प्रत्येकाला प्रेरणा देणारा प्रवास, पंक्चर काढणारा मुलगा बनला IAS

By Naukari Adda Team


 प्रत्येकाला प्रेरणा देणारा प्रवास, पंक्चर काढणारा मुलगा बनला IAS, The journey that inspired everyone, the puncture-removing boy became IAS

स्वप्न अनेकजण पाहातात. त्या स्वप्नांना कष्टाची आणि जिद्दीची जोड देणं खूप कमी लोकांना जमतं. या मोजक्या मंडळींपैकी एक आहेत वरुण बरनवाल (Varun Baranwal). लहापणी पंक्चर नीट करणारे वरुण आज IAS ऑफिसर आहेत. त्यांनी 2013 च्या UPSC परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला होता. घरच्या गरिबीवर मात करत वरुण यांचा IAS होण्याचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वरुण दहावीमध्ये होते तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी पुढं शिकण्याची आशा सोडली होती. ते पैसे कमावण्यासाठी पंक्चरच्या दुकानात काम करु लागले. त्यानंतर काही महिन्यांनी दहावीचा रिझल्ट लागला. त्यामध्ये ते शाळेत पहिले आले. “या निकालानंतर मी पुढं शिकावं अशी घरच्या मंडळींची इच्छा होती. आम्ही सर्व जण काम करु, तू शिक्षण सुरु ठेव,’’ असं आईनं सांगितल्याची आठवण वरुण यांनी सांगितली.

वरुणच्या आयुष्यातील त्यानंतरची दोन वर्ष ही खूप आव्हानात्माक होती. ते सकाळी 6 वाजता उठून शाळेत जात असत. त्यानंतर घराला हातभार लावण्यासाठी दुकानात काम आणि मुलांची ट्यूशन घेणे अशी दोन कामं ते करत होते.

“मी चांगला अभ्यास केला तर प्रिन्सिपल माझी फी माफ करतील असं मला वाटत होतं. फी माफ मिळावी म्हणून अधिक जोमानं अभ्यास करण्याचा निश्चय केला. त्यानंतर प्रत्यक्षातही तसेच झाले. मला चांगले मार्क्स मिळाले आणि मी प्रिन्सिपल सरांना फी माफ करण्याची विनंती केली. प्रिन्सिपल सरांनी ती विनंती मान्य केली आणि माझं पुढील शिक्षण झालं,’’ असे वरुण यांनी सांगितले.

मित्रांनी केली मदत : बारावीनंतर वरुण इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा पास झाले. त्यानंतर कॉलेजमधील प्रवेशाच्या वेळी घरातील व्यक्तींसोबतच मित्रांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन त्यांची फीस भरली. इंजिनीअरिंगला असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली होती.

इंजिनीअरिंग झाल्यानंतर वरुण यांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मात्र त्यांची UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा होती. ‘त्यावेळी मला भावानं मदत केली’, असं वरुण सांगतात

वरुणच्या कष्टाचं फळ झालं. त्यांचा UPSC च्या परीक्षेत 32 वा क्रमांक आला. भावाने निकाल सांगितल्यानंतर वरुण यांना अश्रू आवरले नाहीत. प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन स्वप्न साकार करता येतं वरुण यांची यशोगाधा याचंच उदाहरण आहे.

 

सोर्स  : लोकमत 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The journey that inspired everyone, the puncture-removing boy became IAS

By Naukari Adda Team


Many people dream. Very few people are able to combine those dreams with hard work and perseverance. One of these few congregations is Varun Baranwal. Varun, who repaired a small puncture, is an IAS officer today. He was ranked 32nd in the 2013 UPSC exams. Overcoming poverty at home, Varun's journey to become an IAS is inspiring.

According to media reports, Varun's father died when he was in his tenth year. He then gave up hope of further learning. He started working in a puncture shop to earn money. A few months later, the result was tenth. In it he came first in school. “After this result, the house churches wanted me to continue learning. We will all work, you continue your education, "said Varun, recalling his mother.

The next two years of Varun's life were very challenging. He would get up at 6 in the morning and go to school. After that, he was working in a shop and taking children's tuition to help the family.

“I thought the principal would forgive me if I studied well. He decided to study harder to get a fee waiver. After that, it actually happened. I got good marks and I requested the principal to waive the fee. The principal agreed to the request and I got my further education, "said Varun.

Friends helped: Varun passed the engineering entrance exam after 12th standard. Then at the time of admission to the college, friends and their parents came together with the family members and paid their fees. While in engineering, he started preparing for UPSC.

After doing engineering, Varun got a job in a good company. But he wanted to take the UPSC exam. "My brother helped me at that time," says Varun

Varun's hard work paid off. He got 32nd position in UPSC examination. Varun could not hold back his tears after his brother announced the result. Varun's success is an example of how one can overcome any difficult situation with sincere effort and perseverance.

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda