स्मरणात 
ठेवील असे काम करील
-------
बीड जिल्ह्यात कायदयाचा धाक निर्माण करण्याबरोबरच गंभीर गुन्ह्यंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न राहिल. नागरिक आणी पोलिस यांच्यात सुसंवाद असावा यासाठी प्रयत्न केले जातील. पोलिस ठाण्यात येणार्या नागरीकांना चांगली वागणूक मीळावी याकडेही लक्ष असेल. तसेच प्रतिबंधात्मक कारवाया वाढवनार. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मकोका, एमपीडीए सारख्या कठोर कारवाया केल्या जातील. तसेच पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून पोलिस कल्याण विभागातुत पोलीसांसाठी विविध योजना राबविण्यात येतील. बीड जिल्हा मला कायम लक्षात ठेविल असे काम करील असे पोलिस अधिक्षक  आर राजा यांनी सांगितले.
------------
 तरुणाईला आर राजा यांचा सल्ला 
----------
परिस्थिती कशीही असो मेहनत करा, अभ्यास करा, हे करत असतांना एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली पाहीजे. त्याचबरोबर चांगल्या माणसांचे मार्गदर्शनही घेतले पाहीजे. स्पर्धा परीक्षेत खुप संधी असुन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेकडे वळावे. जिद्द आणी आत्मविश्वास असेल तर यश नक्किच मिळेल. तुमच्यासाठी कष्ट करनार्या आई-वडीलांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका त्यांची मान अभिमानाने उंचावेल असे यश मिळवा.(आर.राजा पोलिस अधिक्षक बीड ) 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The dream of a farmer father came true When R Raja became IPS

By Naukari Adda Team


The dream of a farmer father came true When R Raja became IPS

 Beed's dutiful Superintendent of Police R Raja's astonishing journey

----------- Ashok Vani ---------------

People should bow down to your son and make him a great official. That is the wish of every father. Whether the father is poor, weak, farmer or agricultural laborer. He works hard to raise a child. He sweats and stands firmly on his back. Ramaswamy, a farmer father from Salem village in Tamil Nadu, did the same. The fate of the child should not be the same as the fate of the child. The father also sacrificed his life for the son to become a great officer. He did not lose heart as there was no education in the village. He worked in the fields all day, woke up in the morning, and drove his child eight miles [8 km] to school in a nearby village. I used to come back and work in the fields again. I used to go back to school in the evening. This routine continued for several days. No worries, no worries about rain .... Even a son who is smart in studies knew his father's longing and longing ... Keeping in front of the eyes of his father who was sweating in the field of bone and blood, he continued to climb the steps of success on the strength of boy education. Such a golden day finally dawned on the life of the young man who was striving hard. Sir Karun, who has become an IPS officer in a difficult UPSC stronghold, is R. Raja, Superintendent of Police, Beed. ------------- Where you are born is not in anyone's hands. Born into a poor family, some people blame their own destiny. However, some stubborn people, without blaming the situation, keep in view the hardships of their parents, overcome many difficulties on the strength of education and prove their worth. IPS R. Raja did the same. Many people are amazed when they see the police system running back and forth, but it takes a lot of hard work, day and night, a lot of hard work, a lot of hard work, a lot of hard work, a lot of hard work, a lot of hard work. R. Raja was born in Salem, Tamil Nadu to a farming family. The main occupation of the people here is agriculture. Father Ramaswamy owns five acres of dry land. The family had to run the car on the income from the farm. The economic situation was not very good and there was a shortage of money. Due to the situation, Ramaswamy could not get an education. He dreamed of teaching his son a lot and making him a great officer. Although Ramaswamy was illiterate, he knew the importance of education. He had seen the change in the lives of many through education. He felt that his child's fate should not be ruined. There was no education facility in the village. R. Raja was sent to Saraswati Vidyalaya, a neighboring village, eight kilometers away, for education. He used to work in the fields all day long, get up early in the morning, take Raja to school on a bicycle for eight kilometers. I used to come back home and work in the fields and go back to fetch it at five o'clock ... I had to travel 16 kilometers every day. This routine continued for many days. Bone sticks and water of blood. Karun's parents should be seen sweating in the field while learning to be in pain when they see their father's hard work in the field. There seemed to be a daily journey of 16 kilometers for the child's education. No matter what happened, R Raja started studying hard so that his faith would not be shattered and his hard work would change. Helped his father in farming till 10th. When the week came to the market, he went with his father and sold the vegetables in the field. Karun also did a good job working in agriculture so he got 84 percent marks in 10th. Ramaswamy began to believe that his son could do something. After 10th, he went on to study 11th and 12th in Science at SORV College. Passed 12th with 92 percent marks. R. Raja decided to pursue a career in the field of engineering. For this, he took admission in Electrical Branch in Coimbatore CIT Engineering College, Tamil Nadu. Took a degree in engineering on the strength of studies. Now that I have become an engineer, the question is what to do next. He was also aware that the situation at home was fragile. R. to help the father financially. The king decided to do the job. He did not forget that his dream is to become an IPS officer. After that he worked for Wipro in Bangalore for four years. Seeing the quality of R. Raja, the company later sent him to America. Worked there for two years as a software engineer. I got a well-paying job, my career was settled, but my dream of becoming an IPS officer was still unfulfilled. The idea that there is no other solution like this if one's life is for the service of common people did not allow R. Raja to settle down. Father Ramaswamy also wanted his son to become a senior officer and serve the country. Meanwhile, some of R. Raja's friends were preparing for the Central Public Service Commission (UPSC) competitive examination. With friends


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda