आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश!

By Naukari Adda Team


आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश!, Brothers and sisters in Pune became billionaires by selling mother

पुणे : भारतीय खाद्यसंस्कृतीत खिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात विविध पदार्थांची खीर बनवली जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. मग जर ती खीर आईच्या हातची असेल तर स्वर्गसुख. पुण्यातील भाऊ-बहिण आईच्या हातची खीर विकून चक्क कोट्यधीश बनले आहेत. 'La Kheer Deli' (LKD) नावाच्या आऊटलेटमधील खीर देशभरात लोकप्रिय होत आहे. या आऊटलेटमध्ये न्यूटेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरिओ आणि गुलकंद अशा फ्लेवर्समध्ये खीर मिळते.

भाऊ-बहिणीने सुरु केला व्यवसाय
शिवांग आणि शिविका सूद असं या भाऊ-बहिणीचं नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये या आऊटलेटची सुरुवात केली आहे. त्यांच्या आऊटलेटमधील खीर ही फक्त पुण्यातच नाही तर भारताच्या अनेक शहरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

'द बेटर इंडिया'शी केलेल्या बातचीतमध्ये 27 वर्षीय शिवांग सूद म्हणाला की, आम्ही दोघे लहान असताना आई खीर बनवायची. आईच्या हातची खीर संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने आणि आवडीने खात असेल. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये माझी बहिण या खिरीला कंटाळली. मग तिने आपल्या खिरीमध्ये चमचाभर न्यूटेला आणि ओरिओ टाकलं. यामुळे खिरीची चव बदलली.

आईने यावर काम करण्यास सुरुवात केली
मग काय तिने आपल्या आईला या चवीबद्दल सांगितलं. यानंतर आईने गुलकंद आणि ब्राऊनी घालून खीर बनवली. कुटुंबीयांना ती चवही आवडली. इतकंच नाही तर त्यांनी ही खीर नातेवाईकांनाही चाखायला दिली. शेजारीपाजारीही खीर खाल्ल्यावर तृप्त झाले.

शिवांग सांगतो की, सुरुवातीला मी स्पोर्ट्स स्टार्टअप चालवायचो. मग ही खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना माझ्या आणि शिविकाच्या डोक्यात आली. परंतु अडचण गुंतवणुकीची होती. पैसा कुठून येणार. यानंतर 19 मे, 2017 रोजी अखेरीस आम्ही गुंतवणूक केलीच. पुण्याच्या औंधमध्ये 'स्टारबक्स'च्या बाहेर गाड्यावर आईने बनवलेली खीर बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध फ्लेवर्स होते.

हळूहळू व्यवसाय वाढला
पहिल्या दिवशी मित्रांच्या मदतीने खिरीचे 44 डब्बे विकले. पुढच्या दिवशी आईने 82 डब्बे बनवले. तिसऱ्या दिवशी 100 डब्बे बनवले आणि सगळ्यांची विक्री झाली. मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॅण्डिंगची सुरुवात केली. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी प्री-ऑर्डर देण्यास सुरुवात केली, असं शिवांगने सांगितलं. यानंतर सूद कुटुंबाने 2018 मध्ये पुण्याच्या जेएम रोडवर दुकान सुरु केलं. पहिल्या वर्षातील कमाई 33 लाख रुपये होती. 2018 मध्ये वाढून ती 84 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. तर 2019 आणि 2020 मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

आईने आपली नोकरी सोडली
बहिण-भावाच्या जोडीने हा व्यवसाय सुरु केला असला तरी सर्वाधिक मेहनत त्यांच्या आईने केली आहे. 52 वर्षीय सोनिया सूद या शाळेत शिक्षिका होत्या. परंतु मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुण्यातील 'La Kheer Deli' आऊटलेट आज फारच लोकप्रिय आहे. शिवाय व्यवसायही चांगला सुरु आहे. त्यामुळे त्यांना नोकरी सोडल्याची खंत नाही.

 

 

 

सोर्स : abp live


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Brothers and sisters in Pune became billionaires by selling mother's hand kheer!

By Naukari Adda Team


Pune: Khiri has a unique significance in Indian food culture. Kheer is made from a variety of dishes across the country and is also eaten with gusto. Then if that kheer is in mother's hand, then heavenly bliss. Brothers and sisters in Pune have become billionaires by selling their mother's hand kheer. Kheer from an outlet called 'La Kheer Deli' (LKD) is gaining popularity across the country. Kheer is available in these outlets in flavors like Nutella, Brownie, Chocolate, Orio and Gulkand.

The business started by siblings
The siblings are Shivang and Sivika Sood. They started this outlet two years ago i.e. in 2019. Kheer in their outlet is very popular not only in Pune but also in many cities of India.

In an interview with The Better India, 27-year-old Shivang Sood said, "We both used to make kheer when we were little. The whole family will eat the mother's kheer with great love and affection. A few years ago, in 2017, my sister got bored with this khiri. Then she put a spoonful of Nutella and Orio in her pocket. This changed the taste of Khiri.

Mom started working on it
So she told her mother about this taste. After this, the mother made kheer by adding gulkand and brownie. The family loved that taste too. Not only that, they also gave this kheer to their relatives to taste. Neighbors were also satisfied after eating kheer.

“Initially, I used to run a sports startup,” says Shivang. Then the idea of ​​sharing this kheer with others came to my mind and to Sivika's. But the difficulty was investment. Where will the money come from? After that, on May 19, 2017, we finally made the investment. In Aundh, Pune, he started making kheer made by his mother on a cart outside Starbucks. It has different flavors.

Gradually the business grew
On the first day, with the help of friends, he sold 44 cans of Khiri. The next day the mother made 82 cans. On the third day 100 cans were made and all were sold. Started branding through marketing and social media. People responded well. They started pre-ordering, Shivang said. After this, the Sood family started a shop on JM Road in Pune in 2018. Earnings in the first year were Rs 33 lakh. In 2018, it increased to Rs 84 lakh. So in 2019 and 2020 it has been more than one crore rupees.

Mom quit her job
Although the sibling couple started the business, their mother has worked hardest. Sonia Sood, 52, was a teacher at the school. But he quit his job to help the children. The La Kheer Deli outlet in Pune is very popular today. Also, the business is doing well. So they have no regrets about leaving the job.

 

 


Source: abp live


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda