Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा

By Naukari Adda Team


Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा, Success Story: drive a rickshaw  IES exam

Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा

श्रीनगर (जम्मू-काश्मिर), 01 ऑगस्ट: ज्याच्या अंगी काही करून दाखवण्याची जिद्द असते तो जगही जिंकू शकतो असं म्हणतात. मात्र असे खूप कमी विद्यार्थी असतात जे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत यशाच्या उंच शिखरावर पोहोचतात. असाच एक विद्यार्थी आहे जम्मू- काश्मीर (Jammu Kashmir) या केंद्रशासित प्रदेशमधील श्रीनगरचा तनवीर अहमद खान. तनवीरनं संघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा आयोजित प्रतिष्ठित भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Services-IES) या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, श्रीनगरपासून (Shrinagar) सुमारे 80 किमी दूर असलेल्या दुर्गम निगिनपोरा कुंड गावात राहणारा तन्वीर अहमद खान यानं आपलं प्राथमिक शिक्षण शासकीय प्राथमिक शाळा कुंड आणि नंतर शासकीय हायस्कूल वाल्टेनगू इथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, राजलू कुंड येथून 12वी आणि 2016 मध्ये शासकीय पदवी महाविद्यालय अनंतनाग इथून कला पदवी पूर्ण केली.

काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवून आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून तन्वीर अहमद खान सुरुवातीपासूनच एक गुणवंत विद्यार्थी आहे. तन्वीरनं त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षादरम्यान जुनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) मिळवून आणखी एक मैलाचा दगड गाठला होता.

एम.फिलची पदवी एप्रिल 2021 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, कलकत्ता इथून प्राप्त केली. यादरम्यान तन्वीरनं हिवाळ्यात कोलकातामध्ये पार्ट टाइम रिक्षाचालक म्हणूनही काम केलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती लक्ष केंद्रित करतो, कठोर परिश्रम करतो तेव्हा यश मिळतं आणि काहीही अशक्य नसतं.

“कोविड कालावधीत, मी स्वतःला माझ्या खोलीच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त केलं आणि एम.फिल करत असताना IES परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोविडचा माझ्या अभ्यासाच्या वेळापत्रकावर कधीही परिणाम होऊ दिला नाही.” पहिल्याच प्रयत्नातच ही कामगिरी केली आहे. तो म्हणाला की हा एक चढाचा संघर्ष आहे, परंतु त्याने कधीही आशा सोडली नाही. तन्वीरनं पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Success Story: drive a rickshaw IES exam

By Naukari Adda Team


Success Story: A student who used to drive a rickshaw came second in the IES exam Srinagar (Jammu and Kashmir), August 01: It is said that anyone who is determined to do something can win the world. However, there are very few students who find a way out of difficult situations and reach the pinnacle of success. One such student is Tanveer Ahmed Khan of Srinagar in the Union Territory of Jammu and Kashmir. Tanveer has bagged the second position in the prestigious Indian Economic Services (IES) examination conducted by the Union Public Service Commission (UPSC). Tanveer Ahmed Khan, a resident of the remote village of Niginpora Kund, about 80 km from Srinagar, completed his primary education at Government Primary School Kund and later at Government High School Waltengu, officials said. He then completed his 12th degree from Government Higher Secondary School, Rajlu Kund and in 2016 from Government Degree College, Anantnag. Tanveer Ahmed Khan has been a meritorious student from the very beginning, securing third position in the entrance examination of the University of Kashmir and a post-graduate degree in economics. Tanveer had reached another milestone by securing a Junior Research Fellowship (JRF) during his final year of post graduation. He obtained his M.Phil degree in April 2021 from the Institute of Development Studies, Calcutta. Meanwhile, Tanveer has also worked as a part-time rickshaw puller in Kolkata in winter. When a person focuses, works hard, success is achieved and nothing is impossible. “During the Kovid period, I confined myself to the four walls of my room and started preparing for the IES exam while doing my M.Phil. I never let Kovid affect my study schedule. ” This has been done in the first attempt. He said it was an uphill struggle, but he never gave up hope. Tanveer's success in the first attempt is being appreciated from all levels.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda